विनोदाची मेजवानी हे महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांसाठी नेहमीच पर्वणी ठरली आहे. अशाच मनोरंजनाची आणि हास्याची मेजवानी ‘झोलझाल’ या चित्रपटातून रसिकांच्या भेटीला घेऊन येण्यास ‘युक्ती इंटरनॅशनल प्रॉडक्शन’ सज्ज होत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर (Poster) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर, दादर येथे चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात आले. चित्रपटगृहात प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास हा चित्रपट येत्या 1 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात सज्ज होत आहे.
कलाकारांची मंदियाळी
‘झोलझाल’ चित्रपटाचे पोस्टर पाहता चित्रपटात विविधांगी भूमिका साकारलेल्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळतेय. हास्याची कारंजे घेऊन हे कलाकार रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घ्यायला येत्या 1 जुलैला येत आहेत. या चित्रपटात मंगेश देसाई (Mangesh Desai), मनोज जोशी (Manoj Joshi), अजिंक्य देव (Ajinkya Deo), कुशल बद्रिके (Kushal Badrike), भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure), अमोल कागणे (Amol Kagane), सयाजी शिंदे (Sayaji Shinde), उदय नेने, उदय टिकेकर (Uday Tikekar), प्रीतम कागणे, इशा अग्रवाल, अलिशा फरेर, सुप्रिया कर्णिक (Supriya Karnik), प्रियांका खोलगडे, साईशा पाठक हे सिनेकलाकार साकारणार असून या कलाकारांच्या भूमिका या निव्वळ पर्वणीच ठरतील यांत शंकाच नाही. अमोल लक्ष्मण कागणे आणि लक्ष्मण एकनाथ कागणे प्रस्तुत ‘रोलींगडाईस’ असोसिएशन सोबत ‘युक्ती इंटरनॅशनल प्रोडक्शन’ अंर्तगत ‘झोलझाल’ चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस येत आहे. दिग्दर्शक मानस कुमार दास यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून निर्माता गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता, संजना अग्रवाल यांनी केली आहे. सहनिर्माते म्हणून रश्मी अग्रवाल आणि विनय अग्रवाल यांनी बाजू सांभाळली असून चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद मानस कुमार, संजीव सोनी आणि आनंद गुप्ता लिखित आहेत. तर चित्रपटाच्या संगीताची बाजू प्रफुल-स्वप्नील आणि ललित रामचंद्र यांनी उत्तमरित्या पेलली आहे. अमेय खोपकर यांनी चित्रपटाचे वितरक म्हणून जबाबदारी पेलली आहे. नुकत्याच समोर आलेल्या पोस्टरवरील या मल्टीस्टारर चित्रपटात नक्की झोल कोण करतंय? आणि काय झोल करतंय ? हे पाहण्यासाठी येत्या 1 जुलैला चित्रपटगृहातच जावे लागेल.
पोस्टरवरून चित्रपट धमाल असेल असा अंदाज
नावावरून आणि चित्रपटाच्या पोस्टरवरून हा चित्रपट नक्कीच धमाल असणार असा अंदाज लावला जात आहे. यामध्ये अनेक नावाजलेले कलाकार असल्यामुळेही नक्की कोणाच्या कोणत्या भूमिका आहेत आणि प्रेक्षकांना काय काय पाहायला मिळणार आहे याचीही उत्सुकता आता लागून राहिली आहे. या चित्रपटाचा नक्की स्टोरी प्लॉट काय आहे आणि कोण कोणासाठी काय झोलझाल करणार आहे हे आता लवकरच कळेल. त्यासाठी आता काही दिवसच प्रेक्षकांना प्रतिक्षा करावी लागणार आहे. लवकरच या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यामुळे यावरून प्रेक्षकांना अंदाज लावणं सोपं होईल. पण अनेक दिवसांनी असा मल्टीस्टारर चित्रपट मराठीमध्ये येत आहे याचाही नक्कीच सिनेरसिकांना आनंद झाला आहे. दरम्यान याची कथा काय असणार आणि काय काय धमाल पाहायला मिळणार यासाठी नक्कीच आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. मात्र त्यासाठी अजून थोडा वेळ वाट पाहायला लागणार हे नक्की!
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade