भारदस्त आवाज अशी ज्यांची ओळख आहे ते महानायक अमिताभ बच्चन अनेकांच्या आवडीचे आहे. अनेक मोठ्या कार्यक्रमांमध्ये किंवा जाहिरातींमध्ये अमिताभ बच्चन यांचा आवाज घेतला जातो. त्यांचा आवाज अनेकांच्या इतक्या परिचयाचा झाला आहे की, शेंबड पोर देखील त्यांचा आवाज सहज ओळखू शकेल. कोरोना काळात अगदी सगळ्यांनीच ऐकली असेल आणि नकोशीही झाली असेल अशा कोरोना कॉलर ट्यून विरोधात एक याचिका दाखल झाली आहे.दिल्ली कोर्टामध्ये ही याचिका दाखल करण्यात आली आहे. कोरोनापासून लोकांना जागरुक करण्याचे काम करणारी ही कॉलर ट्यून वादाच्या भोवऱ्यात अडकण्याचे नेमके कारण काय ते जाणून घेऊया.
प्रियांका चोप्राने केले लॉकडाऊन नियमाचे उल्लंघन, सलॉनमध्ये पोहचले पोलीस
ही मदत नाही तर पैसे घेऊन केलेले काम
2020 हे साल कोणासाठीही चांगले नव्हते. मार्चच्या मध्यापासून कोरोनाचा फैलाव पाहता संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. कोरोना काय हे केवळ बातम्यांमधून अनेकांना कळत होते. सगळा देश एकाएकी ठप्प झाला. हा कोरोना काय आहे आणि त्याची काळजी घेणे गरजेचे का आहे? हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने प्रत्येक माध्यमातून जागरुकता केली. एखाद्याने फोन केल्यानंतर त्याला काळजी घेणे का गरजेचे आहे यासाठी अमिताभ बच्चन यांच्या आवाजात एक कॉलर ट्यूनही तयार करुन घेतली. याचिकाकर्त्याने अमिताभ बच्चन यांच्या कॉलर ट्यूनवर आक्षेप घेत एक याचिका दाखल केली आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, कोरोना काळात अनेक योद्धे कोणत्याही पैशांची अपेक्षा न करता लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावले. अमिताभ बच्चन यांनी या कॉलर ट्यूनसाठी पैसे घेतले आहेत. त्यामुळे त्यांना या महामारीपुढे पैसे अधिक महत्वाचे होते. ही राष्ट्रसेवा होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचा आवाज या कॉलर ट्यूनमधून काढून टाकण्यात यावा अशी विनंती त्यांनी यामधून केली आहे.
टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड होणार जॅकी श्रॉफची ऑनस्क्रीन बहीण
कोरोनाने ग्रस्त होते बच्चन कुटुंबिय
इतकेच नाही तर या याचिकेमध्ये बच्चन कुटुंबियांना कोरोना झाला याचा उल्लेख देखील करण्यात आला आहे. अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोना झाला होता. त्यामुळे ज्यांनी कोरोना काळात स्वत:ची काळजी घेत सेवा केली त्यांच्यावर हा अन्याय आहे. असे अनेक लोकं आहेत ज्यांनी रस्त्यावर उतरून आजाराची पर्वा न करता गरीबांची मदत केली. त्यांना गरजेच्या सगळ्या वस्तू पुरवल्या त्यांनी कोणत्याही पैशाची अपेक्षा न करता काम केले आणि कॉलर ट्यूनसारख्या गोष्टीसाठी अमिताभ यांनी पैसे घेतल्याचे सांगत याचिकाकर्त्याने महानायकाची निंदा केली आहे.
येऊ कशी तशी मी नांदायला, मालिकेची जबरदस्त ओपनिंग
पुढील सुनावणी 18 जानेवारीला
कोर्टाचे कामकाज सुरु झाले असले तरी देखील याचिकाकर्ता हा स्वत: कोर्टात हजर राहू शकलेला नाही. त्याच्या वकिलाने ही याचिका दाखल केली आहे.त्यामुळे कोर्टाने पुढील सुनावणी ही 18 जानेवारी पर्यंत पुढे ढकलली आहे. त्याच्या याचिकेनुसार अमिताभ बच्चन यांची कॉलर ट्यून तातडीने काढून टाकण्यास त्याने सांगितले आहे.
आता या कॉलर ट्यून प्रकरणाचा फटका बिग बी यांना कसा बसेल हे या सुनावणीनंतर कळेल.
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade