DIY लाईफ हॅक्स

झटपट स्वयंपाक करायचा आहे मग, किचनमध्ये असायलाच हवेत हे मसाले

Trupti Paradkar  |  Dec 6, 2021
Must have spices in your kitchen in Marathi

स्वयंपाकाला स्वाद येतो तो निरनिराळे मसाले वापरण्यामुळे… यासाठीच भारतीय खाद्यसंस्कृतीत मसाल्यांना खास महत्त्व आहे. चिमुटभर मसाले टाकून तुम्ही जेवणाचा स्वाद आणि सुगंध वाढवू शकता. बऱ्याचदा स्वयंपाक करण्यापूर्वी मसाले आणि इतर तयारी करून ठेवणं नेहमीच फायदेशीर ठरतं. यासाठीच आम्ही तुम्हाला असे काही मसाले सांगत आहोत जे तुमच्या किचनमध्ये असायलाच हवेत. ज्यामुळे स्वयंपाक झटपट आणि स्वादिष्ट होतो.

स्वयंपाक घरात असायला हवेत हे मसाले 

स्वयंपाक करता हे मसाले तुमच्याकडे असायलाच हवे.

लाल तिखट पावडर

लाल तिखट टाकण्यामुळे स्वयंपाकाला चांगला स्वाद येतो. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात एक खास पद्धतीने बनवलेले लाल तिखट असायलाच हवे. लाल तिखटामध्ये काश्मिरी कमी तिखट पावडर, मालवणी मसाला, सीकेपी मसाला, आग्री मसाला असे निरनिराळे प्रकार असतात. कमी तिखट, मध्यम तिखट, जास्त तिखट मिरचीपासून हे मसाले बनवलेले असतात. मिरच्यांचेही निरनिराळे प्रकार असतात. त्यानुसार तुम्ही वर्षभराचा घावूक मसाला घरीच बनवून ठेवू शकता.

मालवणी मसाला रेसिपी मराठी (Malvani Masala Recipe In Marathi)

Must have spices in your kitchen in Marathi

धणे पावडर

कोथिंबीरीप्रमाणेच पदार्थांमध्ये धण्याची पावडर टाकल्यामुळे एक छान चव आणि सुगंध येतो. यासाठीच नेहमी किचनमध्ये धण्याची पावडर तयार ठेवा. यासाठी तव्यावर धणे भाजून थंड करा आणि मिक्सरमध्ये वाटून पावडर तयार करा.

जिरे पावडर

धणे पावडरप्रमाणे जिऱ्याची पावडर तयार करून ठेवल्यामुळे तुमचा स्वयंपाक नक्कीच लवकर होतो. यासाठीच धणे तव्यावर थोडे गरम करा आणि थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून ठेवा. लागेल त्याप्रमाणे स्वयंपाकासाठी वापरा.

जिऱ्याचे हे फायदे जाणून तुम्ही व्हाल आश्चर्यचकीत (Cumin Seeds Benefits In Marathi)

गरम मसाला

तुमच्या स्वयंपाक घरात एक तयार मसाला नेहमीच असायला हवा. तो मसाला म्हणजे गरम मसाला… गरम मसाला तुम्ही विकत आणून ठेवू शकता. घरात बडिशेप, तेज पत्ता, जिरे, लवंग, धणे भाजूनही तुम्ही गरम मसाला तयार करू शकता. गरम मसाला तयार असेल तर फक्त साध्या मिरची मसाल्यानेही तुम्ही स्वयंपाक चांगला करू शकता.

लसूण पावडर

लसणा शिवाय कोणताही पदार्थ चमचमीत होऊ शकत नाही. पण यासाठी लसूण आणून तो सोलून त्याची पेस्ट तयार करण्याची तुम्हाला मुळीच गरज नाही. फक्त तयार लसणाच्या पावडरने तुम्ही स्वयंपाक स्वादिष्ट करू शकता. तुम्ही लसणाची पावडर नियमित स्वयंपाकासाठी वापरू शकता.

जाणून घ्या लसूण खाण्याचे फायदे | Lasun Khanyache Fayde

सुंठ पावडर

लसणाप्रमाणेच आल्याची पेस्ट स्वयंपाकासाठी गरजेची असते. सुकलेल्या आल्याला सुंठ असं म्हणतात त्यामुळे सुंठ पावडर तयार असेल तर तुम्ही स्वयंपाकात तिचा वापर करू शकता. 

वेलची पावडर

गोड पदार्थांमध्ये वरून वेलची पावडर टाकली की त्यात वरून थोडी वेलची पावडर टाकल्यामुळे पदार्थ जास्त रुचकर होतो. यासाठी गोडाधोडाच्या पदार्थांसाठी थोडी वेलची पावडर घरात तयार असायला हवी. वेलची सोलून ती वाळवून पावडर घरात तयार ठेवा. 

Read More From DIY लाईफ हॅक्स