सुशांत सिंह राजपूतसारख्या (Sushant Singh Rajput) गुणी अभिनेत्याने नक्की आत्महत्या का केली हा प्रश्न इतके महिने झाले तरीही त्याच्या चाहत्यांच्या मनात नक्की सलत आहे. गेल्यावर्षी जूनमध्ये सुशांतने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आणि संपूर्ण जगाला धक्का बसला. त्यानंतर तपासात समोर आले की, सुशांत सिंह राजपूत हा ड्रग्जच्या आहारी गेला होता. मात्र यावर कोणाचाही अजूनही विश्वास बसत नाहीये. यामुळे संपूर्ण बॉलीवूड वादाच्या भोवऱ्यात सापडलं. इतकंच नाही तर सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पादुकोण यांनाही ड्रग्ज घेतल्याप्रकरणी तपासणीसाठी बोलविण्यात आलं होतं. पण आता सुशांत सिंह राजपूतला ज्या पेडलरने ड्रग्ज पुरविले होते त्याला गोव्यातून अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे. NCB अधिकारी समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सुशांतला जी व्यक्ती ड्रग्ज पुरवत होती त्याच्यासह आणखी तिघांना गोव्यातून अटक करण्यात आली आहे.
बिग बॉसच्या विजेतेपदाची हवा गेली डोक्यात, रुबिना दिलैकचा व्हिडिओ व्हायरल
मिरामार भागातून केली अटक
गोव्याच्या मिरामार भागामध्ये तपास अधिकाऱ्यांनी ड्रग्जचा साठा जप्त केला आणि पेडलरना ताब्यात घेतलं. यासंदर्भात एनसीबीच्या समीर वानखेडे यांनी खुलासा केला. काही तपास अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी छापा टाकला आणि त्यानंतर त्यांना ड्रग्जचा साठा पकडण्यात यश मिळाले. तर पणजीच्या मिरामार भागामधून मुख्य ड्रग पेडरल महाराज शाह आणि त्याच्यासह दोन विदेशी नागरिकांना अटक करण्यात एनसीबीला यश आले आहे. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर या केसमध्ये आता ड्रग्जच्या अँगलने तपास पुढे जात आहे. याबाबतीत अनेक महिने तपास चालू असून सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौमिक चक्रवर्ती यांनाही अटक झाली होती. सध्या रिया जेलमधून बाहेर आली असली तरीही तिच्यावर अजूनही अटकेसंदर्भात टांगती तलवार आहे. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या प्रकरणात आता ड्रग्जची चौकशी होत आहे आणि सुशांत ड्रग्ज घेत होता असं सांगण्यात येत आहे. आता पुढील तपास या आरोपीकडून माहिती मिळविण्यात यश मिळेल का तेदेखील पाहावं लागेल.
महिला दिनाच्या दिवशी सौंदर्यात घाला भर, दिसा आकर्षक
सुशांत सिंह राजपूतने केली जून महिन्यात आत्महत्या
सुशांतने जून महिन्यात आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण बॉलीवूड ढवळून निघाले. बॉलीवूडमध्ये सुशांतच्या आत्महत्येनंतर खूपच ढवळाढवळ झाली. बॉलीवूडमधील अनेक कलाकार ड्रग्जच्या आहारी गेले असल्याचे समोर आले. त्याच अनुषंगाने पुढे सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास सुरू झाला आणि ड्रग्जचे साठे जप्त होऊ लागले. आता याच तपासातून सुशांतला ड्रग्ज पुरविणारा पॅडलरची अटक झाली आहे. एनसीबीच्या कारवाईनंतर आता पुढे नक्की कोणाकोणाची नावे येणार आहेत ते पाहावे लागेल. कारण याआधी बऱ्याच मोठ्या सेलिब्रिटींची नावे यामध्ये अडकली असून आता अजून कोणती नावे समोर येणार याबाबत आता लोकांमध्येही कुजबूज सुरू झाली आहे. तर एनसीबी अजूनही धागेदोरे शोधत असून यामध्ये अजून किती पेडलर असतील याचा काहीही नेम नाही. एनसीबीच्या कारवाईनंतर याआधी पेडलर प्रकरणात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर याआधी हल्लाही झाला होता. मात्र तरीही न घाबरता समीर वानखेडे यांनी कारवाई चालूच ठेवली आहे.
‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’च्या मंचावर गीता माँ ची हजेरी
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje