बॉलीवूड

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘नो लँड्स मॅन’ने जिंकला वेसोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार

Vaidehi RajeVaidehi Raje  |  Feb 11, 2022
no mans land

नवाझुद्दीन सिद्दीकीच्या ‘नो लँड्स मॅन’ या शॉर्ट फिल्मने वेसोल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘प्रिक्स डू पब्लिक’ हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याचा हा आनंद इंस्टाग्रामवर आनंद शेअर केला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी हा एक उत्कृष्ट अभिनेता आहे याबद्दल कुणाचेही दुमत नसेल. त्याच्या अभूतपूर्व अभिनयाने व चित्रपटांनीही मोठ्या पडद्यावर नेहमीच जादू निर्माण केली आहे. 

नुकताच त्याच्या अमेरिकन-बांग्लादेशी-भारतीय चित्रपटांपैकी एक चित्रपट, ‘नो लँड्स मॅन’ ने वेसोल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘प्रिक्स डू पब्लिक’ पुरस्कार जिंकला आहे आणि नवाझुद्दीनने त्याचा हा आनंद त्याच्या चाहत्यांबरोबर सोशल मीडियावर शेअर केला. 

अनेक पुरस्कारांनी सन्मानित नवाझुद्दीन

नवाजुद्दीन सिद्दिकीने ज्या ज्या  चित्रपटांमध्ये काम केले आहे त्यामध्ये त्याने नेहमीच पूर्ण जीव ओतून काम केले आहे. त्याच्या मेहनतीने आणि त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने त्याने जगभरातील चित्रपट रसिकांच्या मनात एक स्थान निर्माण केले आहे. संजय दत्तच्या मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये त्याची छोटीशी भूमिका होती पण तिथेही तो लक्षात राहतो. त्याच्या अतुलनीय अभिनयनासाठी त्याला काही मोठे पुरस्कारही मिळाले आहेत. रमन राघव आणि मंटो या आगळ्यावेगळ्या चित्रपटांसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा एशियन अकादमी पुरस्कार मिळाला आहे. तसेच शिकागो दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात आऊटस्टँडिंग अचिव्हमेंट इन सिनेमा आणि यासारखे अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्याने जिंकले आहेत.

अधिक वाचा – व्हॅलेंटाईन्स डेला असं व्यक्त करा प्रेम, जोडीदारासोबत पाहा या वेबसिरिज

प्रिक्स डू पब्लिक पुरस्कार

नवाझुद्दीन सिद्दीकीच्या पुरस्कारांमध्ये आता या आंतरराष्ट्रीय पुरस्काराची भर पडली आहे. त्याने अलीकडेच त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले की त्याच्या ‘नो लँड्स मॅन’ चित्रपटाने वेसोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात “प्रिक्स डू पब्लिक” पुरस्कार जिंकला आहे. प्रिक्स डु पब्लिक UBS हे पियाझा ग्रांदे येथील लोकार्नो चित्रपट महोत्सवात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी दिलेले पारितोषिक आहे. या कामगिरीबद्दल अभिनेत्याने त्याच्या नो लँड्स मॅनच्या टीमचे अभिनंदन केले. अभिनयाच्या पुढच्या प्रवासात असेच यश मिळत राहो अशी कामना करत त्याने ‘ #MoreToGo’ असे लिहिले. 

इंस्टाग्रामवर या पुरस्काराच्या छायाचित्रासोबत त्याने चित्रपटातील त्याचे स्टिलही शेअर केले. नवाझुद्दीन सिद्दीकी खरोखरच एक वेगळा अभिनेता आहे. अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून वर येऊन, चित्रपटांत अगदी एक्स्ट्रा कलाकाराच्या भूमिका करून आज आंतरराष्ट्रीय मंचावर पुरस्कार जिंकणे इथवर त्याच्या यशाचा आलेख त्याने नेला आहे. 

नेपोटीझमपेक्षाही इंडस्ट्रीत वर्णद्वेषाची समस्या मोठी

मागे एका मुलाखतीदरम्यान, नवाजुद्दीनने बॉलिवूडमध्ये भेदभाव आणि वर्णद्वेष कसा पसरला आहे याबद्दल खुलासा केला होता. चित्रपटसृष्टीतील वर्णद्वेषाबद्दल बोलताना नवाजुद्दीनने ‘सिरियस मेन’ मधील त्याची सहकलाकार इंदिरा तिवारी हिचा उल्लेख केला आणि म्हणाला, “सुधीर साहेबांना सिनेमाबद्दल प्रचंड ज्ञान आहे, आणि त्यांची विचारप्रक्रिया अतिशय व्यावहारिक आहे. त्यांनी तिला नायिका म्हणून कास्ट केले, आणि माझीही निवड केली.पण दुर्दैवाने आपल्या इंडस्ट्रीत खूप वर्णद्वेष आहे याची मी खात्री देऊ शकतो.  तिला तिच्या पुढच्या चित्रपटात पुन्हा नायिकेची भूमिका मिळाली तर मला खूप आनंद होईल. सुधीर मिश्रा यांनी ते केले, पण इंडस्ट्रीतील इतर मोठ्या नावांचे काय? नेपोटीझमपेक्षाही या इंडस्ट्रीत वर्णद्वेषाची समस्या जास्त मोठी आहे.” 

विशेष उल्लेखनीय गोष्ट ही की नवाजुद्दीनला मागच्या वर्षी सुधीर मिश्रा यांच्या ‘सिरीयस मेन’ चित्रपटातील त्याच्या अभिनयासाठी आंतरराष्ट्रीय EMMY नामांकन मिळाले होते. 

अधिक वाचा 29 एप्रिलपासून सर्वत्र घुमणार ‘चंद्रमुखी’च्या घुंगरांचे बोल

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From बॉलीवूड