मनोरंजन

माधुरी दीक्षितच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण, मोठा मुलगा अरिन झाला पदवीधर

Trupti Paradkar  |  May 30, 2021
माधुरी दीक्षितच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण, मोठा मुलगा अरिन झाला पदवीधर

अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्या आयुष्यात एक खास क्षण आला आहे. त्यांच्या मोठा मुलगा अरिन नुकताच पदवीधर झाल्यामुळे माधुरीच्या कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. मुलांचे शिक्षण आणि त्यात त्यांची झालेली प्रगती आईवडिलांसाठी नेहमीच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद असते. सध्या माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने याच भावनांचा अवुभव घेत आहेत. माधुरीने तिच्या सोशल मीडियावरून हा आनंद तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

माधुरी दीक्षितने चाहत्यांसोबत शेअर केला हा खास क्षण

माधुरी दीक्षितने तिच्या ट्विटरवरून ही आनंदाची गोष्ट शेअर केली आहे. तिने यासाठी एक फोटो पोस्ट शेअर केला आहे त्यामध्ये माधुरी दीक्षित, श्रीराम नेने आणि त्यांची दोन्ही मुले आहेत. या फोटोत अरिन पदवीधर झाल्याचे तिने शेअर केला आहे. शिवाय या पोस्टसोबत त्याने शेअर केले आहे की, “राम आणि माझ्या आयुष्यातील एक अभिमानाचा क्षण, अरिन हायस्कुलमधून पदवीधर झाला आहे. अरिन तुझे आणि तुझ्या  संपूर्ण वर्गाचे अभिनंदन!!!

यापुढे माधुरीने शेअर केले आहे की, “हे वर्ष सर्वांसाठी खूपच त्रासदायक होते. अशा काळात समोर येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी तू दाखवलेल्या लवचिकपणा, ताकद, कष्ट आणि एकाग्रतेसाठी आम्ही तुझे कौतुक करतो “

आणखी एका पोस्टमध्ये तिने शेअर केले आहे की, “यासाठीच तुझ्या ध्येयानुसार आयुष्यात पुढे जात राहा ज्यामुळे एक दिवस तू काहीतरी जगावेगळं करू शकशील यावर विश्वास ठेव, तुझ्याकडे असलेल्या शक्तीचा योग्य वापर कर. तू जे काही करशील त्यामध्ये तुला यश मिळो हीच प्रार्थना… तुझ्यावर आमचे काय असेच प्रेम राहिल” या फोटो आणि पोस्टमधून माधुरीला मुलाबद्दल वाटत असलेला अभिमान आणि प्रेम दिसून येत आहे. सध्या कोरोनामुळे मुलांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा मोठा प्रश्न पालकांसमोर उभा आहे. अशा कठीण काळात मुलांनी मिळवलेल्या यशाचं कौतुक केल्यामुळे मुलांनाही भविष्यात काही तरी चांगलं करण्याची प्रेरणा नक्कीच मिळू शकेल. कारण ज्ञान आणि शिक्षण मिळवण्यासाठी कष्ट हे घ्यावेच लागतात. 

माधुरीचे आगामी चित्रपट

माधुरी दीक्षितने नुकतंच ‘डान्स दिवाने 3’ च्या परिक्षकाची भूमिका बजावली आहे.  याव्यतिरिक्त ती सतत सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात असते. माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने या काळात कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याचे काम सोशल मीडियावरून करत आहेत. शिवाय लॉकडाऊनच्या काळात ते त्यांच्या युट्यूब चॅनेलवरून चाहत्यांचे मनोरंजन करणारे आणि माहिती देणारे व्हिडिओज शेअर करत असतात. दोघं मिळून कधी एखादा खाद्यपदार्थ बनवतात, आरोग्याविषयी सल्ला देतात किंवा माधुरी तिच्या  सौंदर्याचे रहस्य उलगडते. 2020 मध्ये  ती ‘कलंक’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली होती. आता लवकरच संजय लीला भन्सालीच्या ‘हीरा मंडी’ या वेबसिरिजमधून ती प्रेक्षकांसमोर मुजरा सादर करणार आहे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

‘तू सौभाग्यवती हो’ मध्ये 1 जूनपासून दिसणार ऐश्वर्या आणि सूर्यभानचा विवाह सोहळा

‘ही’ मराठी मालिका आहे टीआरपीच्या रेसमध्ये सर्वात पुढे, स्टार प्रवाहची घोडदौड

रणबीर आणि आलियाच्या ‘ब्रम्हास्त्र’चा आता निर्माता झाला अयान मुखर्जी

 

Read More From मनोरंजन