आरोग्य

म्हणून महिलांनी नियमित वापरायला हवे ‘पँटीलायनर’

Leenal Gawade  |  Mar 13, 2019
म्हणून महिलांनी नियमित वापरायला हवे  ‘पँटीलायनर’

तुम्ही ‘पँटीलायनर’ संदर्भात नक्कीच वाचले/ऐकले असेल किंवा नसेलही. तर आज आम्ही तुम्हाला या संदर्भात मदत करणार आहोत. कारण पँटीलायनर आरोग्यासाठी चांगले की नाही या बाबत अनेक महिला साशंक असतात. तुम्हाला पँटीलायनरची गरज आहे का? हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही हे वाचायलाच हवे. कारण यातील बऱ्याच गोष्टी महिलांना होत असतात. पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करुन तुमचे आरोग्य धोक्यात आणत आहात हे नक्की.

व्हाईट डिस्चार्ज

अनेकांना दिवसभर व्हाईट डिस्चार्जचा त्रास होतो. त्यामुळे त्यांचा लघवीचा भाग कायम ओला राहतो. हा भाग सतत ओला राहिल्यामुळे तुमची सतत चीडचीड होत राहते. लघवीचा भाग ओला राहिल्यामुळे पँटीदेखील ओली राहते आणि त्या जागी उग्र वास यायला लागतो.

म्हणून येथील त्वचा काळवंडते, जाणून घ्या कारणे आणि उपाय

सतत लघवीला जाण्याची सवय

अनेकांना सतत लघवीला जायची सवय असते. आता प्रत्येकवेळी तुम्हाला टिश्यूने लघवीकडील ओला भाग कोरडा करता येतेच असे नाही. मग काय तुम्ही प्रत्येकवेळी लघवीला गेल्यानंतर तुमच्या पँटी भिजत राहतात. सतत तो भाग ओला राहिल्यामुळे त्या भागाकडून पँटी लवकर खराब होतात. पँटी धुतल्यानंतर लघवीकडील पँटीचा भाग कडक लागतो. शिवाय चांगल्या पँटीही तेथून लवकर फाटतात.

सतत घाम येणे

काहींना घाम खूप येतो. काही मिनिटे प्रवास करत नाही तो पर्यंत ते घामाने चिंब भिजून जातात. अशा महिलांची आंतवस्त्रेही घामाने भिजून जातात. त्यामुळेही मांड्याजवळील भाग घासला जातो. त्यावेळीही तुमच्या पँटी ओल्या होतात.

ही काही कारणे आहेत ज्यामुळे तुमची व्हजायना नेहमीच ओली राहते. मग तुम्हाला त्या ठिकाणी खाज येत राहते. काहींना त्या ठिकाणी रॅशेश उठतात. तुम्हाला या सगळ्यापासून सुटका हवी असेल तर मग तुम्ही पँटी लायनर वापरायलाच हवे.

पँंटीलायनर म्हणजे काय?

सॅनिटरी पॅडचे नॅनो रुप म्हणजे पँटीलायनर… दिसायला पँटीलायनर जरी सॅनिटरी पॅडसारखे असले तरी ते सॅनिटरीपॅडसारखे अजिबात नाही. तर ते सॅनिटरी पॅडपेक्षा पातळ असते. त्यामुळे ते घातल्यासारखे देखील वाटत नाही.  याबद्दल आणखी विशेष सांगायचे झाले तर सॅनिटरी पॅडसारखे त्यामध्ये प्लास्टिक किंवा ब्लड लॉकसाठी विशेष काही वापरलेले नसते. पँटीलायनर कॉटन मटेरिअलमध्ये असल्यामुळे तुमच्या गुप्तांगाला त्रासही होत नाही.

म्हणून व्हजायनामध्ये येते खाज

 पँटीलायनरमुळे vagina सुरक्षित

पँटीलायनरमुळे तुमचे व्हाईट डिस्चार्ज थेट तुमच्या पँटीला लागत नाही. तर ते पँटीलायनरला लागते. शिवाय बाहेर लघवीला गेल्यानंतर जर तुमच्याकडे लघवीची जागा कोरडी करण्यासाठी टिश्यू पेपर नसेल तरी टेन्शन नाही. कारण लघवीचे थेंब पँटीलायनर सोशून घेते.त्यामुळे काळजी करण्याचे काहीच कारण नाही. त्यातल्या त्यात तुमचे काम फिरण्याचे असेल तर तुम्ही बाहेर जाताना पँटीलायनर लावायलाच हवे. कारण तुम्ही कोणत्याही पब्लिक टॉयलेटमध्ये गेल्यानंतर होणारा त्रास कमी होईल.

तुम्हालाही आलेत स्ट्रेचमार्क्स मग वाचा हे घरगुती उपाय

किती तास वापरायच्या पँटीलायनर ?

पँटीलायनर वापरायचे ठरवल्यानंतर लगेचच दुसरा प्रश्न येतो तो म्हणजे ते म्हणजे पँटीलायनर किती तास वापरायचे . आता ते प्रत्येकीवर अवलंबून आहे. काहींना व्हाईट डिस्चार्ज होण्याचे प्रमाण अधिक असते. अशांनी त्यांच्या शक्य असल्यास  दोन ते चार तासांनी पँटीलायनर बदलावे.जर तुम्हाला व्हाईट डिस्चार्जचा त्रास नसेल तर तुम्ही पँटीलायनर दिवसभर वापरु शकता. कारण पँटीलायनरचे या दिवसभरासाठीच बनलेल्या असतात. त्यामुळे जर तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज होत नसेल आणि तुमच्या पँटीलायनर कोरड्या असतील तर त्या सतत बदलण्याचे काहीच कारण नाही.त्यामुळे तुम्हाला जर पँटीलायनरबद्दल काही गैरसमज असतील तर ते दूर करा आणि पँटीलायनर वापरायला घ्या.

हल्ली बाजारात वेगवेगळे पँटीलायनर आहेत. यामध्ये फ्रँगनन्स असलेले पँटीलायनरदेखील आहेत. 

कोणती पँटीलायनर घेऊ अशी तुम्हाला शंका असेल तर  POPXO तुम्हाला खालील पँटीलायनर्सचे ब्रँड वापरण्याचा सल्ला देईल

Carmesi All Natural Panty liners ( ४२५ रुपये / ६० पीस)

Whisper Daily Liners Clean & Fresh – Normal (१६५ रुपये / ४० पीस)

Carefree Super Dry Panty Liners ( ७९ रुपये/ २० पीस)

SIRONA Ultra-Thin Premium Panty Liners (१२५ रुपये/३० पीस)

 (फोटो सौजन्य- Instagram)

 

 

 

 

Read More From आरोग्य