बॉलीवूड

लवकरच होणार ‘या’ स्टार किडची बॉलीवूडमध्ये एन्ट्री

Trupti Paradkar  |  Jun 9, 2022
लवकरच होणार ‘या’ स्टार किडची बॉलीवूडमध्ये एन्ट्री

खान घराण्यातील दोन पिढ्या बॉलीवूडमध्ये आहेत. सलमान, अरबाज आणि सोहेलनंतर आता त्यांची पुढची पिढी बॉलीवूडसाठी सज्ज होतेय. सध्या मलायका आणि अरबाजचा मुलगा अरहान खान बॉलीवूडमध्ये येणार अशी चर्चा सुरू आहे. वास्तविक खान घराण्यात असून, आईवडील दोघंही या इंडस्ट्रीमधले असूनही अरहान खान नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहिला. या वर्षी अनेक स्टार किड बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. त्यामुळे आता चाहत्यांना अरहाननेही बॉलीवूडमध्ये यावं असं वाटू लागलं आहे.  चाहत्यांच्या या मागणीवर अरहानची आई या नात्याने मलायका अरोराने एक स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाली मलायका

मलायका अरोराने अरहान खान लवकरच बॉलीवूडमध्ये एक हिरो म्हणून एन्ट्री करणार असं जाहीर केलं नसलं तरी तो यासाठी मेहनत घेत असल्याचं स्पष्ट केलं आहे. एका मुलाखतीत मलायकाने अरहान सध्या फिल्म प्रॉडक्शनचं शिक्षण घेत असल्याचं सांगितलं. याचा अर्थ तो लवकरच बॉलीवूडमध्ये अभिनय करेलच असं नाही, मात्र तो कदाचित दिग्दर्शक म्हणूनही बॉलीवूडमध्ये पदार्पण करू शकतो. ती म्हणाली, “माझा मुलगा सध्या फिल्म प्रॉडक्शनटचं शिक्षण घेत आहे, तो अजून लहान आहे,  त्यामुळे आता तो पुढे काय करेल हे सांगणं कठीण आहे. आता तर त्याचं वय असं आहे की त्याने अनेक गोष्टी शिकायला आणि पाहायला हव्या. चुका कराव्या आणि त्यातून शिकावं, आम्ही तो काय करणार हे सांगू शकलो नाही तरी त्याला वेळ पडेल तेव्हा मार्गदर्शन नक्कीच करू. अजून त्याला खूप मोठा प्रवास करायचा आहे” या शब्दांमध्ये तिने अरहान बॉलीवूडमध्ये करिअर करू शकतो अशी हिंट दिलेली आहे.

अरहान सध्या परदेशात घेतोय शिक्षण

अरहान हान मागच्या वर्षी परदेशात इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये फिल्म्स प्रॉडक्शनच्या शिक्षणासाठी गेला आहे. मलायका आणि अरबाज दोघंही त्याला विमानतळावर बाय करण्यासाठी गेले होते. त्यानंतर मलायकाने एका पोस्टमधून चाहत्यांना ही माहिती दिली होती की, “आम्ही दोघं एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहोत, थीडी भीती, उत्साह आणि नवीन काहितरी शिकण्याची इच्छा मनात आहे. मला तुझ्याबद्दल अभिमान आहे. कारण ही वेळ तुझ्यासाठी पंख पसरून उडण्याची आणि स्वतःची स्वप्न जगण्याची आहे”

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From बॉलीवूड