मेकअप

परफेक्ट नॅचरल लुक हवा, मग करू नका या चुका

Trupti Paradkar  |  May 8, 2022
never do these mistakes when you apply no Make up look

नो मेकअप लुक अथवा नॅचरल लुकचा सध्या ट्रेंड आहे. या लुकसाठी चेहऱ्यावर मेकअप तर केला जातो पण तो खूपच कमी असतो. ज्यामुळे तुमचं नॅचरल सौंदर्य खुलून दिसतं. याचाच अर्थ मेकअप करताना तो किती कमी आणि कौशल्याने करायचा की चेहऱ्यावर दिसता कामा नये. मात्र असा लुक करताना काही जणी खूप चुका करतात. ज्यामुळे त्यांना परफेक्ट नॅचरल लुक मिळत नाही. यासाठी जाणून घ्या अशा वेळी कोणत्या चुका टाळायला हव्या. यासोबतच वाचा नॅचरल अथवा नो मेकअप लुकसाठी खास टिप्स (How To Get No Makeup Look In Marathi)

फाऊंडेशनचा वापर करणे

नो मेकअप लुक करताना मेकअप खूप साधा आणि हलका असण्यासाठी फाऊंडेशन लावण्याची गरज नसते.  त्यामुळे जर या लुकसाठी तुम्ही फाऊंडेशनचा वापर केला तर तुमच्या चेहऱ्यावर हेव्ही बेस दिसू शकतो. त्वचा एकसमान करण्यासाठी तुम्ही बीबी क्रीम, टिंटेड सनस्क्रीन अथवा टींडेड फेस क्रीमचा वापर करू शकता. ज्यामुळे तुमचा लुक नैसर्गिक वाटेल.

आय लायनर अथवा काजळ लावणं 

नो मेकअप लुक करताना काजळ, आय लायनर मुळीच वापरू नका. कारण कितीही पातळ लाईन तुम्ही काजळ अथवा लायनरची काढली तरी ती दिसणारच. नॅचरल लुकसाठी तुम्ही डोळ्यांवर फक्त मस्कारा लावू शकता. ज्यामुळे तुमचे डोळे छान दिसतील. शक्य असल्यास ट्रान्सफरंट मस्कारा वापरा. ज्यामुळे तुमचा लुक नॅचरल दिसेल.

आयशॅडोची निवड करताना 

नो मेकअप लुक करताना आयशॅडो परफेक्ट निवडायला हवी. कारण चुकीच्या शेडमुळे तुमचा लुक बिघडू शकतो. अशा वेळी हलका गुलाबी रंग, पीच अथवा ब्राऊन रंग तुम्ही तुमच्या स्कीन टोनला उठाव देण्यासाठी वापरू शकता. मात्र आयशॅडो नेहमी तुमच्या स्कीन टोनला मॅच होईल अशीच निवडा.

ब्लशर आणि हायलायटर लावणे

नॅचरल लुक करताना कधीच गदड रंगाचे ब्लशर अथवा हायलायटर वापरू नका. लाईट पिंक अथवा स्कीन कलरचं हायलायटर वापरून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील काही भाग हायलाईट करू शकता. त्यामुळे कमीत कमी मेकअप करण्यावर भर द्या.

डार्क रंगाची लिपस्टिक लावणे

नो मेकअप लुक करण्यासाठी लिपस्टिक कधीच डार्क रंगाची वापरू नका. कारण असं केल्यामुळे तुमचा लुक नैसर्गिक दिसणार नाही. त्यापेक्षा जर तुम्ही हलक्या गुलाबी रंगाच्या अथवा न्यूड शेडच्या लिपस्टिक वापरल्या तर तुमचे नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलून दिसेल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From मेकअप