Age Care

या ज्यूस थेरपीने तुम्हाला मिळेल Long Lasting सौंदर्य

Aaditi Datar  |  Apr 17, 2019
या ज्यूस थेरपीने तुम्हाला मिळेल Long Lasting सौंदर्य

आपल्यापैकी प्रत्येकीलाच स्वच्छ आणि चमकता चेहरा आवडतो. पण जर तुम्हाला चेहऱ्याला कोणत्याही प्रकारचा लेप किंवा इतर काही उपाय करणं जमत नसेल तर आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी खास ज्यूस थेरपी. जे आहेत टेस्टी आणि हेल्दी ज्यामुळे तुम्हाला मिळेल ग्लोइंग स्कीन.  

1.केवळ 7 दिवसात येईल चेहऱ्यावर ग्लो

आपल्या शरीराच्या गरजेनुसार आणि मागणीनुसार तुम्ही जर मिनरल्स आणि व्हिटॅमीन्स घेतले तर तुमची स्कीन नैसर्गिकरित्या ग्लो करू लागते. हा उत्तम ज्यूस बनवण्यासाठीचं सर्व साहित्य तुम्हाला किचनमध्ये आरामात मिळेल.

साहित्य –

3 गाजर,

1 सफरचंद,

1 काकडी,

1 सिमला मिर्च,

अर्ध बीट,

1 ग्लास पाणी,

अर्धा लिंबू

हे सर्व साहित्य धूवून आणि सोलून घ्या. नंतर त्याचे बारीक तुकडे करा. आता मिक्सरमध्ये घालून त्याचा ज्यूस करून घ्या. नंतर त्यात लिंबू पिळा. तुमचा ज्यूस तयार आहे. फक्त 7 दिवसांमध्ये एक वेळा हा ज्यूस घ्या आणि मग पाहा परिणाम. तुम्ही हवं असल्यास या ज्यूसमध्ये मीठ आणि साखरसुद्धा चवीसाठी घालू शकता.

2. Aloe-Vera ज्यूसने मिळवा ग्लो

कोरफड म्हणजेच एलोवेरा ज्यूसमध्ये भरपूर व्हिटॅमीन्स असतात. जे तुमच्या त्वचेचा Natural glow कायम ठेवतात. तुमच्या त्वचेवर दिसणारे Pre-mature Aging Effect सुद्धा हा ज्यूस रोखतो. जर तुमची त्वचा sensitive असेल तर आणि त्यावर sunburn चा जास्त परिणाम दिसत असेल तर तुम्ही त्चचेचं रक्षण कोरफड ज्यूस घेऊन करू शकता. एका महिना कोरफड ज्यूस घ्या आणि फरक पाहा.

हा ज्यूस बनवण्यासाठी लागणारं साहित्य

2 कोरफडीचे तुकडे

अर्धा लिंबू किंवा संत्र

चिमूटभर मीठ

सर्वात आधी कोरफडाच्या तुकड्याच्या दोन्ही बाजूचा काटेरी भाग काढून टाका. आता वरची आणि खालची दोन्ही सालं काढून त्यातील गर काढून घ्या. हा गर ज्यूसमध्ये घालू नका. कारण त्यामुळे ज्यूस कडू लागेल. आता दोन्ही साल, मीठ, लिंबू पिळून त्यात थोडासा ऑरेंज ज्यूस मिक्सरमध्ये ज्यूस बनवून घ्या.  

3. 15 दिवसांची ज्यूस थेरपी

उन्हाळ्याच्या दिवसात सुंदर आणि आरोग्यदायी दिसण्यासाठी हा ज्यूस उत्तम आहे. बदलत्या मौसमात तुमच्या चेहऱ्यावर कोणताही नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी हा ज्यूस घ्या.

ज्यूससाठी आवश्यक साहित्य –

अर्ध बीट,

दोन टोमॅटो आणि 3 गाजरं

हे सर्व स्वच्छ धूवून आणि कापून मिक्सरमध्ये ज्यूस बनवा. दिवसा 3 ते 4 वाजताच्या दरम्यान हा ज्यूस प्या. हा ज्यूस घेण्याआधी आणि घेतल्यानंतर तासभर काहीही खाऊ नका. या ज्यूसमुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो तर येईलच पण पिंपल्सवरही कंट्रोल येईल.

4. बीटच्या मदतीने मिळवा डागविरहीत ग्लोइंग त्वचा

तुमची डागविरहीत त्वचेची इच्छा अगदी आरामात पूर्ण होईल बीट ज्यूस थेरपीने. या ज्यूसमधून तुम्हाला मिळतील ए, सी, के यासारखी व्हिटॅमीन्स. जी तुमच्या शरीराची आर्यन, कॉपर आणि पोटॅशिअमची गरज पूर्ण करतात. यामुळे तुमची त्वचा निरोगी आणि ग्लोइंग होते.  

हा ज्यूस बनवण्यासाठी तुम्हाला लागेल

2 बीट

4 गाजरं

1 लिंबू

चिमूटभर मीठ

बर्फ

बीट आणि गाजर धूवून आणि बारीक तुकडे करून घ्या. मग त्याचा ज्यूसरमध्ये ज्यूस करून घ्या. तुम्ही चवीसाठी यामध्ये साखरही घालू शकता. या तयार ज्यूसमध्ये लिंबू आणि मीठ मिक्स करा आणि त्यात बर्फ घाला. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, बीटचा ज्यूस हा कोणत्यीही इतर फळासोबत जसं गाजर, सफरचंद आणि डाळिंब यासारख्या ज्यूसमध्ये मिक्स करून घ्या. कारण बीटचा ज्यूस पिऊन तुमच्या व्होकल कोर्डवर थोड्या वेळाकरिता तणाव येण्याची शक्यता असते.

फोटो सौजन्य : Shutterstock

Read More From Age Care