एखादा सेलिब्रिटी फिल्मस्टार झाला की, त्याचे प्रत्येक बोलणे हे लोकांसाठी महत्वाचे असते. साऊथमधील महेश बाबू (Mahesh Babu) हा असा स्टार आहे की, जो कधीही कोणाच्या अध्यातमध्यात नसतो. पण त्याच्या एका वक्तव्यामुळे तो सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बॉलिवूड चित्रपटांवरुन त्याला आलेल्या प्रश्नाचे त्याने असे काही उत्तर दिले की, महेश बाबूला गर्व झाला की काय? असा प्रश्न अनेकांना पडला. पण आता महेश बाबूने याचे स्पष्टीकरण दिले आहे. इतकेच नाही. तर त्याच्या स्पष्टीकरणामुळे आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
असं काय म्हणाला होता महेश बाबू
महेश बाबूचा आगामी चित्रपट ‘सरकारी वारु पाता’ या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. या चित्रपटादरम्यान त्याला बॉलिवूड चित्रपटात काम का करत नाही ? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने सांगितले की, मला बॉलिवूडमधून कधीही ऑफर्स आलेल्या नाहीत. मला असं वाटत नाही मी त्यांना परवडत नाही. ज्यांना मी परवडत नाही त्यांच्यासोबत मला काम करायचे नाही. शिवाय मला माझ्या सिनेसृष्टीत बआदर आणि सन्मान दोन्ही मिळते. त्यामुळे माझी सिनेसृष्टी सोडण्याचा मी विचार करु शकत नाही. मी माझी स्वप्ने येथे पूर्ण केली आहेत. त्यामुळे आता मला आनंदी जीवन जगायचे आहे. असे त्याने सांगितले.
महेशबाबूच्या विधानाचा काढला चुकीचा अर्थ
महेश बाबूने बॉलिवूडबद्दल असे विधान केल्यामुळे त्याला अनेकांनी ट्रोल केले. पण मुळात महेश बाबूला बॉलिवूडचा अपमान करायचा नव्हता. असे अनेकांचे म्हणणे आहे. दाक्षिणात्य चित्रपटात त्याने इथके यश मिळवले आहे की,त्याला आयुष्यात अजून काहीही नको. महेश बाबूचे विधान तोडून मोडून दाखवल्यामुळे अनेकांना त्याला गर्व झाला आहे असे अनेकांना वाटले. पण तो खरे काय बोलला हे ऐकल्यानंतर आता अनेकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता महेश बाबूच्या विधानाच्या असा चुकीचा अर्थ काढल्यामुळे महेश बाबू काही काळासाठी ट्रोल झाला होता.
महेश बाबूला आल्या होत्या बॉलिवूडच्या ऑफर्स
महेश बाबूला बॉलिवूडकडून चित्रपटाच्या ऑफर्स येत नाही असे त्याने म्हटले असले तरी देखील त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांना नकार दिला आहे. पुष्पा, गजनी, ॲनिमल अशा काही साऊथच्या चित्रपटांनाही त्याने नकार दिला तो केवळ त्यामधील भूमिकेमुळे. महेश बाबू चित्रपट निवडताना फारच काळजी घेतो. त्याला ग्रे शेड असलेल्या भूमिका करायच्या नाहीत म्हणूनच त्याने या भूमिका केल्या नाहीत.
महेश बाबूचे चित्रपट होतात सुपरहिट
महेश बाबू हा दाक्षिणात्य चित्रपटातील एक मोठा स्टार आहे. त्याचे सगळेच चित्रपट हिट होतात. त्याचा आता नवा आलेला चित्रपट, त्यातील गाणी देखील सगळ्यांना आवडली आहेत. त्यामुळे त्याने आणखी एक ब्लॉक बस्टर चित्रपट त्याच्या चाहत्यांना दिला आहे.
दरम्यान, महेश बाबूच्या या वक्त्यवाला आता त्याच्या स्पष्टीकरणामुळे पूर्णविराम मिळाला हे महत्वाचे
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade