मनोरंजन

मीरा आणि आदिराज यांच्या प्रेमकहाणीबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता, ‘अजूनही बरसात आहे’

Dipali Naphade  |  Jul 7, 2021
मीरा आणि आदिराज यांच्या प्रेमकहाणीबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता, ‘अजूनही बरसात आहे’

सोनी मराठी वाहिनीवर 12 जुलैपासून सुरू होणाऱ्या ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत चित्रपटसृष्टीतले लाडके चेहरे, मुक्ता बर्वे (Mukta Barve) आणि उमेश कामत (Umesh Kamat) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांचे चाहते आणि प्रेक्षक त्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. बऱ्याच कालावधीनंतर मुक्ता आणि उमेश छोट्या पडद्यावर परत आले आहेत. याआधी त्यांनी एका चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर तब्बल 8 वर्षांनी ती दोघं एकत्र काम करणार आहेत. मुक्ता आणि उमेश हे दोन्ही कलाकार म्हणून अप्रतिम आहेत. दोघेही अत्यंत सहज अभिनय करतात आणि म्हणूनच हा प्रोमो प्रसारित झाल्यापासून या मालिकेबद्दल चर्चा चालू आहे. मराठीमध्ये अत्यंत कमी मालिका आहेत ज्यांच्याबद्दल बोलले जाते. एक प्रेक्षक म्हणून प्रत्येकालाच या मालिकेचा विषय आणि या दोघांना बघून आनंद झाल्याचे सध्या सोशल मीडियावरील कमेंट्स वाचून लक्षात येत आहे.

संस्कृती बालगुडे ठरली डिजीटल इन्फ्लुएन्सर, अभिमानाची बाब

प्रेमाला कुठे असते Expiry Date

सध्याच्या वातावरणात प्रेक्षकांसाठी ही खुसखुशीत मालिका आणली आहे.  प्रेमाला कुठे असते Expiry Date, असं म्हणणार्‍या मुक्ता आणि उमेश यांची ही एक परिपूर्ण प्रेमकहाणी असणार आहे. मीरा आणि आदी ही त्यांच्या व्यक्तिरेखांची नावं आहेत. दोघेही डॉक्टर आहेत. ऐन पस्तिशीत आलेले मीरा आणि आदिराज दोघेही आपापल्या आईसाठी मंगल कार्यालयात लग्नासाठी आपली नावं नोंदवायला जातात आणि तिथेच पुन्हा एकमेकांना भेटतात. त्यामुळे आता पुढे यांच्या आयुष्यात काय घडणार हे पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत. मुळात मुक्ता आणि उमेशच्या अभिनयाची जुगलबंदी हेच या मालिकेच वैशिष्ट्य असल्याची चर्चा ठिकठिकाणी ऐकू येत आहे. या जोडीच्या असण्यानेच प्रेक्षकांचे मन आधीच जिंकून घेतले आहे. मुक्ता आणि उमेश या दोघांनाही आतापर्यंत निवडलेले काम हे अत्यंत चोखंदळपणे निवडले आहे आणि म्हणूनच ही मालिकाही अप्रतिम असेल अशी आशा आता त्यांच्या चाहत्यांना आहे. 

अभिनेता दिलीप कुमार काळाच्या पडद्याआड

दोन्ही प्रोमोला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद

मालिकेच्या दोन्ही प्रोमोंना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या मालिकेतून प्रेक्षकांना  मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. रोहिणी निनावे आणि मुग्धा गोडबोले यांनी मालिकेची कथा, पटकथा आणि संवाद केले आहेत तर केदार वैद्य मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत. या मालिकेच्या शीर्षकगीतासाठी देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांनी आवाज दिला असून अशोक पत्की यांनी मालिकेचे शीर्षकगीत संगीतबद्ध केले आहे. मालिकेमध्ये राजन भिसे, उमा सरदेशपांडे, समिधा गुरू, सुचिता थत्ते, पल्लवी वैद्य, सचिन देशपांडे अशी कलाकार मंडळीही असणार आहेत. त्यामुळे तगडया कलाकारांची ही मालिका नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करणार असा विश्वास प्रेक्षकांनाही आहे.  मालिकेतून वधू वर सूचक मंडळात नाव नोंदवायला आलेले मीरा आणि आदी आधीपासूनच एकमेकांना ओळखत आहेत आणि आता पुढे काय गमतीजमती घडणार आहेत हे पाहण्याची प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता आहे. तसंच ही जोडी नक्कीच कमाल करणार असाही आता चाहत्यांना सूर दिसून येत आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

प्रेक्षकांसाठी अभिनयाची ‘अजूनही बरसात आहे’ मुक्ता आणि उमेश एकत्र

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन