मनोरंजन

मन उडू उडू… मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकार झाले भावुक

Leenal Gawade  |  Jul 14, 2022
मालिका होणार बंद

मन उडू उडू झालं.. ही मराठीतील अत्यंत प्रसिद्ध अशी मालिका आता प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे. अशी बातमी सध्या वाऱ्यासारखी पसरली आहे. मालिका संपणार यासंदर्भात कोणतीही घोषणा झाली नसली तरी कलाकार सध्या पोस्ट करत असलेल्या पोस्टवरुन अनेकांनी अंदाज व्यक्त केला आहे. गेली अनेक दिवस या मालिकेत ह्रता दिसत नाही. शिवाय इंद्रा म्हणजेच या मालिकेतील कलाकार अजिंक्य राऊत याने एक पोस्ट केली आणि या चर्चेला जोरदार सुरुवात झाली आहे. खरंच ही मालिका निरोप घेणार आहे की यामध्ये काही बदल होणार आहेत. चला जाणून घेऊया या विषयी अधिक.

शूटवरील व्हिडिओ केला पोस्ट

 अजिंक्यने जो व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केला आहे त्यावरुन ही मालिका संपणार आहे. असा अंदाज बांधणे अत्यंत स्वाभाविक आहे. या मालिकेसंदर्भात कोणतीही घोषणा झाली नसली तरी अजिंक्यने या मालिकेचा शेवटचा सीन शूट करताना फार वाईट वाटत आहे. असे लिहिले आहे. अजिंक्यने हे इतक्या स्पष्ट लिहिल्यामुळे मालिका संपणार हे नक्की वाटत आहे. इतकेच काय तर या मालिकेत आई म्हणून भूमिका साकारणाऱ्या पूर्णिमा तळवळकर हिच्यासोबतही त्याने एक गोड व्हिडिओ पोस्ट करत तिचे आभार मानले आहे. आता आभार मानत अशा पद्धतीने पोस्ट केल्यामुळेच कदाचित ही मालिका बंद होत असावी असे दिसत आहे. दरम्यान या मालिकेत गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेची मुख्य कलाकार ह्रता ही दिसत नसल्यामुळे ही मालिका बंद होत आहे असे सांगितले जात आहे.

ह्रताने सोडली का मालिका

काही दिवसांपूर्वी ह्रताने (Hruta Durgule) मालिका सोडली अशी एक बातमी होती. सेटवरील अस्वच्छतेला कंटाळून तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय मालिकाकर्ते या कडे लक्ष देत नसल्याचीही तिची तक्रार होती. असे सांगण्यात येत होते. पण ह्रतानेच याचे उत्तर देत मी मालिका सोडलेली नाही. माझे कोणतेही वाद नाही. मी मालिका सोडली अशा अफवा असून यात काहीही तथ्य नसल्याचे तिने म्हटले होते. पण त्यानंतर ती मालिकेत फारशी दिसली नाही. मालिकेत न दिसण्यामागे तिचे लग्न आहे असेही सांगितले जात होते. पण तरीही तिने मालिका सोडली यावर अनेक जण ठाम होती. 

ह्रताचे नुकतेच झाले लग्न

मालिकेतील सगळ्यांचा आवडीचा चेहरा म्हणजे ह्रता… अनेक तरुणांचा क्रश आहे. तिच्या सौंदर्यावर अनेक जण फिदा आहेत. ती पुन्हा मालिकेत येणार म्हटल्यावर या मालिकेचा टीआरपी हा चांगला असणार यात काहीही शंका नव्हती. यात तिची आणि दिपू म्हणजेच अंजिक्य राऊतची केमिस्ट्रीही अनेकांना भावली होती. ही मालिका अनेक वर्षे चालावी अशीच फॅनची अपेक्षा असणार यात काही शंका नव्हती. पण ह्रताचा साखरपुडा आणि लग्न त्यानंतर मालिकेत अनेक एपिसोड्समध्ये ती दिसत नव्हती. तिचे लग्नही नुकतेच पार पडले असून तिने लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. जे खूपच सुंदर आहे. 

आता राहिला प्रश्न मालिकेचा… ती बंद झाली असली तरी देखील लोकांच्या मनात इंद्रा- दिपूची जागा तशीच राहणार आहे यात काहीही शंका नाही.

 

Read More From मनोरंजन