सुश्मिता सेन (Sushmita Sen) हे नाव जगाला नवं नाही. केवळ बॉलीवूडच नाही तर भारताची मान उंचावणारा ‘मिस युनिव्हर्स’चा किताब मिळवलेली सुश्मिता सेन आजही एकटी आहे. आपण आज या लेखातून सुश्मिताचं थक्क करणारं आयुष्य जाणून घेणार आहोत. मॉडेलिंगपासून सुरूवात केलेली सुश्मिता आजही अनेकांच्या मनावर राज्य करते. मिस युनिव्हर्स झाल्यानंतर सुश्मिताने कमालीची प्रसिद्धी मिळवली. अनेक चित्रपटांमध्येही तिने काम केले. मात्र आपल्या खऱ्या आयुष्यात ती एकटीच राहिली आहे. अगदी लहान वयात सुश्मिताने दोन मुलींना दत्तक घेतले. त्यांचे योग्य पालनपोषण केले. या दोन्ही मुलींबरोबर सुश्मिता नेहमी सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिची मोठी मुलगी रेनी (Renee Sen) आता वेबसिरीजमधून काम करू लागली आहे. तर दुसरी मुलगी अलिसिहा अजूनही शिकत आहे. सुश्मिताने फारच कमी वयात खूप नाव कमावले. तिची स्वतःची हॉटेल्स असून ती एक उद्योजिकाही आहे. सुष्मिताने इतक्या वर्षात 11 जणांना डेट केले आहे. त्यापैकी काही 15-16 वर्षांनी मोठे होते तर काही अगदीच तिच्यापेक्षा वयाने लहान होते. पण या सगळ्यात तिने कधीही लपवाछपवी केलेली नाही. जाणून घेऊया सुष्मिताच्या बॉयफ्रेंड्सविषयी
अनिल अंबानीशी जवळीक
सुश्मिता सेनचे नाव तिच्या पेक्षा 16 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) सह सुरूवातील जोडले जात होते. सुरूवातीलाच सुश्मिता आणि अनिल अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसत होते, तर अनिल अंबानीने तिला 22 कॅरेटची हिऱ्याची अंगठी दिली होती आणि ते आपलं कुटुंब सोडायलाही तयार झाले होते अशा वावड्या उठल्या होत्या. मात्र कुटुंबाच्या ताणामुळे अनिल अंबानीने सुश्मितापासून दूर राहणंच त्यावेळी ठरवलं आणि त्यांचं नातं तुटलं असं सांगण्यात येते.
दस्तकच्या सेटवर विक्रमशी जुळले सूत
भट्ट कँपच्या सेटवर सुश्मिता दिसू लागली ती ‘दस्तक’ चित्रपटाच्या निमित्ताने. या चित्रपटाची कथा लिहिली होती विक्रम भट्टने (Vikram Bhatt). चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यावेळी विक्रम भट्टच्या विवाहामध्येही ताण आला होता. याच कारणामुळे त्याचा घटस्फोट झाला असे सांगण्यात येते. विक्रम भट्ट हा सुश्मितापेक्षा 7 वर्षाने मोठा होता. तर बॉलीवूडमध्ये स्थान पक्के करण्यासाठी सुश्मिताने आपला उपयोग करून घेतला असा आरोपही विक्रमने तिच्यावर लावला होता. मात्र त्यांचे हे नाते अनेक वर्षानंतर तुटले आणि त्यांच्यात कटुता निर्माण झाली. त्यानंतर कधीही दोघांना एकत्र पाहिले गेले नाही.
रणदीप हुडासोबत नातं
त्यानंतर सुश्मिता आणि त्यावेळी अभिनयाच्या क्षेत्रात नवखा असणाऱ्या रणदीप हुडाला एकत्र पाहण्यात आले. रणदीप हुडा आणि सुश्मिताचे तीन वर्ष नाते होते. रणदीप हा सुश्मितापेक्षा एक वर्षाने लहान होता. मात्र ब्रेकअपनंतर रणदीपने सुश्मितासह नाते हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचे सांगितले होते. पुन्हा कधीही ही जोडी एकत्र दिसली नाही.
यानंतर सुश्मिताच्या आयुष्यात अनेक जण येत गेले. वयाने 8 वर्ष लहा असलेल्या मुदस्सर अजीजसोबत तिचे संबंध होते. मात्र ब्रेकअपनंतर दोघेही मित्र राहिले. यानंतर तिचा बॉयफ्रेंड होता तो हॉटमेलचा संस्थापक शब्बीर भाटिया (Shabbir Bhatia). मात्र हे नातं दोघांनीही स्वीकारलं नव्हतं. काही महिने डेट केल्यावर हे दोघेही वेगळे झाल्याचे सांगण्यात आले होते. हॉटेल व्यावसायिक संजय नारंग (Sanjay Narang) सोबत सुश्मिताचे नाते हे अगदी लग्नापर्यंत येऊन पोहचले होते. कारण आपल्याला जगण्याचा आणि प्रेमाचा अर्थ संजयने शिकवला असल्याचेही सुश्मिताने सांगितले होते. पण 8 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या संजयसह तिचे कधी संबंध तुटले हे कोणालाच कळलं नाही. त्यानंतर संजयने अभिनेत्री ईशा कोप्पीकरसह (Esha Koppikar) लग्नगाठ बांधली.
यानंतर 14 वर्षांनी लहान इम्तिजाय खत्री, वसिम अक्रम, बंटी सजदेह, हृतिक भासिन अशा व्यक्तींसह सुश्मिताचे नाव जोडले गेले. तर आपल्यापेक्षा 15 वर्षांनी लहान असणाऱ्या रोहमन शॉलच्या (Rohman Shawl) प्रेमात नुकतीच सुश्मिता होती. दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मात्र आपली मैत्री कायम अशीच राहील असंही सोशल मीडियावर दोघांनी सांगितले होते. त्यामुळे रोहमननंतर सुश्मिताच्या बॉयफ्रेंडच्या यादीला सध्या तरी ब्रेक लागला आहे. पण आपल्या अटींवर सुश्मिता कायम आपलं आयुष्य जगत आली आहे. त्यामुळे आजही तिचा चाहतावर्ग खूपच मोठा असल्याचे दिसून येते.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade