आईबाबा होणं ही वाटतं तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाही. एका लहान बाळाची जबाबदारी स्वीकारल्यावर ती योग्य पद्धतीने पूर्ण करायला हवी. लहान बाळ बोलू शकत नसल्यामुळे त्याला भूक लागली आहे, शी-शू झाली आहे, झोप आली आहे, पोटात दुखत आहे अशा अनेक गोष्टी त्याच्या हावभाव आणि रडण्यातून व्यक्त होत असतात. नवजात बाळाचे हे संकेत ओळखून त्याची निगा राखावी लागते. बऱ्याचदा बाळ रडत असताना अथवा त्याला भरवत असताना अचानक त्याला उचकी लागते. वास्तविक लहान बाळाला उचकी लागणं ही हे एक सामान्य लक्षण आहे. म्हणूनच अशा वेळी न घाबरता पालकांना बाळाची काळजी घेता यायला हवी. यासाठी जाणून घ्या लहान बाळाला उचकी का लागते आणि अशा वेळी काय उपाय करावे.
लहान बाळाला उचकी लागण्याचे कारण
लहान बाळाला खाताना, पाणी पिताना अथवा हसताना उचकी येऊ शकते. असं म्हणतात की बाळाला खरंतर गर्भात असतानाच उचकी येण्यास सुरूवात होते. गर्भधारणा झाल्यावर दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच चौथ्या महिन्यापासूनच बाळाला उचकी यायला लागते. त्यामुळे बाळाला उचकी लागण्याची अनेक कारणं असू शकतात. जसं की, बाळाची वाढ आणि विकास पूर्ण झालेला नसतो. ज्यामुळे भरवताना बाळाच्या अन्ननलिकेतून अन्न पुन्हा उलट दिशेला फिरतं, अशा बाळाला उचकी लागू शकते. बाटलीतून दूध अथवा पाणी पिताना त्याचे पोट फुगते ज्यामुळे त्याला उचकी येऊ शकते. दूधामधील प्रोटीन्सचे प्रमाण वाढल्यास अन्ननलिका सुजल्यामुळे बाळाला उचकी येऊ शकते, बाळाच्या फुफ्फुसांचा योग्य विकास न झाल्यामुळे बाळाचा श्वास अडकून त्याला उचकी लागू शकते. बाळ अति हसल्यामुळे श्वास प्रक्रियेत अडथळा येऊन बाळाला उचकी लागू शकते.
बाळाला उचकी लागल्यास करा हे उपाय
मोठ्या माणसाला उचकी लागली तर आपण ही एक साधारण गोष्ट आहे समजून ती थांबण्यासाठी उपाय करतो. पण नवमाता अथवा पिता बाळाच्या उचकीमुले घाबरतात आणि चिंताग्रस्त होतात. अशा वेळी न घाबरता बाळाची काळजी घ्यायला हवी.
- बाळाची उचकी थांबवण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्याचा ढेकर काढणे. यासाठी बाळाला खांद्यावर घ्या आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवा
- बाळाला मधाचं चाटण अथवा पाणी पाजल्यास त्याची उचकी बंद होऊ शकते.
- बाळाला हातावर उलटं घ्या आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवा.
- मुलांना ग्राईप वॉटर द्या.
- बाळाला उचकी लागू नये यासाठी दूध पाजल्यावर त्याला लगेच झोपवू नका, खांदयावर घ्या आणि ढेकर काढा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक