सिनेसृष्टीत कधी कोणावर काय आरोप लागतील याची काहीही शाश्वती नसते. एखाद्या अभिनेत्रीने अभिनेत्यावर आरोग लावले की, आपसुकच सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. अशीच काहीशी वेळ ही दाक्षिणात्य अभिनेता विजय बाबूवर आली आहे. मल्याळम सिनेसृष्टीतील नामांकित असा चेहरा असलेला विजय बाबू हा अभिनेता, निर्माता आणि बिझनेसमन आहे. त्याच्यावर अभिनेत्रीने 5 असे गंभीर आरोप केले आहेत.ज्यामुळे सगळी सिनेसृष्टी हादरली आहे. ही अभिनेत्री कोण याबद्दलही चर्चा होत आहे. पण सध्याच्या घडीला विजय बाबूवर लागलेले आरोप हे गंभीर आहेत असे म्हणावे लागेल
विजय बाबूवर लावले हे गंभीर आरोप
विजय बाबूविरोधात 22 एप्रिल रोजी हे आरोप करण्यात आल्याचे समोर आले आहे. तिने एक त्यावर लावलेल्या आरोपांची एक नोटच जारी केली आहे. ज्यामध्ये विजय बाबूने तिच्यासोबत काय काय केले याचा पाढा वाचला आहे.शिवाय तिने यामध्ये धक्कादायक खुलासे देखील केले आहेत.
आरोप क्रमांक 1 : विजयबाबूसोबत अभिनेत्रीने या आधीही काम केले आहेत. ज्यावेळी ती या क्षेत्रात नवी होती. त्यावेळी तिचा गाईड बनत त्याने तिला चांगला सपोर्ट केला. पण त्याने माझे शारिरीक शोषण देखील केले .
आरोप क्रमांक 2 : शारीरिक संबंधास नकार दिल्यावर जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्यासाठी विजय भाग पाडत होता. तब्बल 2 महिने त्याने तिचा बलात्कार केला.
आरोप क्रमांक 3 : विजय बाबू हा तिला ड्रग्ज देखील देत होता. ड्रग्जच्या गुंगीत ठेवून तो तिचे लैंगिक शोषण करत होता.
आरोप क्रमांक 4 : विजय बाबू हा एक राक्षस असून त्याने चित्रपटाचे आमिष देऊन आणि लग्न करणार असे सांगून शारीरिक छळ केला आहे. इतकेच नाही तर जीवन उद्धवस्त करण्याची धमकी देखील दिली आहे.
आरोप क्रमांक 5 : त्याच्या या नीच कृत्याबद्दल कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील विजय बाबूने दिली.
अभिनेत्रीच्या आरोपानंतर अनेकांना धक्का
विजय बाबूने अनेक मोठ्या आणि प्रसिद्ध अशा चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. त्याचे अनेक चित्रपट चांगलेच गाजलेले आहेत. त्याच्यावर आरोप करणारी अभिनेत्री ही त्याचीच सहअभिनेत्री असल्यामुळे ती कोण? याचा अंदाज अनेक जण व्यक्त करताना दिसत आहेत. पण अशापद्धतीने गंभीर आरोप लागणे विजय बाबूच्या करिरअरसाठी खूपच जास्त घातकी आणि त्रासदायक ठरणार आहे हे नक्की!
विजय बाबूच्या निमित्ताने पुन्हा एकदा #MeTooचा मुद्दा समोर आला आहे. यामुळे पुन्हा एकदा अशा आरोप-प्रत्यरोपांची मालिका सुरु होईल का? असे वाटू लागले आहे.
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade