छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका गाजवल्यावर आता मौनी रॉय बॉलीवूडमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करत आहे. सोशल मीडियावर तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लुकची नेहमीच चर्चा असते. ज्यामुळे तिचे सोशल मीडियावर खास चाहते आहेत. इन्स्टाग्रामवर तर तिचे करोडो फॅन्स आहेत. सहाजिकच तिने पोस्ट केलेला एखादा नवा लुक लगेच व्हायरल होतो. सध्या तिचा एक साडी लुक चर्चेत आहे. मौनीने यासाठी लाल रंगाची सॅटिन साडी नेसली आहे. मात्र या फोटोमधील तिच्या लुकपेक्षा साडीची किंमतच जास्त चर्चेत आहे. कारण या साध्या सॅटिन मटेरिअलमध्ये डिझाईन केलेल्या साडीची किंमत हजारोंच्या घरात आहे.
लाल सॅटिन साडी आणि मौनी रॉयच्या दिलखेचक अदा
मौनी रॉयने तिच्या ऑफिशिअल इन्स्टा अकाउंटवर नुकतंच तिचं नवं फोटोशूट पोस्ट केलं आहे. या फोटोजमध्ये तिने लाल रंगाची सॅटिन साडी आणि फुल स्लीव्ज डिझायनर ब्लाऊज परिधान केलं आहे. या साध्या सॅटिन साडीतही मौनीच्या अदा चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आहेत. मात्र तिच्या अदांपेक्षा या साडीची किंमत ऐकून चाहत्यांना नक्कीच घाम फुटेल. कारण या सॅटिन साडीची किंमत चक्क पंचेचाळीस हजार आहे. या लुकला कम्लीट करण्यासाठी मौनीने स्मोकी आईज मेकअप केला आहे. केसांना कर्ल करून मोकळे ठेवले आहेत. जास्त हेव्ही ज्वैलरी न घालता तिने फक्त मोठे कानातले या लुकसोबत कॅरी केले आहेत. त्यामुळे तिचा हा ट्रेडिशनल एथनिक लुक सध्या चाहत्यांना भलताच आवडलेला दिसत आहे. मौनीचे लुक नेहमीच चर्चेत असतात पण सध्या एका पंचेचाळीस हजारांच्या सॅटिन साडीमुळे मौनी पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या चर्चेत आली आहे.
मौनी रॉय दिसणार ब्रम्हास्त्रमध्ये
मौनी रॉय सध्या बॉलीवूडमध्ये तिचं नशीब आजमावत आहे. चाहत्यांही तिला लवकरच ‘ब्रम्हास्त्र’मध्ये पाहण्याची उत्सुकता लागली आहे. ब्रम्हास्त्रच्या ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे यामध्ये मौनीचा एक हटके लुक असण्याची शक्यता आहे. शिवाय तिची भूमिका नकारात्मकही असणार आहे. सहाजिकच तिचा हा नकारात्मक रोल नेहमीपेक्षा वेगळा असेल अशी आशा चाहत्यांना वाटत आहे. धर्मा प्रॉडक्शनचा ब्रम्हास्त्र 9 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. ज्यामध्ये मौनीसह रणबीर कपूर, आलिया भट आणि अमिताभ बच्चन, नागार्जून यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje