International Travel

जगातील अशी पर्यटन स्थळं जिथे होत नाही सूर्यास्त

Trupti Paradkar  |  Nov 3, 2021
Places around the world Where Sun Never Sets in Marathi

दिवस रात्र, ऊनपाऊस हे निसर्ग चक्राचा एक भाग आहेत. ऋतू मागून ऋतू बदलत असतात तसंच रोज सूर्योदय आणि सूर्यास्तही होत असतो. मात्र निसर्ग अनेक अद्भूत आणि आश्चर्यकारक गोष्टींनी नटलेला आहे. या जगात अशी काही ठिकाणं आहेत जी इतर ठिकाणांपेक्षा खूप वेगळी आहेत. कुठे थंड हवामान तर कुठे असह्य उकाडा, कुठे अथांग जलसागर तर कुठे रणरणतं वाळवंट…. या अशा समृद्ध जगात अशी काही शहरे आहेत जिथे चक्क काही महिने सूर्यास्तच होत नाही.  याचा अर्थ सूर्योदयही नाही आणि सूर्यास्तही नाही. काही महिने फक्त दिवस असणारी ही शहरं पर्यटकांच्या कुतूहलाचा विषय ठरतात. यासाठीच जाणून घ्या या बद्दल सविस्तर माहिती

नॉर्वे (हॅमरफेस्ट, स्वालबार्ड)

हॅमरफेस्ट या उत्तर नॉर्वेमधील शहरात काही महिने चक्क दिवसच असतो. म्हणूनच नॉर्वेला लॅंड ऑफ मिडनाइट असंही म्हणतात. कारण या शहरात मे ते जुलै महिन्यामध्ये जवळजवळ 75 दिवस सूर्यास्त होत नाही. स्ट्रुव्ह जिओडेटिक आर्कचा भाग असल्याने या शहराला युनेस्कोने जागतिक ऐतिहासिक शहर म्हणून घोषित केलेलं आहे. उत्तर ध्रुवावर असल्याने या शहरात सूर्य पावणे एक वाजता मावळतो आणि चाळीस मिनीटांनी पुन्हा उगवतो. नॉर्वेमधील स्वालबार्डमध्येही सूर्य एप्रिल ते ऑगस्टमध्ये मावळत नाही.

कॅनडा (नुनावत, युकॉन)

कॅनडामधील नुनावत हे एक अगदी छोटसं शहर आहे. उत्तर ध्रुवापासून दोन अंशावर असलेल्या या शहरात फक्त 3000 लोकसंख्या आहे. या शहरात हिवाळ्यात तीस दिवस संपूर्ण अंधार असतो तर उन्हाळ्यात सलग दोन महिने सूर्य मावळत नाही. कॅनडामधील युकॉन हे जगातील दुसऱ्या क्रमांकावर असलेलं शहर आहे जिथे वर्षभरात सर्वात जास्त बर्फ असतो. या शहरात उन्हाळ्यात पन्नास दिवस फक्त दिवसच असतो. म्हणूनच  या शहरालाही लॅंड ऑफ मिडनाइट असं म्हणतात.

इंटरनॅशनल टूर स्वतःच प्लॅन करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

आईसलॅंड –

युरोपमधील हे सर्वात मोठे बेट असून डास नसलेला विभाग म्हणून त्याची ओळख आहे. या बेटावरील रात्री या निरभ्र आणि प्रकाशमान असतात. कारण मध्यरात्रीही तुम्हाला इथे सूर्य दिसतो. जून महिन्यात तर या ठिकाणी सूर्य मावळतच नाही. उत्तर ध्रुवावरील ग्रिम्से बेट आणि अकुरेरी शहर पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे.

जगभरातील या विचित्र म्युझियमविषयी तुम्हाला माहीत आहे का

फिनलॅंड – 

हजारो बेट आणि तलाव असलेले शहर म्हणून  याची ओळख आहे. फिनलॅंड अतिशय सुंदर आणि आकर्षक देश आहे. उन्हाळ्यात जवळजवळ 73 सूर्य मावळत नाही. या शहरात उन्हाळ्यात कमी आणि हिवाळ्यात जास्त झोपतात. 

विमानातून प्रवास करताना तुमच्या सामानात नसाव्यात ‘या’ गोष्टी

स्वीडन –

स्वीडनमध्येही मे ते ऑगस्ट महिन्यात मध्यरात्री सूर्य मावळतो आणि साडे चारला उगवतो. लागोपाठ सहा महिने या शहरात सूर्यास्त होत नाही. त्यामुळे या देशातील लोक अनेक दिवस गोल्फ, मासेमारी, ट्रेक अशा अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटी करतात. किरूना हे स्वीडनमधील सर्वात उत्तरेकडील शहर आहे आणि जिथे लोकसंख्या आहे 19,000 आहे. या शहरात मे ते ऑगस्ट महिन्यात सूर्य मावळतच नाही. 

याचप्रमाणे रशियामधील सेंट पिटर्सबर्ग मध्ये दीड महिना सूर्यास्त होत नाही, ग्रीन लॅंडमध्येही एका शहरात अडीच महिने सूर्य मावळत नाही. अलास्कामधील बॅरोमध्येही मे ते जुलै महिन्यात तीन महिने सूर्य मावळत नाही.

Read More From International Travel