मनोरंजन

या अभिनेत्री केवळ सौंदर्याची खाण नाहीत, तर हातात आहे कला

Dipali Naphade  |  Apr 28, 2021
या अभिनेत्री केवळ सौंदर्याची खाण नाहीत, तर हातात आहे कला

अनेक अभिनेते अथवा अभिनेत्री अशा आहेत ज्यांच्याकडे अनेक दुसऱ्या कला आहेत. अशाच काही मराठी अभिनेत्री आहेत ज्यांच्या अन्य कला लॉकडाऊनच्या काळात पाहायला मिळाल्या आहेत. केवळ सौंदर्याने आणि अभिनयानेच या अभिनेत्रींनी प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं नाही तर आपल्यातील टॅलेंटच्या जोरावर या अभिनेत्री आज इथपर्यंत पोहचल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. सध्या लॉकडाऊनमुळे सर्वच काम बंद आहे. चित्रीकरण बंद आहे. त्यामुळे मिळालेला वेळ सत्कारणी लावत काही अभिनेत्रींनी आपली कला जोपासली आहे. मराठी मालिका आणि चित्रपटातील या अभिनेत्री या केवळ सौंदर्याची खाणच नाहीत तर त्यांच्याकडे कलाही आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे. 

अभिनेत्री मयुरी देशमुखचा दुसऱ्या लग्नाबाबत निर्णय, दिले उत्तर

सायली संजीव

अनेक चित्रपट आणि मालिकांमधून सायली संजीवला आपण पाहिले आहे. अत्यंत सालस, निरागस असा चेहरा असणाऱ्या सायलीचे अनेक चाहते आहेत. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून गौरी म्हणून प्रसिद्ध झालेल्या सायलीने खूपच कमी वेळात यश प्राप्त केले आहे. सायलीने काही दिवसांपूर्वी वारली पेंटिंग करत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता. सायलीने आपल्या घराच्या भिंतीवर अत्यंत सुंदर वारली पेटिंग काढली आहे. हे पेटिंग पाहून सायली यामध्ये अगदी मास्टर असल्याचे दिसून येत आहे. अत्यंत सुंदर अशी कलाकृती सायलीने केली असून तिच्या चाहत्यांनाही ही पेंटिंग खूपच आवडली आहेत. या व्हिडिओला लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव झाला आहे. सायली सध्या सुयश टिळकसह मालिकेत काम करत असून तिचे अनेक मराठी चित्रपटही येत आहेत. दरम्यान आता असा पुढचा नक्की कोणता व्हिडिओ पाहायला मिळणार या प्रतिक्षेत सायलीचे चाहते आहेत. तिने अशा प्रकारे अधिकाधिक पेंटिंग करावी अशीही इच्छा काही चाहत्यांनी व्यक्त केली आहे. 

प्रार्थना बेहेरे

प्रार्थना नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. अनेक मराठी चित्रपटांमधून प्रार्थना प्रेक्षकांच्या समोर आली आहे. सध्या प्रार्थना लॉकडाऊनमध्ये आपला चित्रकलेचा छंद जोपासतना दिसून येत आहे. प्रार्थनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही व्हिडिओ पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये तिने सुंदर चित्र काढत तिच्या घराची भिंत सजवली आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये चाहत्यांना तिची कलाकुसर दिसून येत आहे. तिने टेबलक्लॉथवर काढलेले फुलांचे डिझाईनही तितकेच सुंदर आहे. उत्तम रंगसंगती आणि अप्रतिम चित्रकला याचा सुंदर मेळ प्रार्थनाच्या व्हिडिओमधून दिसून येत आहे. केवळ उत्तम अभिनेत्रीच नाही तर आपल्यातील ही कला दाखवून प्रार्थनाने तिच्या चाहत्यांना अधिक आनंदी केले आहे. 

कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले अडकले लग्नाच्या बेडीत

अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर एक उत्तम अभिनेत्री आहे हे तिने सिद्ध केलेच आहे. शेवंताच्या भूमिकेने अपूर्वा घराघरात पोहचली. पण अपूर्वा त्याचबरोबर एक उत्तम ज्वेलरी डिझाईनर आणि चित्रकारही आहे. सध्या लॉकडाऊनमध्ये अपूर्वा आपल्यातील कलेला जोपासत उत्तमोत्तम चित्र काढत आहे. याशिवाय तिने इतकी चित्र काढली आहेत की त्यासाठी एक वेगळे सोशल मीडिया अकाऊंटही तयार केले आहे. अपूर्वाचे पेंटिंग्ज पाहण्यासाठी तुम्हाला या मीडिया अकाऊंटला फॉलो करावे लागेल. पण अपूर्वाने काढलेले चित्र अप्रतिम असून अगदी रोजच्या जगण्यातील आहे. मनाला भावणारी चित्रकला अपूर्वाने केलेली दिसून येत आहे. म्हणूनच तिचे चाहते अधिक आनंदी झाले असून त्यांना तिची ही कला भावली आहे.

तेजस्विनीनंतर आस्ताद काळेने सरकारवर ओढले ताशेरे, पोस्ट व्हायरल

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन