काही ठराविकच अशा सीरीज असतात ज्या सगळ्यांच्या मनात छाप पाडून जातात. कालिन भैय्या, गुड्डू पंडित, मुन्ना त्रिपाठी अशी काही नाव चांगलीच प्रसिद्ध झाली. पहिल्या सीझनच्या शेवटच्या भागात झालेल्या गोळीबारानंतर आता पुढे काय? असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण खूप वाट पाहिल्यानंतर आता मिर्झापूरचा दुसरा सीझन आला आहे. याचा ट्रेलर आल्यापासूनच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रेलचेल सुरु झाली होती आणि आता सगळ्यांचाच तोंडी मिर्झापूर या मालिकेचे नाव आहे. यातील काही कलाकारांनी दुसऱ्या भागातही त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे. तुम्ही मिर्झापूर 2 पाहिला का?
अभिनेत्री रेखाच्या सौंदर्याचे हे आहे रहस्य, चिरतरूण दिसण्यासाठी करते हे उपाय
मिर्झापूरच्या गादीवर बसला गुड्डू पंडित
मिर्झापूर ही मालिका फक्त खूर्चीचा खेळ आहे. पण ही खूर्ची राजकारणाची नाही तर वाईट कामांची आहे. कट्टा, ड्रग्ज या व्यापारामध्ये आपले वर्चस्व मिळवू पाहणारे सगळेच कालिन भैय्याला गादीवरुन उचलून फेकण्यासाठी वेगवेगळे प्लॅन करत असतात. पण कालिन भैय्यासाठी काम करणाऱ्या गुड्डू पंडितशी त्याचे वाकडे झाल्यानंतर त्याचा सगळा गेमच बदलतो. पहिल्या भागात अनेक मोठ्या कलाकारांचे काम संपल्यानंतर दुसऱ्या भागात नेमके काय होईल असा प्रश्न पडला असताना दुसऱ्या भागात गुड्डू पंडितचा खूर्चीप्रवास दाखवण्यात आला आहे. पण यामध्ये येणारी व्यवधाने आणि कौटुंबिक ट्विस्ट यामुळे सगळ्या एपिसोडमध्ये मजा आली आहे.
पंकज त्रिपाठी हिट
कालिन भैय्याचे पात्र निभावणारा कलाकार पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा त्याच्या अभिनयामुळे लोकांच्या मनामनात जाऊन पोहोचला आहे. सीझन दोनमध्ये त्याचे काम फारसे नसले तरी सगळ्याचा सुत्रधार हा नक्कीच तो आहे. त्यामुळेच अगदी शेवटपर्यंत काय होणार.. तो मरणार का असा प्रश्न असताना या सीरिजचा शेवटही काहीतरी नवे करेल असा झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुढच्या भागाची प्रतिक्षा आहेच.
Bigg Boss 14: राहुल वैद्यने जान सानूवर केले नेपोटिझमचे आरोप
ओटीटीवर पहिल्या आणि दुसऱ्या भागाची चर्चा
मिर्झापूरचा पहिला भाग आल्यानंतरच त्यातील हिंसा अनेकांना खटकली होती. पण तरीही ही मालिका आली तेव्हा चांगलीच हिट झाली. पहिला भाग आल्यानंतर दुसरा भाग कधी येईल अशी उत्सुकता असताना दुसऱ्या भागाचा ट्रेलर आल्यानंतर ओटीटीवर पुन्हा एकदा मिर्झापूरची चर्चा वाढू लागली होती. आता हा ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर सगळीकडे मिर्झापूर मिर्झापूरच सुरु आहे.
अनेकांच्या भूमिका आल्या उठून
मिर्झापूर या नव्या भागामध्ये अनेक नवे कलाकार आले आहेत.या नव्या कालाकारांमध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. या सगळ्या कलाकारांना यामध्ये न्याय मिळाला आहे. प्रत्येक कलाकाराच्या भूमिका उठून दिसल्या आहेत. या सीरीजमध्ये महिलांची भूमिका ही फारशी चांगली दाखवलेली नसताना या सगळ्या सीरिजला फिरवण्याचे काम कालिन भैय्याची बायको वीणा हिने केले आहे.
आता अजूनही तुम्ही ही सीरीज पाहिली नसेल तर आताच ही मालिका बघा.
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje