पुढच्या महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी रिलीज होणाऱ्या कमल हासन, विजय सेतुपती आणि फहद फासिल स्टारर ‘विक्रम’च्या ट्रेलरने सिनेमाच्या महायुद्धात भर घातली आहे. रविवारी संध्याकाळी बहुप्रतीक्षित विक्रम या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ‘गंगुबाई काठियावाडी’ आणि ‘आरआरआर’ सारखे चित्रपट प्रदर्शित करणाऱ्या पेन मरुधर एंटरटेनमेंटने ‘विक्रम’ हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित करण्याची जबाबदारी स्वीकारली असून हिंदी चित्रपट वितरकांमध्ये या कंपनीची लोकप्रियता पाहता यशराज फिल्म्सचा पुढील चित्रपट ‘पृथ्वीराज’ साठी हा चित्रपट तगडी स्पर्धा निर्माण करू शकतो. कारण त्याच दिवशी तेलुगू चित्रपट ‘मेजर’ हिंदीतही प्रदर्शित होत आहे.म्हणजेच आता 3 जूनला ‘मेजर’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘विक्रम’ हे तीन मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपापसांत भिडणार आहेत. तिन्ही चित्रपटांचे ट्रेलर पाहता ‘विक्रम’ या चित्रपटाचे पारडे जड आहे असे प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून दिसून येत आहे. काल ‘विक्रम’ चा ट्रेलर रिलीज झाल्याच्या तासाभरातच 10 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला.
हिंदी चित्रपटांच्या लोकप्रियतेत सातत्याने घट
भारतात आता हिंदीभाषिक भागात दक्षिण भारतीय चित्रपटांची लोकप्रियता सातत्याने वाढताना दिसून येत आहे. हिंदीत बनत असलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ’83’ या चित्रपटापासून सुरू झालेली ही मालिका याही वर्षी सुरू असून, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत अक्षय कुमारचा चित्रपट ‘बच्चन पांडे’, जॉन अब्राहमचा ‘अटॅक’, अजय देवगणचा ‘रनवे 34′, शाहिद कपूरचा ‘जर्सी’ आणि रणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ याच चित्रपटांना चांगली ओपनिंग आणि चांगला वीकेंड मिळाला आहे. हिंदी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांची हिंदी चित्रपटसृष्टीबद्दलची ही उदासीनता बघून हिंदी चित्रपटविश्वातील अस्वस्थता वाढते आहे. आता 3 जून रोजी दोन मोठे दक्षिण भारतीय चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने ही अस्वस्थता आणखी वाढली आहे.
‘धाकड’, ‘भूल भुलैया’ आणि ‘अनेक’ रांगेत
रणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’नंतर या महिन्यात आणखी तीन हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू यांचा ‘भूल भुलैया 2’ , कंगना राणौत आणि अर्जुन रामपालचा ‘धाकड’ हे चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत आहेत. आयुषमान खुरानाचा ‘अनेक’ पुढील आठवड्यात म्हणजेच महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. मात्र बॉक्स ऑफिसवर या मोसमातील सर्वात मोठा सामना ३ जून रोजी रंगणार आहे. तेलुगू आणि हिंदी अभिनेता अदिवी शेषच्या ‘मेजर’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये आधीच बरीच उत्सुकता आहे. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यावर आधारित चित्रपटाच्या ट्रेलर लाँचमध्ये, चित्रपटाचे निर्माते महेश बाबू यांनी हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल दिलेल्या विधानावरून गेल्या आठवड्यात बराच खळबळ उडाली होती.
हिंदी चित्रपटसृष्टीची आशा ‘पृथ्वीराज’वर
3 जून रोजी रिलीज होणारा ‘मेजर’ यशराज फिल्म्सचा पहिला ऐतिहासिक चित्रपट ‘पृथ्वीराज’ला आव्हान देईल. ‘पृथ्वीराज’मध्ये अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातून विश्वसुंदरी मानुषी छिल्लर चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. याशिवाय या चित्रपटात संजय दत्त, सोनू सूद आणि मानव विज यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटातील ‘हरी हर’ हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. ‘पृथ्वीराज’ चित्रपटासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात या गाण्याची खूप मदत झाली आहे.
आता या चित्रपटांपैकी कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाजी मारणार हे प्रेक्षकांच्या हातात आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje