फिल्मफेअर हा अत्यंत मानाचा पुरस्कार समजला जातो आणि ही ब्लॅक लेडी आपल्याकडे असावी असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. नुकताच मुंबईमध्ये मराठी चित्रपट क्षेत्रातील फिल्मफेअर पुरस्कार संपन्न झाला. 28 फेब्रुवारी रोजी हा सोहळा पार पडला. मुंबईमधील सेंट अँड्यू ऑडिटोरियममध्ये आयोजित ‘प्लॅनेट मराठी’ प्रस्तुत पाचव्या फिल्मफेअर पुरस्कार मराठी 2020 सोहळ्यात पुन्हा एकदा ब्लॅक लेडी अवतरुन सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलाकारांना प्राप्त झाली आहे. कोणते कलाकारा भाग्यशाली ठरले आणि कोणी मारली बाजी याची संपूर्ण यादी तुम्हाला आम्ही देत आहोत. या सोहळ्याला संपूर्ण मराठी इंडस्ट्री लोटली होती.
नामांकित मंडळींची उपस्थिती
ग्लॅमरने भरगच्च भरलेल्या या उत्सव सोहळ्याच्या रेड कार्पेटवर मराठी चित्रपट उद्योगातील बहुचर्चित आणि नामांकित मंडळींची उपस्थिती होती. मानसी नाईक, क्रांती रेडकर-वानखेडे, पूजा सावंत, साई देवधर, अमृता खानविलकर, अमृता सुभाष, श्वेता शिंदे, मंजिरी ओक, रुपाली भोसले, वर्षा उसगावकर, मुक्ता बर्वे, आदिती सारंगधर, सोनाली कुलकर्णी, मिथीली पालका यांच्यासारख्या लोभस सौंदर्यवती अभिनेत्रींनी त्यांच्या दिलखेचक पेहराव आणि स्टाईलच्या माध्यमातून समारंभाची शोभा वाढवली. बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रानेदेखील आपल्या सौंदर्याने या सोहळ्यात सर्वांना घायाळ करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे-विज, मृणाल कुलकर्णी, नीना कुलकर्णी, निशीगंधा वाड यांनीही आपल्या सदाबहार सौंदर्याने सोहळ्याचे रेड कार्पेट आणखी चमकदार बनवले.
दुसर्या बाजूला शरद केळकर, वैभव तत्ववादी, गष्मीर महाजनी, प्रसाद ओक, पुष्कर जोग, शुभांकर तावडे, सचिन पिळगावकर, सुबोध भावे यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांसह राकट डब्ल्यूबीसी पैलवान प्रदीप खरेरा आणि लेखक निरंजन अय्यंगार यांनीही आपल्या करिश्माई व्यक्तिमत्वाची छाप सोहळ्यास उपस्थित प्रेक्षकांवर आपली छाप पाडली. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह गायक आदर्श शिंदे, संगीतकार अनू मलिक यांनीही हा पुरस्कार सोहळा संस्मरणीय बनवण्यात आपले योगदान दिले.
अंकुश चौधरीची नवी भूमिका, गुंतवणूकदार म्हणून लेटफ्लिक्समध्ये प्रवेश
आनंदी गोपाळ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट
सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवणार्या ‘आनंदी गोपाळ’ ला पुरस्कार सोहळ्यात उत्स्फुर्तपणे दाद देण्यात आली. ‘बाबा’ साठी दीपक दोब्रियालला प्रमुख भूमिकेतील सर्वोत्तम अभिनेत्याचा तर मुक्ता बर्वेला आनंदी गोपाळमधील प्रमुख भूमिकेतील सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आल्यामुळे त्यांचे स्वप्न सत्यात अवतरले.
पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन अमेय वाघ, सिध्दार्थ जाधव आणि मोनिका मूर्ती यांनी केले. त्यांनी आपल्या खास विनोदी आणि मनमोकळ्या शैलीत प्रेक्षकांना मनुमुराद हसवत सोहळा संस्मरणीय बनवण्यात आपले मोलाचे योगदान दिले. या जादुई संध्येमध्ये अनेक मराठी सुपरस्टार कलाकारांनी आपला दिमाखदार परर्फार्मन्सही सादर केला. वैभव तत्ववादीने हिट मराठी गाण्यांवर आपल्या नृत्यकलेचे सादरीकरण केले. मानसी नाईकने नोरा फतेहीची चार्टबर्स्टर्स नृत्ये हुबेहुब साकारली. अमृता खानविलकरने माधुरी दीक्षिततच्या एव्हरग्रीन नृत्यांना नव्याने उजाळा देत आपले कौशल्य पुन्हा एकदा दाखवून दिले. दुसरीकडे सोनाली कुलकर्णीने शाहरुख खानसह इतर अभिनेत्यांना सन्मान देत अनोखे सादरीकरण केले. पूजा सावंत आणि गष्मीर महाजनी यांनी हिट रोमँटिक गाण्यांवर पदलालित्य दाखवून आपल्यातील अविश्वसनीय केमिस्ट्री दाखवून दिली.
परफेक्ट बिकिनी बॉडीसाठी निया शर्मा होती दोन दिवस उपाशी
विजेत्यांची यादी
सर्वोत्कृष्ट चित्रपट: आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: समीर विद्वांस – आनंदी गोपाळ
प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष): दीपक डोबरियाल – बाबा
प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेता (स्त्री): मुक्ता बर्वे – आनंदी गोपाळ
सहाय्यक भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष): शशांक शेंडे – कागर
सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता (स्त्री): नीना कुलकर्णी – मोगरा फुलला
सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम: सौरभ भालेराव, हृषिकेश दातार आणि जसराज जोशी – आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट गीत: क्षितिज पटवर्धन – तुला जपणार आहे (खारी बिस्किट)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष): आदर्श शिंदे – तुला जपणार आहे (खारी बिस्किट)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक सिंगर (महिला): शाल्मली खोलगडे– क्वेरीडा क्वेरिडा (मैत्रीण)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (स्त्री): शिवानी सुर्वे – ट्रिपल सीट
सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष): शुभंकर तावडे – कागर
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक: सलील कुलकर्णी – वेडिंगचा शिनेमा
सर्वोत्कृष्ट बाल कलाकार: आदर्श करम आणि वेदश्री खाडिलकर – खारी बिस्किट
सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी समीक्षकांचा पुरस्कार): राज आर गुप्ता – बाबा
समीक्षकांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी पुरस्कार (पुरुष): ललित प्रभाकर – आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी समीक्षकांचा पुरस्कारः सोनाली कुलकर्णी (हिरकणी) आणि भाग्यश्री मिलिंद (आनंदी गोपाळ)
एक्सलन्स इन सिनेमा : महेश कोठारे
तांत्रिक पुरस्कार
सर्वोत्कृष्ट मूळ कथा: मनीष सिंह – बाबा
सर्वोत्कृष्ट पटकथा: करण शर्मा – आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट संवादः इरावती कर्णिक – आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइनः सुनील निगवेकर आणि निलेश वाघ – आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण: आकाश अग्रवाल – आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट संपादन: चारुशी रॉय – आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोर: सौरभ भालेराव – मैत्रीण
सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइनः निखिल लांजेकर आणि हिमांशु आंबेकर – फत्तेशिकस्त
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन: राहुल ठोंबरे आणि संजीव हवालदार (माझी स्टोरी क्यूट वाली स्वीट वाली वाली लव्ह स्टोरी – गर्लफ्रेंड)
सर्वोत्कृष्ट पोशाख डिझाइन – पौर्णिमा ओक – फत्तेशिकस्त
शिव ठाकरेच्या नव्या फोटोची सगळ्या सोशल मीडियावर चर्चा
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade