झाडांची लागवड करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंडी किंवा प्लांटर होय. हल्ली घराचे सौंदर्य वाढावे म्हणून डेकोरेशनसाठी अनेक लोक बाल्कनीत गार्डन तयार करतात तसेच इनडोअर प्लांट्स लावतात. जर कुंडी किंवा प्लांटर छान असेल बागेचे आणि झाडाचेही सौंदर्य अनेक पटींनी वाढते. तुम्हाला बाजारात मातीच्या कुंडीपासून तर प्लास्टिकचे विविध प्रकारचे पॉट्स आणि सिमेंटचे प्लांटर्स असे अनेक प्रकारचे प्लांटर्स अगदी सहज मिळतील. परंतु जर तुम्ही वृक्ष प्रेमी असाल तर तुम्हाला विविध प्रकारचे प्लांटर्स खरेदी करण्यासाठी खूप पैसे खर्च करण्याची गरज नाही. जर तुम्हाला तुमच्या बागेचा परिसर वेगळ्या शैलीत सजवायचा असेल, तर घरी उपलब्ध असलेल्या काही गोष्टींच्या मदतीने तुम्ही अगदी सोप्या प्रकारे तुम्ही प्लांटर बनवू शकता. टाकाऊतून टिकाऊ बनवण्याची ही एक चांगली कल्पना आहे. चला तर बघूया घरच्या घरी प्लांटर बनवण्याच्या काही उत्तम कल्पना –
दह्याच्या भांड्यात लावा रोप
आपण अनेकदा बाजारातून रेडिमेड दह्याचे कप आणतो, जे संपल्यावर फेकून दिले जातात. पण जर तुम्हाला छोट्या जागेत काही रोपे लावायची असतील तर या दह्याच्या कपांची मदत घ्या. दह्याच्या डब्यात लहान रोपे लावण्यासाठी करण्यासाठी प्रथम ते पूर्णपणे स्वच्छ करावे लागेल आणि लहान छिद्रे करावी लागतील, जेणेकरून पाण्याचा निचरा होईल. आता तुम्ही त्यावर तुमच्या आवडीच्या रंगाचा पेंट स्प्रे करा आणि ते सजवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यावर काही डिझाइन्सही बनवू शकता. या प्लांटर मध्ये तुम्ही छोट्या औषधी वनस्पती लावू शकता.
बुक प्लांटर तयार करा
आपल्या सर्वांच्या घरी अनेक जुनी पुस्तके असतात, जी आपण रद्दीत देऊन टाकतो. पण तुम्हाला हवे असल्यास तुम्ही जुन्या जाड मोठ्या पुस्तकांपासून प्लांटर तयार करू शकता. यासाठी जुन्या पुस्तकांच्या मधोमध एक छिद्र करा आणि नंतर त्यात प्लॅस्टिकची शीट बसवा, जेणेकरून उर्वरित पुस्तक पाणी आणि घाणीमुळे खराब होणार नाही. त्यानंतर, एखादे छोटे रोप त्याच्या मूळ प्लांटरमधून काढून आणि पुस्तकात ठेवा. उरलेले प्लास्टिक काढून टाका आणि बुक प्लांटर स्वच्छ करा. तुमच्या लिव्हिंग रूममध्ये तसेच बेडरूममध्ये साईड टेबलवर बाजूला तुम्ही ते सहजपणे ठेवू शकता.
मेसन जार प्लांटर
जर तुम्हाला तुमच्या घरात काही वॉटर प्लांट्स किंवा लहान औषधी वनस्पती लावायच्या असतील तर अशा परिस्थितीत मेसन जार किंवा काचेच्या बरणीचा वापर प्लांटर म्हणूनही करता येईल. हे प्लांटर्स मोठे नसतात आणि लहान जागेसाठी एक चांगला पर्याय आहेत. तुम्ही त्यांना भिंतीवर देखील लावू शकता किंवा हँगिंग प्लांटर म्हणून तुमच्या घरातही लावू शकता.
प्लास्टिकच्या बाटलीत रोप लावा
आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात प्लास्टिकच्या बाटल्या नेहमीच असतात. कधी पाण्याची बाटली, कधी थंड पेय,तर सरबताचा बाटल्या प्रत्येकाच्याच घरी असतात ज्या काम झाल्यावर टाकून दिल्या जातात. परंतु आपण त्यांच्या मदतीने विविध प्रकारचे प्लांटर्स तयार करू शकतो. शेल्फसाठी प्लांटर बनवण्यासाठी तुम्ही बाटली मध्यभागी कापू शकता. तसेच जर तुम्हाला वॉल गार्डन बनवायचे असेल, तर एका आकाराच्या अनेक बाटल्या मध्यभागी कापून लाकडी रॅकवर दोरीच्या साहाय्याने लटकवा. आता तुम्ही त्यात अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती लावू शकता आणि तुमच्या घराला एक अनोखा लुक देऊ शकता.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक