मनोरंजन

अंधश्रद्धेवरील सस्पेन्स सीरिज ‘परिस’ येतेय भेटीला

Leenal Gawade  |  Aug 25, 2021
परीस

 अंधश्रद्धा ही अशी कीड आहे जी लागली की माणसाचा वर्तमानाशी विश्वास उडून जातो. श्रद्धा असणे आणि अंधश्रद्धा असणे यामध्ये एक अस्प्ट अशी रेषा आहे जी ओळखता आली नाही तर त्याचा परिणाम बिकट होतो. या परिस्थितीवर भाष्य करणारी एक नवी सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्लॅनेट मराठी प्रस्तृत अशी ही सस्पेन्स थ्रीलर वेबसीरिज असून ‘परीस’ असे या सीरिजचे नाव आहे. प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच ही मालिका येणार आहे. दरम्यान या मालिकेचे वेगळेपण काय ते जाणून घेऊया. 

अभिनेता शाहीर शेखच्या पत्नीचे झाले बेबीशॉवर, सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल

शोध सोन्याचा

सोनं हे माणसाला श्रीमंत करु शकते. असे सोने विकत घेण्यापेक्षा ते जर फुकट मिळत असेल तर ते कोणाला नको होईल.याच गोष्टीवर आधरीत अशी ही कथा असणार आहे. एका गावातील लोकं ही सोन्याच्या लोभामध्ये परीस शोधायला निघतात. सोनं मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न सफल होईल का? त्यांना सोन्याचा शोध लागेल का? हे या सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे. आपल्याला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ही 31 ऑगस्ट रोजी मिळणार आहे. त्यामुळे अगदी काहीच दिवसांची आपल्याला आता वाट पाहावी लागणार आहे.

अजूनही अंधश्रद्धा आहे

अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही अंधश्रद्धचेचे समूळ नायनाट करण्यासाठी काम करत आहे. पण तरी देखील अजूनही भारतातील काही ग्रामीण भागात अजूनही काही गोष्टींवर विश्वास ठेवला जातो. आजही अंधश्रद्धेच्या अनेक घटना या ग्रामीण भागात घडतात. हा एक सामाजिक असा ज्वलंत प्रश्न आहे.  हा गंभीर विषय घेऊनच प्लॅनेट मराठीने हा ज्वलंत असा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या मराठी वेबसीरिजचे संवाद, पटकथा आणि दिग्दर्शन मयूर करंबळकर, कुलदीप  दंगाडे आणि विशाल सांगले यांनी केले आहे. ‘प्लॅनेट मराठी’ आणि ‘वन कॅम प्रॅाडक्शन’ प्रस्तुत ‘परीस’ या वेबसीरिजची कथा मयूर करंबळकर यांची आहे.

“‘परीस’ बद्दल ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”आत्तापर्यंत ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’च्या इतर वेबसिरीजप्रमाणे या वेबसिरीजचा विषयही पूर्णपणे वेगळा आहे. भारतात अंधश्रद्धेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून त्यासाठी अनेकदा माणसांचा, जनावरांचा प्रसंगी जन्मजात बाळाचाही बळी दिला जातो. विकृत कृत्ये केली जातात. याविषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने या वेबसिरीजची निवड करण्यात आली आहे. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ ने प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांचा विचार केला आहे. हा विचार केवळ वयोगटापुरताच मर्यादित नसून शहरी, ग्रामीण अशा सगळ्याच प्रेक्षकांचा, त्यांच्या मनोरंजनाचा विचार करून कंटेंट आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.  ३१ ऑगस्टपासून वेगवेगळ्या विषयावरच्या पाच वेबसिरीज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर येत आहेत.

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर येत आहेत.

आता नक्की पाहायला विसरु नका ही सीरिज

Read More From मनोरंजन