बॉलीवूड

प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली, ब्रह्मास्त्रमधील ‘केसरिया’ गाणे रिलीज 

Vaidehi Raje  |  Jul 17, 2022
Brahmastra Movie Kesariya song

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची चर्चा चाहत्यांमध्ये कायम आहे. या चित्रपटाची चाहते गेल्या चार वर्षांपासून वाट पाहत आहेत.  9 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या चित्रपटातील ‘केसरिया’ गाण्याचीही सर्वांना प्रतीक्षा होती. या गाण्याचे टिझर आधीच रिलीज झाले होते ज्यामध्ये आलिया आणि रणबीरच्या केमिस्ट्रीने चाहत्यांची मने जिंकली होती. पण आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी हे संपूर्ण गाणे रिलीज केले आहे. चाहत्यांची इतक्या दिवसांची प्रतीक्षा संपवत ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील सर्वात लोकप्रिय गाणे ‘केसरिया’ रिलीज झाले आहे, ज्यामध्ये आलिया आणि रणबीरने कमाल केली आहे.

या गाण्यात या नवविवाहित जोडप्याची ऑनस्क्रीन केमिस्ट्री छान दिसत आहे. बनारसमधील काशी विश्वनाथ मंदिरात या गाण्याचे काही भाग शूट करण्यात आले आहेत. याआधी या गाण्याचा टीझर रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नादरम्यान रिलीज करण्यात आला होता. त्याला दोन कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

अरिजीतने दिला रणबीरला आवाज 

‘केसरिया’ हे गाणे अरिजित सिंगने गायले आहे. ये जवानी है दिवानी, ए दिल है मुश्किल, बर्फी आणि जग्गा जासूसनंतर अरिजित सिंगने पुन्हा एकदा रणबीर कपूरला आवाज दिला आहे. या गाण्याला संगीतकार प्रीतम यांनी संगीत दिले तर  गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत.या  गाण्यात आलिया व रणबीर हे दोघे बनारसच्या गल्लीबोळात फिरताना दिसत आहेत. याशिवाय तो गंगा नदीत बोटीवर बसलेला दिसतो.यात दोघेही काशी विश्वनाथ मंदिरात भगवान महादेवांचे दर्शन घेताना दिसत आहेत. या गाण्यात आलियाचे पात्र रणबीरला सांगतेय की ‘ईशा म्हणजे पार्वती’.  2 मिनिट 52 सेकंदाच्या या गाण्यात आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे असे अनेक सीन्स दाखवण्यात आले आहेत, जे चाहत्यांची मनं जिंकण्यासाठी पुरेसे आहेत. या गाण्यातील दोघांची केमिस्ट्री अप्रतिम दिसते  आहे. या गाण्याची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे त्याचे लोकेशन आहे. 

हिंदीबरोबरच इतर भाषांमध्येही प्रदर्शित 

आलिया भट्ट आणि रणबीरचा हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित होणार आहे.त्यामुळे हे गाणेही वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज झाले आहे. गाणे रिलीज झाल्यानंतर आलियाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्या आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये गाण्याचे पोस्टर आहेत. या गाण्याला हिंदीत ‘केसरिया’ असे शीर्षक देण्यात आले आहे तर कन्नडमध्ये ‘कुमकुमला’ हे नाव देण्यात आले आहे.आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी दोघेही ‘केसरिया’ गाणे ऐकताना आणि एन्जॉय करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दिसतेय  की दोघेही कसे डोळे मिटून केसरिया गाणे ऐकत आहेत. व्हिडिओमध्ये रणबीर आणि अयान दोघेही आलियाच्या घराच्या बाल्कनीत बसलेले दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत आलिया भट्टने एक सुंदर कॅप्शनही लिहिले आहे. आलियाने कॅप्शनमध्ये लिहिले- “उद्या तुमच्यासोबत संपूर्ण गाणे शेअर करण्याची खूप उत्सुकता आहे.’

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे तीन भाग आहेत. पहिला भाग यावर्षी 9 सप्टेंबरला प्रदर्शित होईल आणि बाकीचे भाग नंतर येतील. रणबीर आणि आलियाने लग्नाआधीच  या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. रणबीर व आलियाच्या व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, नागर्जन, मौनी रॉय आणि डिंपल कपाडिया यांच्याही या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From बॉलीवूड