ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक माणसाचा जन्म एका विशिष्ट वेळी, महिन्यात आणि वर्षात होत असतो. प्रत्येक महिन्यात आणि दिवशी जन्म घेतलेल्या व्यक्तीचं वेगळं वैशिष्ट्य असतं. याच आधारावर त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी, चांगुलपणा आणि वाईटपणा, त्या व्यक्तीचा स्वभाव हे सर्व ठरत असतं. तर जाणून घ्यायचं आहे आता मार्च महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती नक्की कशा असतात. मार्च महिन्यात ज्या व्यक्तींचा जन्म होतो त्या व्यक्ती सोशल असतात. या व्यक्ती स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांची पर्वा करतात. शिवाय या व्यक्ती सतत हसमुख असतात आणि आपल्या याच वैशिष्ट्यामुळे लोकांना आपलंसं करून घेतात. या राशीचा स्वामी बुध आहे. तुमच्या कोणत्याही जवळच्या व्यक्तीचा जन्म जर मार्च महिन्यात झाला असेल तर या मीन राशीच्या स्वभावाच्या व्यक्ती कशा असतात हे तुम्ही या लेखामधून जाणून घेऊ शकता. चला तर मग वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याआधी बघूया मार्च महिन्यात जन्म घेणाऱ्या व्यक्ती कशा असतात –
1- मार्च महिन्याच जन्म झालेल्या व्यक्ती या अत्यंत प्रभावशाली असतात. कला यांच्या रक्तातच असते. संगीत आणि ललित कलांमध्ये या महिन्यात जन्म घेतलेल्या व्यक्ती माहीर असतात आणि यामध्ये त्यांची जास्त प्रमाणात आवड असते. त्यामुळेच आपल्या देशातील अनेक महान कलाकार व्यक्तींचा जन्म या महिन्यामध्ये झालेला दिसून येतो.
2- या व्यक्तींना टीका अजिबातच आवडत नाही. टिकेपासून यांना भीती वाटते. या व्यक्ती अतिशय संवेदनशील आणि इमानदार असतात. कोणाचाही सामना करायचा असल्यास अथवा कोणाचा विरोध करायचा असल्यास, या व्यक्ती नेहमी मागे राहतात. आपलं म्हणणं मांडताना कोणाला नक्की नीट कळू शकलं नाही अथवा कोणी आपल्याला चुकीचं समजलं तर काय होईल ही भीती त्यांना सतत वाटत राहते.
3- तसं पाहायला गेलं तर या व्यक्ती सोशल असतात. याचं फ्रेंड सर्कल इतरांच्या तुलनेमध्ये दुप्पट असतं पण उदासीनतेपासून वाचण्यासाठी स्वतःच्या कोषात राहणंच या राशीच्या व्यक्तींना जास्त भावतं. स्वप्नांच्या पाठी धावणं अर्थात आपल्या ध्येयाच्या मागे धावणं यांना जास्त आवडतं. पण आपलं मूळ कधीही या व्यक्ती विसरत नाहीत. त्यामुळेच नेहमी लोकांमध्ये मिसळून राहणं या व्यक्तींना चांगलं जमतं.
4- काही व्यक्तींचा विचार जिथे संपतो, तिथे या व्यक्तींचा विचार सुरु होतो असं म्हणावं लागेल. जेव्हा लोक संकटांपासून हरतात, तेव्हा ती संकटं सोडवण्याची जबाबदारी या व्यक्ती उचलतात. संकटांवरील उपाय या व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये शोधून काढतात. एखादी बोअरिंग गोष्टही कशी मजेशीर बनवयाची हे या व्यक्तींना अगदी चांगल्या प्रकारे माहीत असतं.
5- मार्च महिन्यात जन्म घेणाऱ्या व्यक्तींची नजर अतिशय तल्लख असते. तुम्ही नक्की काय विचार करत आहात किंवा नक्की तुमच्या एखाद्या गोष्टीच्या काय भावना आहेत, हे तुम्हाला बघूनच या महिन्यातील व्यक्ती ओळखू शकतात. यांचा रोमान्सही एक प्रकारे संस्कारीच असतो. प्रत्येक एका अॅक्टिव्हिटीजमध्ये हा रोमान्स वेगवेगळा पाहायला मिळतो. तुम्ही न सांगताही या व्यक्तींना तुमच्या मनातील गोष्टी सहज कळतात.
