गेल्या आठवड्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी ज्या चित्रपटाला आपला ‘ पाठिंबा ‘ दर्शविला, त्या ‘ वाय ‘ या मराठी चित्रपटाचे पोस्टर अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या या चित्रपटाच्या पोस्टरची सध्या सोशल मीडिया वर बरीच चर्चा आहे. या पोस्टरमध्ये मुक्ता बर्वे (Mukta Barve) एका आक्रमक अंदाजात हातात मशाल घेऊन लढताना दिसत आहे. तिचा हा लढा नेमका कोणासाठी आणि का आहे, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहेत. या चित्रपटात मुक्ता बर्वे सोबत मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रथितयश कलाकार आहेत. मात्र सध्या तरी त्यांची नावे गुलदस्त्यात आहेत.
हायपरलिंक मराठी चित्रपट
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अजित सुर्यकांत वाडीकर म्हणतात, ‘’या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सुरू केलेल्या उपक्रमाला मान्यवर कलाकार, विविध क्षेत्रातील दिग्गज तसेच सर्वसामान्यांनीही पाठिंबा दिला आहे. अगदी राजकीय नेतेही त्यात मागे नाहीत. खुर्चीला खिळवून ठेवतानाच प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा हा थरारपट मराठीतील पहिलाच हायपरलिंक चित्रपट असेल. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच
‘हायपरलिंक’ हा मराठी चित्रपटाचा नवीन आकृतिबंध प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.’’ कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा अजित सुर्यकांत वाडीकर यांची असून पटकथा आणि संवाद अजित वाडीकर,स्वप्नील सोज्वळ आणि संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत. तर कार्यकारी निर्मात्याची धुरा विराज विनय मुनोत यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट 24 जून रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
कलाकार अजूनही गुलदस्त्यात
मुक्ता बर्वे हिची प्रमुख भूमिका असलेला, कंट्रोल एन प्रॅाडक्शन निर्मित वास्तवाचा थरार दाखवणारा आणि कल्पनेच्या पलीकडील ‘ती’ च्या लढ्याची गोष्ट सांगणारा ‘वाय’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणाऱ्या मुक्ता बर्वे हिने आपल्या सोशल मीडियावर ‘वाय’ चे पोस्टर धरलेला एक फोटो शेअर केला. त्यापाठोपाठ मराठी सिनेसृष्टीतील स्वप्निल जोशी (Swapnil Joshi), नीना कुळकर्णी (Neena Kulkarni), प्राजक्ता माळी (Prajakta Mali) इत्यादी अनेक कलाकारांनीही ‘वाय’ चे पोस्टर हातात धरून त्यांच्या सोशल मीडियावर त्यांचा फोटो शेअर केला आहे! या सर्वच कलाकारांनी ” माझा पाठिंबा आहे ! आपला … ? ” अशी विचारणा चाहत्यांना केल्यामुळे , चाहत्यांमध्येही ‘वाय’ या नावाबद्दल आणि चित्रपटाबद्दल उत्कंठा निर्माण झाली आहे. हे सर्व कलाकार ‘ वाय ‘ या चित्रपटांमध्ये आहेत का की यातील काही मोजकेच कलाकार ‘ वाय ‘ या चित्रपटामध्ये आहेत की आणखी यापेक्षा वेगळेच कलाकार चित्रपटामध्ये आहेत हे अजूनही गुलदस्त्यात आहे. शिवाय या पोस्टरमागचा अर्थ आणि नेमका उद्देश काय, याविषयीही अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे आता ‘वाय’ विषयीची प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
वाय चित्रपटाच्या वेगवेगळ्या पोस्टरमुळे सध्या हा चित्रपट चर्चेत आहे. नक्की या चित्रपटामध्ये नक्की काय आहे याबाबत सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनीही सध्या या चित्रपटांना उचलून धरले आहे. याशिवाय चित्रपटांचे प्रमोशनही चांगले करण्यात येत असल्यामुळे मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आल्यासारखे वाटत आहे. वेगवेगळ्या विषयांचे हे चित्रपट रसिकांचे खूपच चांगले मनोरंजन करत असल्याचे दिसून येत आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From Uncategorized
चार वर्षांनंतर ‘पठाण’मधून परत येण्यासाठी शाहरूखने घेतली मेहनत, ट्रेनरने केला खुलासा
Trupti Paradkar
भारतीय स्किन टोनवर शोभतात हे ब्लश
Dipali Naphade