Fitness

घरी बसलेल्या मुलांची वजन वाढू देऊ नका, होतायत हे त्रास

Leenal Gawade  |  Jun 1, 2021
घरी बसलेल्या मुलांची वजन वाढू देऊ नका, होतायत हे त्रास

दोन वर्ष घरी बसून मुलांच्या राहणीमानात बराच फरक पडला आहे. महामारीच्या काळात मुलांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून अनेकांनी त्यांना घराबाहेर जाऊ दिलेलं नाही. मुलांनी घरात बसून राहावे यासाठी त्यांच्या हातात फोन, लॅपटॉप दिल्यावाचून अनेक पालकांना गत्यंतर राहिलेले नाही. म्हणूनच की,काय आता घरी बसलेल्या मुलांची वजनं वाढू लागली आहेत. पण मुलांचे वाढलेले वजन हे त्यांच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. जर तुमच्या मुलामध्येही तुम्हाला असा बदल जाणवत असेल तर आताच त्याकडे लक्ष द्या कारण भविष्यात त्यांना काही त्रास संभावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोनाच्या काळात दररोज सकाळी का करायला हवं मेडिटेशन

Instagram

प्रतिकारशक्ती कमी होणे
वजन वाढल्यानंतर साहजिकच आहे की,आपल्या शारीरिक क्रिया या मंदावतात. लहानमुलांच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. वजन वाढलेली थोडी स्थुल मुलं हालचाल करायला पाहात नाही. धावत नाही. शारीरिक स्वास्थ्य किंवा जी उर्जा त्यांना खर्च करणे गरजेचे असतानाही केवळ वजन वाढीमुळे ही मुलं अशी टाळाटाळ करत असतील तर त्याच परिणाम त्यांच्या प्रतिकारश्क्तीवर होऊ शकतो. अशामुलांची प्रतिकारशक्ती ही कमी होऊ शकते.त्यामुळे वजन वाढण्याचा हा एक परिणाम नक्कीच मुलांच्या आरोग्यावर होऊ शकतो. 

आळशी होणे
आधीच एका जागी बसून बसून आणि मोबाईलमध्ये गुंतलेली मुलं ही आळशी होत चालली आहे. एखादा मैदानी खेळ अशा मुलांना आवडत नाही. त्यापेक्षा त्यांना मोबाईल मिळाला की, मुलं छान तासनंतास फोनवर घालवतात. एखादा खेळ पाहण्याचीही इच्छा त्यांना होत नाही. आळशीपणा हा फारच घातकी स्वभाव आहे. एकदा का आळसाची कास पकडली की, मग मात्र तो आळश आजन्म तसाच राहतो.  

नात्यामध्ये अंतरही महत्वाचे, जाणून घ्या कारण

आजारांना आमंत्रण
सतत एका जागी बसून असल्यामुळे मुलांना आधीच आळसाने ग्रासलेले आहे. त्यांना एखादे नवे काम सांगा ते अजिबात ऐकत नाहीत. अशी वजन वाढलेली मुलं हेल्दी मुलांमध्ये गेली की, त्यांच्या शरीरात झालेला बदल आपल्याला दिसून येतो. पण या सोबतच अशी मुलं आजारांना निमंत्रण देतात. अचानक वाढलेल्या वजनामुळे आधीच प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यातच वाढते अंग या लहानवयात मुलांच्या ह्रदयावरदेखील ताण आणू शकते. इतकेच नाही तर डाएबिटीझचा त्रास देखील त्यामुळे संभवतो.

जंकफुडचा नाद नको
जंकफुड शिवाय खूप लहानमुलांचे पान हालत नाही.  खूप जणांना मैद्याचे बनवलेले किंवा चटपटीत पदार्थ आवर्जून लागतात. मुलांना या गोष्टी देऊच नका असे आमचे मत नाही. पण त्याची सवय लावू नका.कारण काही जण या पदार्थांच्या इतके आहारी जातात की, त्यांना घरचे डाळ- भात, भाजी-पोळी हे जवण अजिबात चालत नाही. त्यामुळे लहान मुलांना अजिबात या पदार्थांची सवय लावू नका. त्यामुळे वजनही वाढते आणि शरीर मंदावते. 

आता तुमच्या मुलांचेही वजन वाढत असतील तर कृपा करुन तुम्ही यागोष्टींचा विचार करा. कारण आरोग्याच्या दृष्टिकोनातून या काही गोष्टींचा विचार करणे आणि मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे.

झोपल्यावर पांघरूणातून एक पाय बाहेर येण्यामागचे शास्त्रीय कारण

Read More From Fitness