6- तुम्ही या व्यक्तीच्या कितीही जवळचे असलात तरीही यांच्या डोळ्यात बघून तुम्हाला त्यांना नक्की काय म्हणायचं आहे हे समजून घेणं कठीण आहे. पण जी व्यक्ती त्यांना काय म्हणायचं आहे हे न सांगताही समजू शकते अशा व्यक्ती त्यांच्यासाठी आयुष्याचं सर्वात मोठं जगण्याचं कारण बनतात. ज्या व्यक्ती त्यांचं मन समजून घेऊ शकतात, त्यांच्याचबरोबर या व्यक्तींना सर्वात जास्त आनंद मिळतो.
7- या महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींना रहस्यमय गोष्टी खूपच भावतात. तसंच यांना कोणती गोष्ट कळली तर या व्यक्ती त्या गोष्टीचा खूपच बोभाटा करतात त्यामुळे कोणतीही गोष्ट यांना सांगून यांच्यावर विश्वास ठेवणं खूपच कठीण आहे. दुसऱ्या व्यक्तींचं सिक्रेट या व्यक्ती ठेऊ शकत नाहीत. तर समजलेल्या गोष्टींना मीठमिरची लावून अजून पसरवण्याचं काम करतात.
8- या व्यक्तींना प्रवास करणं अतिशय आवडतं. रोजच्या कामातून कितीही थकलेले असले तर या महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती कुठेही फिरायला एका पायावर तयार होतात. त्यांच्या याच स्वभावामुळे निसर्ग आणि साहस या दोन्ही गोष्टींच्या या व्यक्ती अगदी जवळ असतात.
9- या व्यक्तींंच्या व्यावसायिक बाबीबद्दल सांगायचं झालं तर या व्यक्तींना खूप काम करायला आवडतं. यांची मेहनत बघून या व्यक्तींना आयुष्यात लवकर प्रमोशनची संधी मिळते. या महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती या जबाबदार व्यक्ती असतात आणि आपली योग्यता दाखवूनच एका विशिष्ट पदावर पोहचतात. तसंच आयुष्यामध्ये आपल्या मेहनतीमुळेच यशस्वी होतात.
10- या व्यक्तींची नक्की कमतरता काय असा विचार केला तर या व्यक्तींना शो ऑफ करायला फारच आवडतो. सर्वांच्या सतत पुढे पुढे करण्याचा यांचा स्वभाव असतो. शिवाय अशा व्यक्ती खर्चिक प्रवृत्तीच्या असल्यामुळे पैशांची बचत करणं त्यांना सहज जमत नाही. शिवाय उधारीवर आपला स्टेटस सांभाळणं यांना अगदी सहज सोपं वाटतं आणि त्यासाठी काहीही करण्याची या व्यक्तींची तयारी असते.
भाग्यशाली क्रमांक – 3, 7, 9
भाग्यशाली रंग – पिवळा, हिरवा, गुलाबी
भाग्यशाली वार – रविवार, सोमवार आणि शनिवार
भाग्यशाली खडा – पुखराज अर्थात गुरू
मार्च महिन्यात जन्म झालेल्या प्रसिद्ध व्यक्ती –
आमिर खान, राणी मुखर्जी, हनी सिंह, श्रेया घोषाल, कल्पना चावला, कंगना रनौत, रोहित शेट्टी, राजपाल यादव, श्रद्धा कपूर, टायगर श्रॉफ, शंकर महादेवन इत्यादी.
फोटो सौजन्य – Instagram
हेदेखील वाचा –
वार्षिक भविष्य मिथुन (Gemini) राशी : वर्षभर उतार-चढ देणार सापशिडीच्या खेळाचा अनुभव
फेब्रुवारी महिन्यात जन्म होणारे लोक नक्की कसे असतात, जाणून घ्या
2019 वार्षिक भविष्य वृश्चिक (Scorpio) राशी : सर्व ग्रहांच्या तोंडी फक्त एकच शब्द… तथास्तु|
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje