मनोरंजन

Kasautii Zindagii Kay 2 : मिस्टर बजाजने शो ला केला अलविदा

Leenal Gawade  |  Oct 17, 2019
Kasautii Zindagii Kay 2 : मिस्टर बजाजने शो ला केला अलविदा

सिरिअल सोडून जाणे, पुन्हा परतणे अभिनेत्यांसाठी आणि मालिका बनवणाऱ्यांसाठी नवीन राहिलेले नाही. आज एका मालिकेतून प्रसिद्ध झालेला चेहरा दुसऱ्या दिवशी त्या मालिकेत दिसेल अशी काहीच खात्री देता येत नाही. मालिका क्वीन एकता कपूरची प्रसिद्ध मालिका Kasautii Zindagii Kay 2 च्या बाबतीतही तसेच काहीसे झाले आहे. या शो चा आणखी एका चेहरा मालिका सोडून गेला आहे. मिस्टर बजाजने याने या मालिकेला अलविदा केला असून हा रोल निभावणाऱ्या करणसिंह ग्रोवरच्या सँडऑफ पार्टीसाठी एकता कपूरने  जाणे टाळले आहे.

सारा आणि कार्तिक आर्यनचं झालं ब्रेकअप…’हे’ आहे मुख्य कारण

म्हणून शो ला केला अलविदा

Instagram

करणसिंह ग्रोवरची या शोमध्ये एकदम ग्रँड एन्ट्री करण्यात आली होती. त्याचा अंदाज पाहून लोकांनीही करणच्या लुकची चर्चा केली होती. पण करणला मात्र या रोल विषयी शंका होती. त्याला त्याच्या या रोलमधून समाधान मिळत नव्हते. त्याने या विषयी एकता कपूरशी बोलणे केले होते. अखेर करणने या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि या मालिकेला अलविदा केला. त्याने या शोच्या टीमसोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे.

आधी कमोलिकामुळे झाला परिणाम

Instagram

आधी या मालिकेत कमोलिकाची भूमिका साकारणाऱ्या  हिना खानने देखील या शोला अलविदा केला होता. तिच्या जाण्यामुळे या मालिकेच्या टीआरपीवर परिणाम झाला होता. आता नवीन कमोलिका आल्यानंतर पुन्हा एकदा मालिका जम बसवत होती. तर पुन्हा  एकदा या मालिकेला मिस्टर बजाजच्या रुपात धक्का बसला आहे. आता त्याची जागा या मालिकेत कोण घेणार? आणि या मालिकेत काय नवा ट्विस्ट येणार यासाठी ही मालिका पाहावी लागेल. कारण एकता कपूरच्या मालिकेत कधी काय होईल हे कधीच सांगता येत नाही.

एकता कपूरचा रुसवा

एकता कपूरच्या मालिकेतूनच करणसिंह ग्रोवर पुढे गेला आहे. त्याला पहिला मोठा ब्रेक हा एकताने दिला आहे. आता चित्रपटांमधून काम करुन करणला ओळख मिळाली असली तरी देखील एकता करणच्या शेवटच्या दिवशी त्या फोटोमध्ये दिसली नाही. करणने फोटो पोस्ट करत  एकता कपूरला मी मिस करत आहे, असे देखील त्याने त्यात म्हटले आहे. पण आता एकता कपूर त्याच्यावर नाराज झाली आहे की, काय असे वाटू लागले आहे.

करणसिंह ग्रोवरविषयी हे माहीत आहे का?

Instagram

करणसिंह ग्रोवर पहिल्यांदा दिल मिल गये या मालिकेतून दिसला होता. त्यात त्याचा रोमान्स अनेकांना आवडला होता. ही मालिका लोकांना अधिकच आवडली होती. त्यानंतर करणने ‘कबूल है’ ;या मालिकेतून काम केले. ती मालिकाही त्याने अर्धवट सोडली. ही मालिका त्याने चित्रपटासाठी सोडली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. पण तो खूप दिवसानंतर मालिकेमध्ये परतला.

कोएना मित्राच्या अफेअरपासून ते प्लास्टिक सर्जरीपर्यंत, जाणून घ्या सर्वकाही

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From मनोरंजन