सगळ्यांची लाडकी आणि प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारी सोनी मराठी वाहिनीची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) ही अनेक मोठमोठ्या कलाकारांचीसुद्धा आवडती आहे आणि आता या कलाकारांच्या यादीत नाव जोडलं गेलं आहे दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांचं. अगदी बरोबर वाचलंत मंडळी. महाराष्ट्राच्या लाडक्या हास्यकलाकारांनी फिल्मसिटी इथं जाऊन अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची भेट घेतली. या वेळी अमिताभजींनी सर्व हास्यवीरांचं आणि हास्यजत्रेचं कौतुक केलं, ‘तुम्ही लोकांना हसवण्याचं अतिशय कठीण असं काम करताहात. ते सतत असंच करत राहा’, असं ते म्हणाले आणि ते स्वतःही हास्यजत्रा पाहत असल्याचं आणि आपल्या कुटुंबालाही हास्यजत्रेबद्दल सांगत असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं.
अधिक वाचा – Bigg Boss Marathi: स्नेहा वाघ आणि आविष्कारमध्ये नक्की काय होतं नातं
पुन्हा एकदा आठवड्यातून चार दिवस मनोरंजन
सर्वांची आवडती हास्यजत्रा ही रविवारी केल्यावर अनेक प्रेक्षकांनी ती पुन्हा चार दिवस व्हावी आणि त्यांचा हास्याचा डोस आठवड्यातून चार दिवस मिळावा, अशी मागणी केली होती. प्रेक्षकांच्या मागणीचा मान राखून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ 20 सप्टेंबरपासून, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वा. असे चार दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून हास्यजत्रेला प्रेक्षकांचं प्रेम मिळू लागलं. समीर-विशाखा, प्रसाद-नम्रता, गौरव-वनिता आणि हास्यजत्रेतल्या इतर हास्यवीरांनी मिळून प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी आणि प्रहसनांनी नवी उमेद दिली आहे. हा कार्यक्रम म्हणजे खरंच टेन्शनवरची मात्रा आहे. मराठमोळ्या रसिकांचं मन या कार्यक्रमाने जिंकून घेतलं आहे. यातील सर्वच कलाकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहेत. तर त्यांचे हसविण्याचे टायमिंग हे अफलातून आहे. विशेषतः ओंकर भोजने, समीर चौघुले, नम्रता संभेराव आवटे, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे, वनिता खरात, निमिष कुलकर्णी, शिवाली परब या सर्वच कलाकारांनी आपली वेगळी ओळख बनवली आहे. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार हे घराघरामध्ये पोहचले आहेत. तर सई ताम्हणकर (Saie Tamhankar) आणि प्रसाद ओक (Prasad Oak) हेदेखील परीक्षक म्हणून कार्यक्रमाला वेगळी शोभा आणतात. प्राजक्ता माळीचे निवेदनदेखील प्रेक्षकांना तितकेच भावते. बाकी कोणती मालिका नाही बघितली तरी चालेल पण हास्यजत्रा हवी असाच हल्ली प्रेक्षकांचा सूर दिसून येतो.
अधिक वाचा – मराठी बिग बॉस 3 ची दिमाखदार सुरुवात, हे कलाकार आहेत स्पर्धक
प्रहसनाने होतो दिवस मजेशीर
या कलाकारांचे कोणत्याही स्किटचे अगदी लहान भाग जरी पाहिले तरी मन हलके होते आणि हसून प्रेक्षकांचाही दिवस मजेत जातो. कलाकार अत्यंत मेहनतीने ही प्रहसने अर्थात स्किट करतात आणि त्याचे प्रेक्षकांना खरेच कौतुक आहे. प्रेक्षकच नाही तर अगदी महानायक अमिताभ बच्चन यांनीही सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत कायम असंच हसवत राहा असा सल्लाही दिला आहे. हसवणे हे सर्वात कठीण काम आहे आणि ते इतक्या सहजतेने हे सर्वच कलाकार करत असून कौतुकाची थाप अमिताभ बच्चन यांनी सर्वच कलाकारांना दिली आहे. त्यामुळे आता सर्वच कलाकारांचा उत्साह अधिक वाढला असून नव्या जोमाने हा नवा आठवडा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. यातील एकही असा कलाकार नाही ज्यांना महाराष्ट्रात ओळखत नाहीत. आपल्या अप्रतिम विनोदशैलीने या सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे.
अधिक वाचा – लवकरच येणार ‘सलमान खान’च्या जीवनावर आधारित वेबसिरिज
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade