टीव्हीवर मालिका पाहण्याचा छंद अनेकांना असतो. काही मालिका लोक पसंतीस इतक्या उतरतात की, त्यांची प्रसिद्धीच्या शीगेवर जाऊन पोहोचते. पण प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच या मालिकांमध्ये इतके बदल होतात आणि त्या इतक्या लांबवल्या जातात की, लोकांनाही मग त्याचा कंटाळा येऊ लागतो. मराठीमध्ये अशा काही मालिका आहेत त्यांची सुरुवात फारच सुंदर झाली. या मालिकांचा आशय आणि स्टोरी ट्रॅक चांगला असताना अचानक या मालिकांमध्ये इतके बदल करण्यात आले की या मालिका रटाळ वाटू लागल्या आहेत. जाणून घेऊया मराठीतील अशाच काही रटाळ मालिका
Bigg Boss 14: राहुल वैद्य आणि दिशा करणार या महिन्यात लग्न, आईने केला खुलासा
माझ्या नवऱ्याची बायको
या मालिकेबद्दल काय बोलावे कळतच नाही? ही मालिका दिवसेंदिवस अशा ट्रॅकवर पोहोचली आहे. जो ट्रॅक कदाचित लोकांनाही नकोसा झाला. गुरुनाथचे अफेअर त्याच्या आयुष्यात आलेली शनाया आणि गुरुची बायको राधिकाचा शोधाचा शोध घेणे आणि यशस्वी उद्योजिका होणे हा प्रवास खरंच खूप सुंदर होता. पण या मालिकेत सतत काड्या घालणारा गुरु काही सुधारताना दिसत नाही. त्याच्या आयुष्यातील शनाया जात नाही तोच माया नावाचे पात्र येते. हे पात्र ही या मालिकेत कारण नसताना इतके ताणले जाते की, आता बस्सं करा असेच म्हणावे लागते. त्यामुळे आता या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेणेच योग्य आहे.
बॉलीवूड सुपरस्टार्स ज्यांनी हॉलीवूड चित्रपटांना दिला नकार
अग्गंबाई सासूबाई
सासूचं दुसरं लग्न असा आशय घेऊन सुरु झालेली मालिका अगदी आता आतापर्यंत व्यवस्थित ट्रॅकवर होती. पण आता या मालिकेने ट्रॅक सोडायला सुरुवात केली आहे. आपल्या चुकिची जाणीव होऊनही सोहम या पात्राला आणखी भरकटवण्याचे काम सध्या मालिकेमध्ये सुरु आहे. सगळं काही आलबेल असताना आणखी ट्विस्ट आणण्याच्या नावाखाली मालिकेमध्ये नको नको ती पात्र येताना दिसत आहेत. ज्याचा परिणाम या मालिकेतून अनेकांचा रस निघून चालला आहे. काहीही अक्कल नसलेला सोहम पैशांसाठी सगळं काही करतो आणि आता नको त्या पोकळ धमक्यांना घाबरुन आपली बाजू मांडण्यास असमर्थ ठरतो हे काही फारसे पटण्यासारखे नाही. आता या मालिकेला प्रेक्षकांचा विचार करुनही थोडीशी अधिक मेहनत घेऊन मालिका थांबवावी असे वाटते.
स्वामिनी
स्वामिनी ही मालिका 2019 मध्ये सुरु झाली पण ही मालिका अवघ्या एका वर्षातच गुंडाळावी लागली. लॉकडाऊनच्या काळात अनेक मालिकांना फटका बसला. रमाबाई पेशवे आणि माधवराव पेशव्यांची ही ऐतिहासिक अशी मालिका होती. पण काही कारणास्तव ही मालिका बंद झाली. या मालिकेला प्रेक्षकांचा छान प्रतिसाद मिळाला होता ही मालिका लोकांना खूप आवडली होती. पण अचानक बंद झाल्यामुळे या मालिकेबद्दल लोकाना फार काही कळू शकले नाही.
Good News: ही प्रसिद्ध गायिका लवकरच होणार आई, शेअर केला फोटो
आई कुठे काय करते!
आई हा प्रत्येकाचा हळवा कोपरा आहे. दिवस रात्र काम करणारी आणि कसलीही अपेक्षा न करणारी आई. या मालिकेच्या नुसत्या जाहिरातीने लोकांची मन जिंकून घेतली. अरुंधती कुटुंबावर खूप प्रेम करते. नवऱ्यावर नितांत प्रेम करुनही नवरा हा बायकोला अगदी कस्पटासमान वागवतो आणि त्याचेही बाहेर प्रेमप्रकरण सुरु आहे. प्रत्येक वेळी सोशिक स्त्री आणि पुरुष पाहूनही कंटाळा येतो. काहींना ही मालिका आजही खूप आवडते. पण काही बाबतीत ही मालिकाही आपला ट्रॅक सोडताना दिसत आहे.त्यांनी मालिकेत दाखवलेल्या काही गोष्टी या मुळीच पटण्यासारख्या नाही. त्यामुळेच या मालिकेने ट्रॅकवर राहणे गरजेचे आहे.
तर या काही मालिका आहेत ज्या आता कंटाळवाण्या झाल्या आहेत आणि काही मालिका त्या दिशेने वाटचाल करु लागल्या आहेत.
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade