आरोग्य

इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी तुमच्या दिनचर्येत हे बदल करा

Vaidehi Raje  |  Jun 2, 2022
insulin resistance

आपल्या शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी विविध हार्मोन्स कार्य करतात. यापैकी एक म्हणजे इन्सुलिन होय. इन्सुलिन हे एक आवश्यक संप्रेरक आहे जे अप्लाय शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. हे हार्मोन तुमच्या रक्तातील ग्लुकोज तुमच्या पेशींमध्ये जाण्यास मदत करते. परंतु जेव्हा शरीरातील पेशी इन्सुलिन प्रतिरोधक होतात, तेव्हा त्या इन्सुलिन प्रभावीपणे वापरू शकत नाहीत, ज्यामुळे रक्तातील साखर वाढते. त्यामुळे टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यता वाढते. तसेच जर रक्तातील साखर दीर्घकाळ जास्त असेल तर आपल्या अवयवांचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच शरीरातील इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारण्याची गरज असते. जाणून घ्या दिनचर्येत कुठले बदल करावेत जेणे करून शरीराची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी चांगली राहील. 

नियमित व्यायाम करा

नियमित व्यायाम हा इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा ते स्नायूंमध्ये ग्लुकोजचे हस्तांतरण करण्यास मदत करते आणि त्यामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारण्यास मदत होते. तुम्ही एरोबिक्स करत असाल किंवा किक बॉक्सिंग या दोन्हीमुळे इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढते. तसेच हे दोन्ही एकत्र केल्याने चांगले परिणाम मिळतात.

Insulin Resistance

वजन कमी करा

तुमचे वजन जास्त असल्यास टाइप 2 मधुमेहाचा धोका आणि इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढते. जास्त वजन, विशेषत: ओटीपोटावर चरबी साठली तर त्यामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी होते.पोटावरची चरबी असे हार्मोन्स बनवते जे स्नायू आणि यकृतामध्ये इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढवतात. म्हणूनच, जर तुम्हाला शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता नैसर्गिक पद्धतीने सुधारायची असेल, तर तुमचे अतिरिक्त वजन कमी करण्याचा प्रयत्न करा.

साखरेचे सेवन मर्यादित ठेवा 

साधारणपणे आपण आपल्या आहारातून दोन प्रकारची साखर घेतो. पहिली नैसर्गिक साखर आणि दुसरी ऍडेड शुगर. नैसर्गिक साखर अनेक प्रकारच्या वनस्पती आणि भाज्यांमध्ये आढळते, जी अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असते.तर ऍडेड शुगर ही उच्च प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये आढळते.तिचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. त्यामुळे अशा खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करावा, ज्यामध्ये नैसर्गिक साखर असते.

Insulin Resistance

आहारात सोल्युबल फायबरचा समावेश करा

फायबरचे सोल्युबल आणि इन्सोल्युबल असे दोन प्रकार असतात. इन्सोल्युबल फायबर मुख्यतः आतड्यांमधून मल हलविण्यात मदत करण्यासाठी कार्य करते. आणि सोल्युबल फायबर अनेक फायदे प्रदान करते – जसे की कोलेस्ट्रॉल कमी करणे आणि भूक कमी करणे. इतकेच नाही तर ते इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करते. हे तुमच्या आतड्यात चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढवते. तसेच निरोगी राहण्यासाठी आहारात अधिकाधिक फळे आणि भाज्यांचा समावेश करा. यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीर निरोगी राखण्यास मदत करतात. रंगीबेरंगी फळे आणि भाज्यांमध्ये अशी संयुगे असतात जी इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढविण्यास मदत करतात. 

Insulin Resistance

पुरेशी झोप घ्या 

उत्तम आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्वाचे आहे. झोपेच्या कमतरतेमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि अनेक प्रकारचे संसर्ग, हृदयरोग आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका लक्षणीयरित्या वाढतो. एवढेच नाही तर झोप न लागणे हे इन्सुलिनच्या सेन्सिटीव्हीशीही संबंधित आहे. जेव्हा तुम्हाला कमी झोप येते तेव्हा शरीराचा इन्सुलिन रेझिस्टन्स वाढू शकतो. तर चांगली झोप घेतल्याने शरीराची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढण्यास मदत होते.

Insulin Resistance

तणाव पातळी व्यवस्थापित करा

शरीरातील तणावाची पातळी नियंत्रित करून इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी देखील सुधारली जाऊ शकते. सततच्या तणावामुळे तुमच्या शरीरातील स्ट्रेस हार्मोन्सची पातळी वाढते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. एवढेच नव्हे तर स्ट्रेस हार्मोन्स शरीराला इन्सुलिन रेझिस्टंट बनवतात. स्ट्रेस हॉर्मोन्स कमी करण्यासाठी, आपण ध्यानधारणा, व्यायाम आणि झोप यांवर पुरेसे लक्ष दिले पाहिजे.

रोजच्या दिनचर्येत हे बदल केल्यास आपण शरीराची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवू शकतो.

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य