अभिनेत्री मानसी नाईक आणि आंतरराष्ट्रीय बॉक्स प्रदीप खरेरा यांचे गेल्या महिन्यातच लग्न झाले. दोघेही नेहमी आपल्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात आणि आपल्या आयुष्यातील गोष्टी शेअर करत असतात. मानसी आणि प्रदीपचे लग्न अगदी रॉयल पद्धतीने झाले होते. नुकतेच एका पुरस्कार सोहळ्यातही एकत्र दिसले होते. आता पहिल्यांदाच आपल्या नवऱ्यासह मानसी नाईक रोमँटिक व्हिडिओमध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे. इतकंच नाही तर अनेक वर्षांनी वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरासाज या जोडीला मिळाला आहे. सागरिका म्युझिक, वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर या त्यांच्या घरच्या कलाकारांच्या सुरेख गाण्यासह आपल्या “लव्ह सॉंग फेस्टिव्हल “चा ग्रँड फिनाले सादर करीत आहेत. निलेश मोहरीर यांनी “वाटेवरी मोगरा” या गाण्याची सुंदर रचना केली आहे. सागरिका म्युझिक सोबतच निलेशने आपल्या कारकिर्दीची सुरवात केली होती. श्रीपाद जोशी या आगामी प्रतिभावान गीतकाराने या गाण्याचे शब्द लिहिले आहेत.
प्रियदर्शन जाधवने शेअर केलेल्या फोटोचे गूढ सुटले, लव – सुलभचे पोस्टर प्रदर्शित
वैशाली आणि स्पप्नीलने 100 पेक्षा अधिक गाणी गायली
वैशाली आणि स्वप्नील ने सागरिका म्युझिकसाठी आतापर्यंत 100 हून अधिक गाणं गायिली आहेत आणि त्यात हे गाणं पहिल्या 10 मध्ये नक्कीच येईल. गाण्याचा ऑडिओ जर घरच्याच कलाकारांसोबाबत असेल तर व्हिडिओच्या बाबतीतही काही वेगळं नाही. या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन सागरिका दास यांनी केले आहे (ज्यांनी 50 हून अधिक म्युझिक व्हिडिओंचे दिग्दर्शन केले आहे ज्यात हळू हळू चाल , सावली उन्हामध्ये , मस्त चाललंय आमचं, राधा राधा या सारख्या व्हिडिओज चा समावेश आहे) जो मानसी नाईक जी एक घरचीच कलाकार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सागरीकाच्या अनेक व्हिडिओज मध्ये झळकलेली मानसी नाईक आता पूर्णपणे नवीन अवतारात “वाटेवरी मोगरा”मध्ये दिसणार आहे. मानसी नाईक चा आत्तापर्यंतचा हा पहिलाच रोमँटिक म्युझिक व्हिडिओ आहे. नवीनच लग्न झालेल्या मानसी सोबत तिचा नवरा प्रदीप खरेरा यात तिच्यासोबत असल्यामुळेच हा म्युझिक विडिओ अजूनच खास झाला आहे. यावर्षी 19 जानेवारीला मानसी ने प्रदीप खरेरा ( आंतरराष्ट्रीय बॉक्सर आणि अभिनेता ) यांच्याशी लग्न केले आणि या म्युझिक व्हिडिओतून ते पहिल्यांदाच एकत्रित दिसणार आहेत. निलेश मोहरीर चे सुमूधर संगीत, श्रीपाद जोशी यांचे सुंदर शब्द, वैशाली आणि स्वप्नीलचे अगदी वरच्या स्तरावरील गायन , सोबत सागरिका दास यांनी दिग्दर्शित केलेला ग्लॅमरस म्युझिक विडिओ आणि मानसी-प्रदीपचा रोमँटिक परफॉर्मन्स हे या म्युझिक व्हिडिओची खास वैशिष्ट्य आहे. 12 मार्चला सागरिका म्युझिकच्या मराठी यूट्यूब चॅनेलवर हे गाणे रिलीज होणार आहे.
सुशांतसिंह राजपूतला ड्रग्ज पुरवणारा गोव्यातून अटकेत
मानसी – प्रदीपची खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्री दिसणार प्रेक्षकांना
मानसी आणि प्रदीपची खऱ्या आयुष्यातल केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना या निमित्ताने दिसणार आहे. मानसी तिच्या नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. इतकंच नाही तर मानसी नेहमीच आपल्या हावभावांनी प्रेक्षकांना जिंकून घेते. त्यामुळे पहिल्यांदाच अशा रोमँटिक व्हिडिओमधून मानसीची एक वेगळी बाजू तिच्या चाहत्यांना बघायला मिळेल. शिवाय हल्ली मराठी रोमँटिक गाणी प्रेक्षकांनाही खूपच आवडू लागली आहेत. त्यामुळे आता या नव्या गाण्याला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद लाभेल हेदेखील पाहावे लागेल. मात्र सर्वांना या व्हिडिओला चांगला प्रतिसाद लाभेल अशीच आशा आहे.
महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकरावर आधारित बॉलीवूड गाणी
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade