आरोग्य

ह्रदयाचे आरोग्य जपण्यासाठी दररोज खा शेंगदाणे

Trupti Paradkar  |  Sep 14, 2021
Peanuts can lower your cardiovascular disease risk

जगभरात ह्रदय समस्या असलेले लोक आजकाल मोठ्या प्रमाणावर आढळतात. ह्रदयाचे आरोग्य बिघडण्याचे मुख्य कारण बदललेली जीवनशैली, ताणतणाव, व्यायामाचा अभाव आणि चुकीचा आहार असू शकतं. मात्र काही संशोधनात आशिया खंडातील लोकांमध्ये ह्रदय रोगाचे प्रमाण जगातील इतर लोकांच्या तुलनेत कमी असल्याचं आढळून आलं आहे. याचं मुख्य कारण आशिया खंडातील लोकांच्या आहारात असलेला शेंगदाणा हा घटक आहे. भारतात तर गरीब असो वा श्रींमत प्रत्येकाच्या घरी स्वयंपाकात शेंगदाणा वापरण्याची पद्धत आहे. शेंगदाणा हा असा एकमेव सुकामेवा आहे जो सर्वसामान्यांनादेखील परवडतो. मधल्या वेळी लागणाऱ्या भुकेसाठी, टाईमपाससाठी लोक भाजलेले, खारवलेले शेंगदाणे भारतात खातात. विशेष म्हणजे शेंगदाण्याने तुमची भूक तर भागतेच शिवाय तुमचे ह्रदय रोग, स्ट्रोक अशा भयंकर आजारापासून संरक्षणही होते.  ह्रदयाचे आरोग्य वाढवण्यासाठी खास रेसिपीज

का खायला हवेत नियमित शेंगदाणे 

नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार नियमित मूठभर शेंगदाणे खाण्यामुळे ह्रदय रोग होण्याचा धोका टाळता येतो. अमेरिकन स्ट्रोक असोशियनने प्रकाशित केलेल्या स्ट्रोक जनरलमध्ये हे संशोधन देण्यात आले आहे.याबाबत जपानमध्येही ओसाका युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी एक नवे संशोधन  मांडले आहे. या संशोधनानुसार जे लोक नियमित शेंगदाणे खातात त्यांना स्ट्रोक आणि ह्रदयरोग कमी होतात. याचं मुख्य कारण शेंगदाण्यामध्ये चांगले फॅट्स, फायबर, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन सी भरपूर असतं. जे तुमच्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतं. शेंगदाणे खाण्यामुळे तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं, रक्तदाब सुधारतो, शरीराला अॅंटि ऑक्सिडंट मिळतात. रक्तवाहिन्यांचे नुकसान होण्यापासून बचाव होतो, शरीराचा दाह आणि जळजळ कमी होते,मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्यामुळे तुमच्या ह्रदयाचे आरोग्य सुधारते आणि तुमची प्रकृती चांगली राहते. शेंगदाणे खाण्याचे फायदे हे आरोग्यदायी (Shengdane Khanyache Fayde In Marathi)

Peanuts can lower your cardiovascular disease risk

ह्रदयरोग टाळण्यासाठी कसे खावेत शेंगदाणे 

शेंगदाणे खाण्याची प्रत्येकाची स्टाईल वेगवेगळी असू शकते. भारतात भाजून, खारवून, तळून, मसाला मीठ लावून शेंगदाणे खाल्ले जातात. मात्र जर तुम्हाला ह्रदयाचे संरक्षण करायचे असेल तर नियमित चार पाच शेंगदाणे, अक्रोड, काजू. बदाम असा सुकामेवा एकत्र करा आणि तव्यावर रोस्ट करून मग तो खा. सुकामेव्याला तेल, मीठ, तिखट लावून खाणे आरोग्यासाठी मुळीच चांगले नाही. मात्र शेंगदाणे तुम्ही तव्यावर भाजून नक्कीच खाऊ शकता. रात्री जागरणामुळे लागत असेल भूक तर खा हे हलके पदार्थ

Read More From आरोग्य