आरोग्य

हार्मोन्सच्या कमतरतेमुळे उद्भवू शकतात या समस्या

Leenal Gawade  |  Oct 27, 2021
हार्मोन्सचा असा होतो परिणाम

 शरीराचे संतुलन राहण्यासाठी अनेक गोष्टी संतुलित राहणे हे फारच जास्त गरजेचे असते. शरीरात कार्यरत असलेले हार्मोन्स हे शरीराचे संतुलन राखण्यासाठी फारच महत्वाची अशी भूमिका बजावत असतात. पुरुष आणि स्त्री या दोघांमध्येही याचे कार्य वेगवेगळ्या पद्धतीने चालते. दोघांमध्येही याचे कार्य बिघडले की, त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागतो. शरीरात हार्मोन्सच्या कमतरतेमुळे नेमके कोणते त्रास होतात ते जाणून घेऊया.

चिडचिडेपणा

हार्मोन्सचा पहिला परिणाम हा तुमच्या वागण्यावर होतो.खूप जणांना अचानक चिडचिडेपणा येतो किंवा कोणत्याही क्षुल्लक कारणावरुन त्यांचे डोके सतत फिरत राहते. अचानक येणारा राग आणि चिडचिडेपणा हा आरोग्यासाठी नेहमीच घातक असतो. तुमच्यामध्येही असा चिडचिडेपणा होत असेल तर तुम्हाला हार्मोन्सची कमतरता होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

केसगळती किंवा केस येणे

केसगळती हा खूप जणांसाठी खूप सर्वसामान्य असा विषय आहे. पण खूप जणांना केसगळतीसोबत आणखी एक त्रास होऊ लागतो तो म्हणजे केस येण्याचा. महिलांना हा त्रास जास्त जाणवतो. कारण काही जणांना हार्मोन्सच्या या त्रासामुळे शरीरावरील नको असलेल्या भागात केस येऊ लागतात. चेहऱ्यावरील हनुवटीवर,छातीवर केस येऊ लागतात. पुरुषांना केस येण्याचा त्रास झाला तर इतके वाटत नाही. पण महिलांना असे केस येऊ लागले की, त्यांच्यामधील आत्मविश्वास कमी होऊ लागतो. तुम्हाला अचानक असे केस येऊ लागले असतील तर तुमच्या हार्मोन्सचा तुमच्यावर परिणाम होऊ लागला असेल हे समजावे.

सेक्सची इच्छा कमी होणे

पुरुषांमध्ये हार्मोन्सची कमतरता झाली की, त्याचा परिणाम नात्यावर होऊ लागतो. पुरुषांचा सेक्समधील इंटरेस्ट निघून जातो. त्यामुळे कितीही इच्छा झाली तर सेक्स लाईफ हे म्हणावे तितके चांगले राहात नाही. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये असलेली ही कमतरता अधिक हानिकारक असेत.जर तुम्हालाही सेक्सची इच्छा कमी झाल्यासारखी वाटत असेल किंवा सेक्सचा टाईम कमी झाला असेल तर तुम्ही हमखास या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

मूड बदलणं

पिरेड्स आल्यानंतर मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये काही मूड स्विंग्स जाणवतात. अगदी त्याचप्रमाणे काही जणांना हार्मोन्स बदलामुळे मूड स्विंग्स जाणवायला लागतात. काहीही झाले की, त्यांचा क्रोध आणि अश्रू अनावर होतात. कधीकधी उगाच आनंदी झाल्यासारखे होते. तर कधी त्यांना अचानक रडावेसे वाटते. काहीही कारण नसताना किंवा क्षुल्लक कारणामुळे अशाप्रकारे मुड बदलणं हे अजिबात चांगले नाही. त्याचा परिणाम नात्यातील इतर लोकांवरसुद्धा होऊ लागतो. 

आता तुम्हाला हे काही बदल जाणवू लागले असतील तर तुम्ही आताच त्याची काळजी घ्यायला सुरुवात करा.

अधिक वाचा

पुरुषांची छाती महिलांप्रमाणे दिसत असेल तर त्यांना आहे हा त्रास

पायाला तेल लावण्याचे अप्रतिम फायदे, नियमित वापरा

Read More From आरोग्य