नुसरत भरूचाची मुख्य भूमिका असलेला भयपट ‘छोरी’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटाला मिळालेल्या या भरघोस यशामुळे प्रभावित होत आता निर्मात्यांनी या छोरीचा सीक्वल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. विशाल फुरिया दिग्दर्शित ‘छोरी 2; लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे. या सीक्वलची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता सीक्वलमध्ये नेमकं कोणतं रहस्य उलगडणार, कोणाकोणाच्या यात मुख्य भूमिका असणार आणि चित्रपटाला पुन्हा तसंच यश मिळणार का याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
फॅन्ड्रीची शालू होतेय दिवसेंदिवस बोल्ड, बघा तिचा ग्लॅमरस अंदाज
काय आहे ‘छोरी 2’ चे कथानक
छोरीच्या सीक्वलची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. विशाल फुरियाच या सीक्वलचंही दिग्दर्शन करत आहे. विशालने यापूर्वी लपाछप्पी चित्रपट बनवला होता. छोरीचं दिग्दर्शन करण्यासाठी विशाल देखील खूप उत्सुक आहे. कारण आता त्याला या चित्रपटातील भीतिदायक वातावरण पुढच्या पातळीवर न्यायचे आहे. छोरीला मिळालेल्या यशामुळे आता या सीक्वलकडून प्रेक्षकांनाही खूप अपेक्षा आहेत. या सीक्वलची कथा तिथून सुरू होईल जिथे पहिली कथा समाप्त करण्यात आली होती. सीक्वलमध्ये पुन्हा काही जुनी पात्रे पुन्हा दाखल होतील तर काही नव्याने समोर येतील. ज्यामुळे नव्या कथेसोबत नवीन भीतिदायक आणि रहस्यमय वातावरण निर्माण केलं जाईल. छोरीचा सीक्वल हा आधीच्या चित्रपटापेक्षा जास्त आकर्षक आणि भयानक असेल अशी दिग्दर्शकाला अपेक्षा आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा, जॅक डेव्हिस आणि शिखा शर्मा करत आहे.
Bigg Boss 15: अभिजित बिचुकलेने Kiss मागत ओलांडल्या मर्यादा, हद्द पार
लग्नानंतर विकी जैनने अंकिताला गिफ्ट केला मालदिव्जमध्ये लग्जरी व्हिला
नुसरत भरूचाची असणार मुख्य भूमिका
नुसरत भरूचाने छोरीमध्ये साक्षी नावाची मुख्य भूमिका साकारली होती. साक्षी एक गरोदर स्त्री असते. मात्र परिस्थितीनुसार ती अशा काही संकटात सापडते ज्यामध्ये तिला तिच्या बाळाचे संरक्षण करण्यासाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. आता यापुढील कथानक सीक्वलमधून समोर येणार आहे. नुसरत भरूचा सध्या छोरीच्या यशामुळे खूप लोकप्रिय झाली आहे. सीक्वलमध्ये तेच यश टिकवून ठेवणं आता नुसरतसाठी नवीन आव्हान आहे.त्यामुळे आता छोरीची संपूर्ण टीम या सीक्वलमध्ये काम करण्यासाठी खूप उत्सुक आहेत. छोरी 2 लवकरच म्हणजे 2023 मध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje