मौनी रॉय लवकरच अयान मुखर्जीच्या ब्रम्हास्त्रमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. चाहते ब्रमास्त्रची आतुरतेने वाट पाहत आहेत. रणबीर कपूर, आलिया भट, अमिताभ बच्चन, नागार्जून अशा मोठ्या आणि दिग्गज कलाकारांसोबत यात मौनीदेखील झळकणार आहे. टेलीव्हिजनवर मौनी रॉयची एक खास ओळख आहे. क्योंकी सास भी कभी बहू थी या मालिकेतून तिने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र आता ती खूप बदलली आहे. हा बदल तिच्या व्यक्तिमत्त्वाचा नसून तिच्या लुक्समध्ये झालेला आहे. त्यामुळे तिचा बदललेला लुक चाहत्यांना फार आवडलेला दिसत नाही. मौनी रॉय पूर्वी जशी मालिकांमध्ये तशी आता दिसत नाही. कारण तिने प्लास्टिक सर्जरीने स्वतःच्या चेहऱ्यात खूप बदल केले आहेत. शनिवारी मौनी मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. त्यावेळचा तिचा लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मौनी बघता बघता ट्रोल होऊ लागली. चाहत्यांना तिचा लुक आवडला नाही ज्यामुळे तिच्या लुकवर अनेक प्रकारच्या कंमेट्स येऊ लागल्या.
मौनीचा बदलला लुक
मौनी शनिवारी एअरपोर्टवर व्हाईट शर्ट आणि काळ्या पॅंटमध्ये अवतरली. या लुकला कम्पीट करण्यासाठी तिने व्हाईट स्नीकर्स घातले होते. मोकळ्या केसांमध्ये ती नेहमीसारखी कमाल दिसत होती. तिचा लुक पाहून पापाराझींना तिचे फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. विरल भयानी या फोटग्राफरने तर तिचा एक छान व्हिडिओच त्याच्या पेजवर अपलोड केला. मात्र चाहत्यांना मौनीचा लुक मुळीच आवडला नाही. पाहता पाहता मौनी ट्रोल होऊ लागली. काही ट्रोलर्सनी मौनीला प्लास्टिक सर्जरीचं दुकान म्हटलं तर काहींनी मौनी प्लास्टिक सर्जरीत अंघोळ करून आली आहे असं म्हटलं. काही ट्रोलर्स म्हणाले की हिच्या चेहऱ्याचा नेमका कोणता भाग खरा आहे. मौनीने तिचं नाक, ओठ आणि चेहऱ्यात अनेक बदल केलेले आहेत. ज्यामुळे तिचे सौंदर्य नैसर्गिक वाटत नसून आर्टिफिशिअल दिसत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.
मौनीचा नवा लुक पाहा ब्रम्हास्त्रमध्ये
मौनी रॉय सध्या डान्स दिवाने ज्युनिअर या रिअॅलिटी शोची जज आहे. शिवाय ती लवकरच ब्रम्हास्त्रमध्येही झळकणार आहे. ब्रम्हास्त्रमध्ये तिची नकारात्मक भूमिका असणार आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये त्याची झलक पाहता येते. धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली आणि अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्रमध्ये मौनीचा एक वेगळा अवतार चाहत्यांना पाहता येणार आहे. मात्र या चित्रपटातील लुकसाठी मौनीने चेहऱ्यात जे बदल केले आहेत ते मात्र चाहत्यांना आवडलेले दिसत नाहीत.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje