बॉलीवूड

मानुषी छिल्लरने जॉन अब्राहमबरोबर सुरु केले ‘तेहरान’ चे शूटिंग

Vaidehi Raje  |  Jul 19, 2022
Tehran Manushi Chhillar

‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारी माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर आता तिच्या पुढील चित्रपटाच्या तयारीला लागली आहे. या चित्रपटात ती जॉन अब्राहमसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘तेहरान’ असे या चित्रपटाचे नाव आहे. मानुषीने जॉनसोबत चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. अलीकडेच, निर्मात्यांनी चित्रपटाच्या सेटवरून मानुषीचे फोटो शेअर केले आहेत. ती जॉन अब्राहमसोबत शूटिंग लोकेशनवर दिसली आहे.

शूटिंगला झाली सुरुवात 

अरुण गोपालन दिग्दर्शित तेहरान या चित्रपटातील जॉन अब्राहमचा फर्स्ट लूक यापूर्वीच समोर आला आहे. आता मानुषीचा लूकही समोर आला आहे, जो खूपच सुंदर आहे. मानुषीचे कास्टिंग केल्याची माहिती निर्मात्यांनी जाहीर केली आहे. फोटोंमध्ये मानुषी जॉन अब्राहमसोबत शूटिंग लोकेशनवर दिसत आहे.  दिनेश विजन या चित्रपटाची निर्मिती करत आहेत आणि चित्रपटाची कथा आशिष प्रकाश वर्मा यांनी लिहिली आहे.

या चित्रपटात मानुषीचा स्ट्रॉंग लूक 

निर्मात्यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये मानुषीचा लूक खूपच स्ट्रॉंग दिसतो आहे. ती जॉनसोबत उभी असलेली दिसत असून दोघांच्या हातात पिस्तूल आहेत. मानुषीची हेअरस्टाईलही खूप वेगळी आहे. या चित्रपटात मानुषी लहान केसांमध्ये दिसत आहे. जेव्हापासून निर्मात्यांनी ‘तेहरान’ चित्रपटाची घोषणा केली, तेव्हापासून हा चित्रपट चर्चेत आहे. आता या चित्रपटाशी संबंधित ही रंजक माहिती चाहत्यांचा उत्साह नक्कीच वाढवेल. या ऍक्शन थ्रिलर चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

मानुषी या चित्रपटातही दिसणार आहे

मानुषी छिल्लरने चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटात संयोगिताची भूमिका साकारली होती. तेहरान व्यतिरिक्त मानुषी लवकरच अभिनेता विकी कौशलसोबत ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’मध्ये दिसणार आहे. विश्वसुंदरी मानुषी छिल्लरने सम्राट पृथ्वीराजसोबत तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली, ज्यामध्ये ती मुख्य भूमिकेत म्हणजे राणी संयोगिताच्या भूमिकेत दिसली. अक्षय कुमार सारख्या मोठ्या हिरोसोबत पहिला चित्रपट मिळणे ही खरोखरच भाग्याची गोष्ट आहे. पण एवढा मोठा स्टार असूनही हा चित्रपट फ्लॉप ठरला. ज्याचा ठपका अक्षय कुमारच्या माथी फोडण्यात आला. पण पहिलाच चित्रपट सुपर फ्लॉप ठरला असूनही मानुषी छिल्लरला आणखी एका मोठ्या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून साईन करण्यात आले आहे.

आता तेहरानची प्रतीक्षा 

मानुषी छिल्लर आता जॉन अब्राहमसोबत तेहरानमध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तेहरान हा अ‍ॅक्शनने भरलेला चित्रपट आहे, त्यामुळे मानुषीही यात धमाकेदार ऍक्शन करताना दिसणार आहे. आधी संयोगिताच्या भूमिकेत बघितल्यामुळे आता पँट शर्ट घातलेली आणि लहान केसांमध्ये दिसणारी मानुषी खूपच वेगळी वाटतेय. 

मानुषी छिल्लरने २०१७ मध्ये मिस वर्ल्ड बनून इतिहास रचला. सौंदर्य स्पर्धा जिंकण्यापूर्वी ती मॉडेल होती, तर विश्वसुंदरीचा किताब जिंकल्यावर तिने तिचा पहिला चित्रपट, सम्राट पृथ्वीराज साइन केला, ज्यामध्ये अक्षय कुमारने मुख्य भूमिका केली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला, त्यामुळे सोशल मीडियावर बराच गदारोळ झाला. या चित्रपटासाठी आवश्यक असलेले समर्पण अक्षयने दाखवले नसल्याचे सांगण्यात आले. परिणामी चित्रपट फ्लॉप झाला. यावरून मानुषीला खूप ट्रोलही करण्यात आले होते.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From बॉलीवूड