बॉलीवूड

पूरग्रस्तांसाठी सेलिब्रेटीजचा ‘मदतीचा हात’

Trupti Paradkar  |  Aug 12, 2019
पूरग्रस्तांसाठी सेलिब्रेटीजचा ‘मदतीचा हात’

महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगलीत आलेल्या महापूरामुळे अनेकांचे संसार उधवस्त झाले. पूराचं पाणी ओसरू लागल्यावर आता पूरग्रस्तांचं जनजीवन सुरळीत करण्यासाठी सगळीकडून मदतीचा हात पुढे झाला आहे. मराठी कलाकारदेखील या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. काही कलाकारांनी यासाठी रोख रक्कम तर काहींनी जीवनावश्यक वस्तू गोळा करून आपल्या पूरग्रस्त बांधवांना मदत पाठवण्यासाठी कंबर कसली आहे. शक्य असेल तितकी मदत करून आपण आपल्या या बांधवांचे जनजीवन पुन्हा सुरळीत करू शकतो. कलाकारांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन केल्यामुळे मदतीचा ओघ वाढू लागला आहे. ज्यामुळे लवकरच कोल्हापूर आणि सांगलीतील जीवन पुन्हा सुरळीत होण्यास नक्कीच मदत होऊ शकते. शिवाय त्या संकटप्रसंगी जे या लोकांनी भोगलं ते तर आपण नक्कीच कमी करू शकत नाही. मात्र आता जीवनावश्यक गोष्टींचा पूरवठा  करून आपण त्यांचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो अशी आशा या कलाकारांनी व्यक्त केली आहे. 

माऊलीने केली 25 लाखांची मदत

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि महाराष्ट्राचा माऊली अर्थात रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया यांनी पुरग्रस्तांसाठी 25 लाखांची मदत केली आहे. बॉलीवूडमधून त्याने पुढाकार घेत हा मदतीचा हात आपल्या महाराष्ट्रातील बांधवांसाठी पुढे केला आहे. रितेश आणि जेनेलिया यांनी नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुख्यंमत्री मदत निधीसाठी हा चेक दिला आहे.

मराठी कलाकार देत आहेत पुरग्रस्तांना आधार

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळानेही मदत गोळा करण्यास सुरूवात केली आहे. मांटुगा येथील यशवंत नाट्यमंदिर, ठाण्यातील गडकरी रंगायतन आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, कल्याणच्या अत्रे नाट्यगृह, पुण्यातील काही मदत केंद्रांवर जीवनावश्यक गोष्टी गोळा केल्या जात आहेत. ही मदत केंद्र 14 ऑगस्ट पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी मदत गोळा करण्याचं आवाहन केलं जात आहे. या ठिकाणी आतापर्यंत पाण्याच्या बाटल्या, तेल, मीठ, धान्य, दुधाची पावडर, बिस्किटे, चादरी, औषधे, कपडे, सॅनिटरी पॅड अशा जीवनावश्यक गोष्टी गोळा केल्या जात आहेत. 

यासाठी कलाकार, निर्माते, रंगमंच कामगार स्वतः मदत गोळा करण्याचं काम करत आहेत. काही कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या मदतीसाठी सर्वसामान्य जनतेला आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ चारी बाजूंनी या ठिकाणी येत आहे. 

काही कलाकारांनी तर त्यांचं नाट्यप्रयोगाचं उत्पन्नही पुरग्रस्तांच्या मदतीसाठी जाहीर केलं आहे. 18 ऑगस्टला दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये होणाऱ्या वॅक्युम क्लिनर आणि अश्रुंची झाली फुले या नाटकांचं उत्पन्न पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे. 

कलाकारांचे सर्वसामान्य जनतेला आवाहन

अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना या मदतीसाठी आवाहन केलं आहे. कलाकारांना सोशल मीडियावर अनेक चाहते फॉलो करत  असतात. या माध्यमातून मदतीचा हात मागितल्यामुळे अनेक जण मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. 

अजिंक्य रहाणेने केली मदत

भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणेने केवळ स्वतःच मदत केली नसून त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर बांधवांना यासाठी आवाहन केले आहे. या माध्यमातून प्रत्येकाने पूरग्रस्तांना शक्य तितकी मदत करावी असं आवाहन केलं आहे. 

अधिक वाचा

वेबसिरीजचे चाहते असाल तर या 5 वेबसिरीज तुम्ही पाहिल्यात का?

भारतीय फॅन्सची सर्वात जास्त पसंती Iron Man ला

जेनेलिया देशमुख ‘या’ अभिनेत्यासोबत पुन्हा करतेय ‘कमबॅक’

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम 

Read More From बॉलीवूड