या महामारीमध्ये अनेकांना भावनिक आणि आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. अनेकजण वर्षभरापासून घरुन काम करतायेत त्यांना नैराश्य,ताणतणाव जाणवू लागला आहे.यासाठी एकमेकांशी सातत्याने बोलत राहणं आणि सकारात्म विचार करत राहणं महत्त्वाचं आहे. या परिस्थितीत देखील बदल होणार आहे हे लक्षात ठेवणं देखील आवश्यक आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या माहितीचा सातत्याने भडिमारदेखील मानसिकतेवर परिणाम करु शकतो. त्यामुळे जेवढी माहिती गरजेची आहे तितकीच घ्यायला हवी.या कठीण काळात, आपल्याला नित्यक्रमांचे पालन केल्याने फायदा होईल. हे आपले जीवन सामान्य बनवेल.या कठीण काळात आपण मानसिकदृष्ट्या निरोगी आणि सशक्त कसे राहता येईल यादृष्टिने प्रयत्न करा.तुम्ही त्या गोष्टी करा ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. याबाबत आम्ही अधिक माहिती घेतली आहे, डॉ. दिपाली अमोल घाडगे,जनरल फिजिशियन यांच्याकडून.
नैराश्य नक्की काय येत आहे
Freepik
गेल्या साधारण दीड वर्षभरापासून शाळा बंद असल्याने सतत घरात राहणं, मित्रपरिवार न भेटणं यामुळे मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम होऊ लागला आहे. बरीच लहान मुलं नैराश्य, चिंता आणि तणाव यांसारख्या मानसिक समस्यांना समोरं जात आहेत. अशावेळी मुलांच्या स्वभावातील हे बदल पालकांनी ओळखून वेळीच आपल्या मुलांना मानसिक आजारातून बाहेर काढावे. मुलांबरोबर पुरेसा वेळ घालवा. सततची चिडचिड, काम आणि घरात बसल्याने नैराश्य वाढीला लागत आहे. पण ते कमी करण्यासाठीही तुम्हालाच त्यातून मार्ग काढावा लागणार आहे.
दिवसभरात काय काम करायचे याचा आराखडा
Freepik
प्रत्येकाने दिवसभरात आपल्याला काय काम करायचे आहे, याचा आराखडा तयार करा. तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल अशा बातम्या वाचणे, पाहणे शक्यतो टाळाच. नियमित व्यायाम करा, ध्यान करा जेणेकरुन सकारात्मकता वाढेल तसेच तणावापासून दूर राहता येईल. संसर्गापासून दूर राहता येईल अशा नियमांचे पालन करायला विसरू नका. तसंच जितकं नैराश्यापासून दूर राहता येईल राहण्याचा प्रयत्न करा
कोरोना काळात वाटतेय अस्वस्थ, या टिप्स करतील मन शांत
स्वतःसाठी वेळ काढा
सध्या घर, ऑफिस आणि मुलं यातून स्वतःसाठी वेळ काढणं शक्यच होत नाही. त्यामुळे स्वतःलाही मानसिक त्रास होत आहे. पण दिवसभराच्या धावपळीतून दुपार अथवा रात्री काही वेळ किमान अर्धा तास तरी तुम्ही स्वतःसाठी काढा. यावेळात स्वतःसाठी वाचन करणे, गाणी ऐकणे, चालणे, डान्स करणे यापैकी तुमचा कोणताही आवडता छंद असेल तुम्ही तो जोपासण्याचा प्रयत्न करा. अन्यथा तुमची चिडचिड वाढणे हे साहजिक आहे. कारण सतत काम करून मनावर अत्यंत ताण येतो. तसंच सतत कोरोनाची भीती मनात असल्याने अधिक खच्चीकरण होत आहे.
कोरोना काळात महिलांचे आरोग्य, स्वास्थ्य जपण्यासाठी काही सोप्या टिप्स
सकारात्मक विचार करा
कोरोनाच्या बातम्या, सतत मृत्यूच्या बातम्या आणि इतर गोष्टींमुळे मनाचे अधिक खच्चीकरण होताना दिसून येत आहे. पण अशा परिस्थितीत तुम्ही सकारात्मक विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण नकारात्मक विचार केल्यास मनाचे खच्चीकरण जास्त प्रमाणात होते. कोरोना हा बरा होणारा आजार आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला सकारात्मक विचार करणेच अधिक गरजेचे आहे. तुमच्या सकारात्मक विचारानेच तुम्ही स्वतःमध्ये आणि आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये बदल घडवून आणू शकता. त्यामुळे तुम्ही या काळात जितका अधिक सकारात्मक विचार कराल तितकी तुमची भीती निघून जाण्यास मदत होईल.
कोरोना काळात #LongDistanceRelationship टिकण्यासाठी हे नक्की करा
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक