ज्योतिष

हातावर या ठिकाणी तीळ असेल तर होतील दोन लग्नं

Dipali Naphade  |  Jun 27, 2022
moles-on-hand-that-reveal-about-your-marriage-in-marathi

प्रत्येक माणसाच्या शरीरावर कुठे ना कुठेतरी तीळ हे असतातच. आपण सहसा या तीळांबाबत विचार करत नाही. मात्र सामुद्रिक शास्त्रानुसार, अंगावरील काही तीळ हे शुभ असतात तर काही तीळ अशुभ मानले जातात. आपल्या हातावर विविध ठिकाणी अर्थात बोटांवर, हातावर, मनगटावर, हाताच्या कोपऱ्यावर असलेल्या तीळांचा नक्की अर्थ काय आहे आणि हातावर कोणत्या ठिकाणी तीळ असेल तर दोन लग्न होतातच हे सामुद्रिक शास्त्रानुसार जाणून घेणार आहोत. दरम्यान हातांवरील तीळांचा अर्थ असतो आणि या अर्थाबाबत अधिक माहिती आम्ही या लेखातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत. 

हाताच्या बोटावरील तीळ 

कोणत्याही व्यक्ती अर्थात स्त्री असो वा पुरूष, त्यांच्या हाताच्या बोटावर तीळ असेल तर तुम्हाला त्यांच्यापासून सावधान राहण्याची गरज आहे. अशा व्यक्ती तुमचा कधीही विश्वासघात करू शकतात आणि तुम्हाला धोका देऊ शकतात. अशा व्यक्ती संकटामध्ये कधीही साथ देत नाहीत आणि संकटाचा सामना करण्यासाठी या व्यक्तींकडे क्षमता नसते. तसंच या व्यक्तींवर जास्त विश्वास तुम्ही ठेवणे म्हणजे पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. या व्यक्ती आत्मकेंद्री असून केवळ स्वतःचीच रडगाणी त्यांना महत्त्वाची वाटतात. दुसऱ्यांबाबत त्यांना काहीही घेणेदेणे नसते. 

मनगटावर तीळ असणाऱ्यांची होतात दोन लग्नं

ज्या व्यक्तीच्या मनगटावर तीळ असतो त्या व्यक्तींची शक्यतो दोन लग्न होतात. मात्र कोणत्याही महिलेच्या मनगटावर तीळ असेल तर तिचे दोन विवाह होत नाहीत. केवळ पुरूषांच्या मनगटावर तीळ असल्यास ही शक्यता जास्त असते. तसं तुमच्या मनगटावर तीळ असेल तर तुम्ही आरोग्याच्या बाबतीतथ अत्यंत नशीबवान असतात. याशिवाय तुम्हाला धनप्राप्तीही होते. तुमची मुलं गुणी उपजतात आणि तुम्हाला सर्व सुखांची प्राप्ती होते. तसंच मनगटावर अथवा हातावर तीळ असणाऱ्या व्यक्ती या अत्यंत प्रतिभाशाली असून त्यांचे व्यक्तिमत्व अप्रतिम असते. मनगटावर तीळ असणाऱ्या व्यक्ती अत्यंत व्यवहारी असतात आणि उगीच पैसे उडवत नाहीत. याशिवाय या व्यक्ती बुद्धिमान आणि विश्वासनीय अशा असतात. 

हाताच्या कोपऱ्यावर असेल तीळ तर असतात चंचल 

कोणत्याही व्यक्तीच्या हाताच्या कोपरावर तीळ असेल तर अशा व्यक्ती अत्यंत चंचल स्वभावाच्या असतात. तसंच या व्यक्तींमध्ये योग्य निर्णय घेण्याची क्षमताही नसते. मात्र या व्यक्तींना प्रवासाचे चांगलेच योग असतात. या व्यक्ती एकापेक्षा अधिक कलांमध्ये प्रावीण्य मिळवतात. तसंच यांना अधिक संपत्ती मिळण्याचे योग असतात. कोणतेही काम पूर्ण करण्याकडे मात्र या व्यक्तींचा कल नसतो, त्यामुळे सहसा या व्यक्ती खूप मोठे यश प्राप्त करू शकत नाहीत. कोपरावर तीळ असणाऱ्या पुरूषांना अनेक संघर्षांचा सामना करावा लागतो. तसंच कमी वयात त्यांना विधुर व्हावे लागते. महिलांना जर कोपऱ्यावर तीळ असेल तर त्यांना आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागते आणि लढावे लागते. 

काखेतील तीळ 

ज्या व्यक्तीच्या उजव्या काखेत तीळ असतो अशा व्यक्तींना दुःख आणि कष्टांचा अनेकदा सामना करावा लागतो. त्यामुळे नेहमी सावधानता बाळगावी लागते, असे केल्यास, आपले आणि आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींचे या व्यक्ती रक्षण करू शकतात. तर ज्या व्यक्तींच्या डाव्या काखेत तीळ असेल अशा व्यक्तींना संघर्षांना सामोरे जावे लागते. मात्र वयाच्या उत्तरार्धात त्यांना खूप पैसा मिळतो आणि सुखही प्राप्त होते. 

हातावरील अन्य तीळ आणि त्याचे परिणाम

टीप – अन्य अभ्यासाप्रमाणे सामुद्रिकशास्त्र हादेखील एक अभ्यास आहे. आम्ही अंधश्रद्धेला कोणताही पाठिंबा देत नाही. मात्र सामुद्रिकशास्त्रानुसार हातावर असलेल्या तीळांना काय अर्थ आहे याबाबत या लेखातून देण्याचा प्रयत्न केला आहे. यावर विश्वास ठेवणे अथवा विश्वास न ठेवणे हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करत नाही. आम्ही केवळ माहिती देण्यासाठी हा लेख लिहिला आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From ज्योतिष