Fitness

सकाळी उठल्याबरोबर प्याल हे तर होईल फायदाच फायदा

Leenal Gawade  |  Sep 14, 2019
सकाळी उठल्याबरोबर प्याल हे तर होईल फायदाच फायदा

सकाळी उठल्यानंतर काय प्यावं हा अनेकांना पडलेला प्रश्न असतो. चहा-कॉफी हे सर्वसाधारणपणे सगळ्यांचेच सकाळी उठल्यानंतरचे पेय असते. पण हल्ली आरोग्याची काळजी घेताना सकाळी-सकाली या गोष्टी पोटात जाऊ नये याची काळजी घेतली जाते. तुम्हालाही तुमच्या आरोग्याची काळजी असेल तर मात्र तुम्ही हे नक्कीच वाचायला हवे. आम्ही अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्याचा फायदा तुम्हाला तुमचे आरोग्य फिट ठेवण्यासाठी होईल. आता सकाळी पिण्यासाठी आपण काही खास गोष्टी पाहुया.

ऑनलाईन जेवण मागवताना घ्या या गोष्टींची काळजी

मध आणि लिंबू (Honey and lemon)

shutterstock

जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या मध आणि लिंबाचे पाणी पिण्यास काहीच हरकत नाही. शिवाय तुम्ही लिंबू आणि मध पाण्यात घालून प्यायलात तर तर ते उत्तम डिटॉक्स म्हणूनही काम करते. त्यामुळे दररोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून हे पाणी प्या. तुम्हाला महिन्याभरात तुमच्यात बदल जाणवेल. तुम्हाला जर त्वचेसंदर्भातील विकार असतील ते कमी होतील. शिवाय शरीरातील अतिपिक्त चरबी घटवण्यासही मदत होईल.

Also Read घरी पाणी कसे वाचवायचे

अॅपल सायडर व्हिनेगर आणि कोमट पाणी (Apple cider vinger and lukewarm water)

shutterstock

जर तुम्हाला पिंपल्सचा फार त्रास असेल तर तुम्ही अॅपल सायडर व्हिनेगरचे सेवन करु शकता. सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपताना तुम्हाला कोमट पाण्यात अगदी चमचाभर अॅपल सायडर व्हिनेगर घालायचे आहे. हे पाणी तुमच्या पिंपल्सचा त्रास दूर करते. त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या तुम्ही हे पाणी प्या. याच्या सेवनामुळे तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल

या’ राशीच्या व्यक्तींना असते फिरण्याची हौस, घरात टिकत नाहीत

कोमट पाणी आणि आलं (lukewarm water and ginger)

shutterstock

आल्याचा तुकडा दिवसातून एकदा तरी चावावा असे म्हणतात. आल्याचा अर्क पोटात गेल्यानंतर तुमच्या पोटाचे आरोग्य सुधारते. तुम्हाला पोट बिघडण्याचे त्रास असतील तर तुम्ही दररोज सकाळी कोमट पाण्यात आलं किसून घालावे आणि ते पाणी प्यावे. आलं खाल्ल्यामुळे तुम्हाला नक्कीच फ्रेश वाटेल. सर्दी, पडसं या सगळ्यापासून तुम्हाला हे पाणी दूर ठेवेल. त्यामुळे तुम्ही आवर्जून आलं पाण्यात घालून प्या.

चिआ सीड्स आणि पाणी (Chia seeds and water)

shutterstock

जर तुम्ही खरंच वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही चिआ सिड्सचा समावेश तुमच्या सकाळच्यावेळी करायला काही हरकत नाही. आदल्या रात्री तुम्हाला चिआ सीड्स भिजत घालायचे आहे. सकाळपर्यंत ते चांगले फिगून येतात. ते तुम्हाला तसेच्या तसे पाणी प्यावे. तुम्हाला साधारण सब्जा खाल्ल्यासारखे वाटेल. सब्जाप्रमाणेच याचे भरपूर फायदे देखील आहेत.

फोडणीतील चिमूटभर ‘हिंग’ आरोग्यासाठी असतं लाभदायक

जीरं आणि गरम पाणी ( Jeera and hot water)

shutterstock

जीऱ्यामुळे पोटातील गॅस बाहेर पडायला मदत होते. तुम्हाला गॅसेसचा त्रास असेल तर मग तुम्ही जिऱ्याचे पाणी प्यायलाच हवे. एका भांड्यात एक ग्लास पाणी गरम करुन त्यात साधारण एक मोठा चमचा जीरे घाला. उकळलेले पाणी तुम्ही प्या. तुम्हाला बरे वाटेल.

प्रत्येक आजारावर खात असाल ‘पेनकिलर’ तर वेळीच सावध व्हा

तुम्ही दररोज सकाळी उठून किमान महिनाभर एक असा प्रयोग करुन पाहिला तर तुम्हाला याचे भरपूर फायदे मिळतील. आरोग्य निरोगी ठेवण्यासोबतच तुम्हाला इच्छित असलेला बदल यातून दिसून येईल. मग आजपासून नेमकं कोणत्या ड्रिंकने तुम्ही दिवसाची सुरुवात करणार आहात.

*खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From Fitness