मनोरंजन

कोण आहे सुदर्शन चक्रपाणी? तुम्ही पाहिली का ‘समांतर’

Leenal Gawade  |  Mar 17, 2020
कोण आहे सुदर्शन चक्रपाणी? तुम्ही पाहिली का ‘समांतर’

वेबसिरीजचं तुम्हालाही वेड लागलं असेल आणि तुम्ही अद्याप ‘समांतर’ ही मराठीतील वेबसिरीज पाहिली नसेल तर तुम्ही खूप मोठं काहीतरी मिस केलं आहे. कोण आहे सुदर्शन चक्रपाणी? आणि त्याचा कुमार महाजनशी काय संबंध यावरुन पडदा उठवणारी ही मराठी वेबसिरीज सध्या खूपच गाजत आहे. अगदी काहीच दिवसात ही संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय झाली आहे. मराठी साहित्य हे कायमच दर्जेदार असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

कोरिओग्राफर फुलवा खामकरचं अभिनयात पदार्पण

एकाचा भूतकाळ ठरवणार दुसऱ्याचे भविष्य

समांतर मालिकेत स्वप्निल जोशी

प्रत्येक वेबसिरीज ही गोष्ट असते. समांतरची कथाही थोडी वेगळी आहे. एकाचा भूतकाळ दुसऱ्याचे भविष्य कसे घडवणार हे सांगणारीह ही कथा आहे. तुम्हाला कोणी सांगितलं की, तुम्ही भूतकाळात होऊन गेलेल्या एका व्यक्तीचे आयुष्य जगत आहात तर तुम्हाला विश्वास बसेल का? नाही ना पण समजा असे झाले तर?  यावेबसिरीजमध्येही असेच काही दाखवण्यात आले आहे. कुमार महाजन या एका सामान्य माणसाचा हा रोमांचकारी प्रवास आहे. त्याचं आयुष्य त्यावेळी बदलत त्यावेळी त्यांना समजत की, सुदर्शन चक्रपाणी या व्यक्तीचा भूतकाळ त्याचा भविष्यकाळ ठरणार आहे. मग काय कुमार महाजन म्हणजेच स्वप्निल जोशी याचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडतो. आणि त्याच्यापुढे नव नवे पेच समोर येत राहतात. गुंतागुंतीची आणि वेगवेगळ्या समस्या घेऊन येणारी ही मालिका तुम्हाला अधिक गुंतवून ठेवते. या मालिकेचे 9 भाग प्रकाशित करण्यात येणार आहे. 

काहीच दिवसात मिळाले लाखोच्या घरात व्ह्यूज

एका कॉमन मॅनची अनकॉमन कथा

मालिका मराठी असल्या तर त्याचा प्रेक्षकवर्ग हा स्तिमित होऊन जातो. पण ही मालिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून मराठीच नाही तर हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेमध्ये ही मालिका डब करण्यात आली आहे. त्यामुळे ही मालिका ाता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.या शिवाय ही मालिका देशाबाहेरही जावी यासाठी इंग्रजी सबटायटलही देण्यात येणार आहे. 

म्हणून आहे कही मालिका खास

सतीश राजवाडे दिग्दर्शित समांतर ही वेबसिरीज मराठीतील बिग बजेट वेबसिरीजपैकी एक आहे. याचे कारण असे की, ताकदीचे दिग्दर्शन आणि सोबतच तगडी स्टारकास्ट स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडित हे या वेबसिरीजमध्ये असून तब्बल 5 वर्षांनी ते एकत्र काम करत आहेत. त्यामुळेच ही मालिका खास आहे. 

मराठीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी कालवश

मराठी वेबसिरीजही यायला हव्यात

मराठीमध्ये आतापर्यंत अनेक वेबसिरीज आल्या पाहिजेत. मराठीमध्ये या आधीही काही वेबसिरीज आल्या आहेत. काही वेबसिरीजने आपला ठसा उमटवला आहे. पण वेगळ्या विषयांना पुरस्कृत करणाऱ्या वेबसिरीजची आता फार गरज आहे. त्यामुळे मराठी भाषेत यापुढे चांगल्या आणि दर्जेदार वेब मालिका येण्याची अपेक्षा आहे. 

सध्या तरी तुम्हाला काही वेगळं पाहायचं असेल तर MX प्लेअर वरील ही मालिका आजच पाहायला घ्या म्हणजे तुम्हाला फार काही मिस केल्यासारखे वाटणार नाही.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

Read More From मनोरंजन