Festival

मकरसंक्रांतीचे वाण म्हणजे नक्की काय, इत्यंभूत माहिती

Dipali Naphade  |  Jan 9, 2021
मकरसंक्रांतीचे वाण म्हणजे नक्की काय, इत्यंभूत माहिती

मकर संक्रांत (Makar Sankranti) म्हणजे ज्या दिवशी धनुर्मास संपतो. संक्रांत हा इंग्रजी नव्या वर्षाची सुरूवात झाल्यानंतर पहिला सण. तिळगूळ घ्या गोड गोड बोला असं म्हणत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी आवर्जून दिल्या जातात. तांदूळ आणि मूगडाळ खिचडीचा नेवैद्य दाखवायचा. थंडी असल्याने तीळ आणि गूळ (Tilgul) यांना महत्त्व असून यासारख्या उष्ण पदार्थांचे सेवन करण्याचा आणि पतंग उडविण्याचा  हा धमाल सण. पण सवाष्ण अर्थात लग्न झालेल्या बायकांसाठी हा सण तितकाच महत्त्वाचा आणि अगदी आवडीने वाट पाहायचा आहे. लग्नानंतरची पहिली संक्रांत तर खास असतेच. पण पहिली पाच वर्षे मकरसंक्रांतीचे वाण (Makarsankranti Vaan) दिले जाते.  आता नव्या पिढीतील मुलींना प्रश्न पडतो की मकरसंक्रांतीचे वाण म्हणजे नक्की काय? मकरसंक्रांतीचे वाणाची इत्यंभूत माहिती (Makar Sankranti Vaan Information) आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. 

म्हणून मकर संक्रांतीला असतं तिळाचं महत्त्व (Importance Of Sesame Seeds During Sankranti In Marathi)

मकरसंक्रांतीचे वाण म्हणजे काय

 

लग्नानंतरची पहिले पाच वर्ष हमखास वाण दिले जाते.  याला पाटवरचे वाण असंही म्हणतात. पण असं का तर त्यामागे कारण आहे. तिळगूळ, हळदकुंकू, तांदूळ, मूगडाळ, खारीक असे पदार्थ तीन सवाष्णीच्या घरी देवासमोर पाट मांडून  त्यावर ठेवण्यात येतात. या काळामध्ये रथसप्तमी येईपर्यंत हे वाणाचे देवाणघेवाण होत असते. आजही ही प्रथा चालू आहे. घरोघरी हळदीकुंकवाच्या कार्यक्रमांना लग्न  झालेल्या बायकांना अर्थात सवाष्ण (ज्यांचा नवरा हयात आहे अशा महिला) यांना निमंत्रण देण्यात  येते आणि त्यांना वाण म्हणून वस्तू देण्यात येतात. पूर्वी अगदी लहानपणी लग्न व्हायची. सून ही वयाने खूपच लहान असायची. त्यामुळे अशा सोहळ्यातून तिचे कौतुक आणि तिच्या मनाची मर्जी सांभाळण्यासाठी तिला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू द्यायचा आनंद आणि मैत्रिणींना  भेटण्याचा आनंद असायचा. म्हणून ही  मकरसंक्रांतीचे वाण लुटण्याची परंपरा सुरू झाली होती. आताही अनेकांना कामामुळे एकमेकींना भेटण्यासाठी वेळ काढता येत नाही. यानिमित्ताने एकमेकांशी भेट होते. लग्नाची पहिली पाच वर्षे ही याचमुळे अधिक आनंदाची ठरतात. यावेळी येणाऱ्यांना मकर संक्रांतीचे शुभेच्छा देत त्यांचे स्वागतही केले जाते.

मकर संक्रांतीला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात घ्या हे खास उखाणे

काय असावे वाण

घरोघरी होणाऱ्या हळदीकुंकवाला वाण लुटायला जाणे असंही म्हटले जाते.  काही ठिकाणी एकाच प्रकारचे वाण सर्वांना  दिले जाते कारण आता तितका वेळ नसतो.  मात्र पूर्वीपासून आधी बोलावण्यात आलेल्या महिलांच्या नावाच्या चिठ्ठ्या करून ठेवल्या जायच्या. सोरट अर्थात एका भांड्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू मांडून ठेवलेल्या असायच्या आणि त्या चिठ्ठ्यांमधून एक चिठ्ठी निवडून ज्या  वस्तूचे नाव येईल ती वस्तू घेऊन समोरच्या सवाष्णीला हळदकुंकू लाऊन तिच्या ओटीमध्ये द्यायचे असते. लग्नानंतरची पाच वर्षे वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू देण्यात येतात. सौभाग्यदानाच्या या वस्तू असल्यामुळेच याला वाण असे म्हणतात. सहसा वाण नक्की काय द्यायचे असा प्रश्न असतो. तर कुंकवाच्या डब्या, कंगवा, आरसे, बांगड्या, काळे मणी,  प्लास्टिक डबा अशा स्वरूपाच्या लग्न झालेल्या महिलांना उपयोगी ठरणाऱ्या वस्तू वाण म्हणून दिल्या जातात. याला ‘लुटायला जाणे’ असे का म्हणतात असाही प्रश्न बऱ्याच जणींना पडतो.  तर त्याचे उत्तर असे की, पहिल्या संक्रांतीच्या हळदकुंकवाच्या वेळी हळद आणि कुंकवाच्या राशी टेबलवर मांडलेल्या असतात आणि तुम्हाला हवं तितकं लूट करण्याची संधी देण्यात येते. त्यामुळे त्याला ‘वाण लुटायला जाणे’ असं म्हटलं जातं. तर नव्या सुनेला काळी साडी, हलव्याचे दागिने असं सजवले जाते. ही एक कला आहे आणि हे दागिने बनविण्याच्या स्पर्धाही होतात चक्क.  आपल्या कामातून वेळ काढून स्वतःसाठी वेळ देणे हा यामागचा खरा तर हेतू होता. यामागे कोणत्याही रूढी परंपरा नसून नव्याचे स्वागत करणे हाच हेतू आहे. यातून आनंद मिळविण्याचा निखळ हेतू असल्याने मकरसंक्रांतीचे हळदीकुंकू आणि वाण ही प्रथा पुढेही चालू ठेवण्यात आली आहे. 

संक्रांतीला वाण देण्याच्या लेटेस्ट आयडियाज

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Festival