मनोरंजन

मराठमोळा अभिनेता घेऊन येत आहे ओटीटी प्लॅटफॉर्म

Leenal Gawade  |  Aug 5, 2021
स्वप्निल जोशी

 कोव्हिडमुळे सध्या सगळ्याच मनोरंजन क्षेत्राला खूप मोठा धक्का बसलेला आहे. चित्रपट रिलीज करण्यासाठी थिएटर सुरु नसल्यामुळे  चित्रपट रिलीज करण्यासाठी ओटीटी शिवाय कोणताही नवा मार्ग नाही. सध्याच्या या काळात सगळ्यां मनोरंजन सृष्टीचे भविष्य हे ओटीटीवर अवलंबून आहे.  त्यामुळे सगळ्याच्यांच फोनमध्ये ओटीटीचे अनेक पर्याय आहेत. अनेक बड्या लोकांनी ओटीटी प्लॅटफॉर्म सुरु केला आहेत. आता याओटीटीमध्ये आणखी एकाची भर पडणार आहे.  कारण एक मराठी अभिनेता लवकरच एक नवाकोरा ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन येणार आहे. जाणून घेऊया याविषयी अधिक

हृता दुर्गुळे परत येतेय, नवी मालिका नवा लुक

 असे असेल हे ओटीटी 

मिळालेल्या माहितीनुसार मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्निल जोशी आणि बिझनेसमन नरेंद्र फिरोदिया हे एकत्रितपणे ओव्हर द टॉप ( ओटीटी) नावाचा प्लॅटफॉर्म सुरु करणार आहे. या प्लॅटफॉर्मवर मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली अशा प्रादेशिक भाषांमध्ये या सीरिज दाखवल्या जाणार आहे. त्यामुळे हा ओटीटी भारताचा ओटीटी ठरेल असा विश्वास आहे.  या प्लॅटफॉर्मच्या माध्यामातून सीरिज, मालिका, चित्रपट असे सगळे काही दाखवले जाणार आहे. घरबसल्या मनोरंजनात्मक गोष्टीचा आनंद सगळ्यांना घेता येणार आहे.  ‘टामोरा डीजीवर्ल्ड’या कंपनीचा हा प्रोजेक्ट असून तो लवकरच सगळ्यांचे मनोरंजन करणार आहे. 

 देशासाठी एकत्र

सध्याच्या काळात भारत हा ओटीटीसाठी सगळ्यात मोठी अशी बाजारपेठ आहे. मनोरंजनाचे साधन म्हणून याचा अधिकाधिक वापर केला जातो. तयामुळेच स्वप्निल आण नरेंद्र यांनी एकत्रितपणे हे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी स्वप्निल म्हणाला की, “एक कलाकार म्हणून काहीतरी वेगळे करायला हवे, असे मनात सतत घोळत होते आणि त्यातून ओटीटी व्यासपीठ सुरु करावे असा विचार गेली दीड वर्षे मनात होता. याच प्रक्रियेत मग ‘टामोरा डीजीवर्ल्ड’ या कंपनीची स्थापना झाली. त्यासाठी काही समविचारी मित्र एकत्र आलो. आम्हाला लोकांना एक चांगले ओटीटी व्यासपीठ द्यायचे होते. दरम्यानच्या काळात, या प्रकल्पाबद्दल मी नरेंद्र फिरोदिया यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांच्याबरोबर माझे गेल्या कित्येक वर्षांचे संबंध आहेत. त्यांची आणि माझी व्यवसाय महत्वाकांक्षा, तत्त्वे अशा सर्वचपातळ्यांवर वेव्हलेन्थ जुळते. ओटीटीबद्दल चर्चा करत असताना त्यांनी मला सांगितले की त्यांनीही ‘लेट्सफ्लिक्स’ या ओटीटीची योजना आखली असून त्यावर ते प्रादेशिक भाषांमधील कार्यक्रम दाखवणार आहेत. आम्ही त्याबाबत चर्चा केली आणि त्यानंतर दोघांनीही एकत्र येण्याचे ठरवले. दोन्ही प्रकल्प एकत्र करून मोठ्या प्रमाणावर ओटीटी व्यासपीठ दाखल करायचे ठरले,” असे स्वप्निल याने सांगितले

हिरोची एन्ट्री झाली’ म्हणत उर्मिला निंबाळकरने शेअर केली खुशखबर

एकमेकांबरोबर स्पर्धा करण्यापेक्षा स्वप्निल आणि त्यांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणावर हे व्यासपीठ सुरु करायचे असे ठरवले. “लॉकडाऊनमध्ये कित्येक ओटीटी प्लटफॉर्म सुरु झाले आणि विविध प्रकारचे कार्यक्रम त्यांच्यावर दाखवले जात आहेत. ओटीटीवरील कॉन्टेटसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ असून गेल्या काही वर्षांमध्ये ही बाब सिद्ध झाली आहे. या व्यासपीठांवर प्रादेशिक भाषांमधील कार्यक्रमांना योग्य ते प्रतिनिधित्व मिळत नसल्याने आम्ही ‘लेट्सफ्लिक्स’सुरु करायचे ठरवले. भारतीय भाषांमधील चित्रपट, मालिका, कार्यक्रम त्यावर दाखाविण्याचा विचार होता. पण ‘लेट्सफ्लिक्स’ची घोषणा केल्यानंतर आणि त्याची सुरुवात करण्याची तयारी सुरु असतना तशाचप्रकारचा विचार स्वप्निल जोशी करत असल्याचे मला समजले. मग आम्ही भेटलो आणि मग विचार पक्का झाला की, एकमेकांबरोबर स्पर्धा करण्यापेक्षा एकत्रित येऊन अधिक भव्य प्रमाणात ओटीटी व्यासपीठ सुरु करायचे,

नरेंद्र फिरोदिया

अधांतरी’ लवकरच भेटीला, सिद्धार्थ चांदेकर, पर्ण पेठे, विराजस कुलकर्णी, आरोह वेलणकर करणार ‘हंगामा’,

Read More From मनोरंजन