बॉलीवूड

हाऊसफुल ‘कुमार’ आणि ‘शूटर दादी’ भूमि पेडणेकर सर्वाधिक लोकप्रिय

Aaditi Datar  |  Nov 11, 2019
हाऊसफुल ‘कुमार’ आणि ‘शूटर दादी’ भूमि पेडणेकर सर्वाधिक लोकप्रिय

सध्या बॉलीवूडमधील खिलाडी अक्षय कुमार यशाची एक से एक शिखर सर करत आहे. नुकत्याच अक्षयच्या रिलीज झालेल्या ‘हाऊसफुल-4’मूळे तो पोचला आहे स्कोर ट्रेंड्स इंडिया लोकप्रियता चार्टच्या सर्वोच्च स्थानावर. तर ‘सांड की आंख’ चित्रपटातील शूटर दादीच्या भूमिकेत दिसलेली प्रतिभावान अभिनेत्री भूमि पेडणेकर अभिनेत्रींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेन स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

अक्षय कुमारचा मिडास टच

हो…अक्षयची कारकीर्द पाहता सध्या त्याच्या टचला मिडास टचचं म्हणावं लागेल. तो जो चित्रपट करत आहे तो हमखास हीट होत आहे. त्यामुळे या वर्षी आलेल्या ‘मिशन मंगल’ आणि ‘हाऊसफुल-4’च्या यशानंतर खिलाडी कुमार पुन्हा एकदा लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. 88 गुणांसह पहिल्या क्रमांकावर असलेल्या अक्षय कुमारने लोकप्रियतेत किंग खानलाही मागे टाकलंय.

किंग खानही दुसऱ्या स्थानावर

एकीकडे खिलाडी अक्षय कुमार तर दुसरीकडे यंदा एकही चित्रपट न येऊनही बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खान 69 गुणांसह दुस-या स्थानावर आहे. शाहरुखच्या टेड टॉक शो आणि नुकत्याच साज-या झालेल्या वाढदिवसामुळे डिजीटल, सोशल आणि प्रिंट पब्लिकेशन्समध्ये शाहरूखची लोकप्रियता वाढलेली दिसून आली आहे.याला म्हणतात खरी लोकप्रियता. आता ज्या बादशाहचे चाहते त्याच्या वाढदिवसाला 50 दिवस असल्यापासून सेलिब्रेशन सुरू करतात. मग असा अभिनेता चित्रपटांशिवायही लोकप्रिय असणं साहजिक आहे. त्यामुळे आता शाहरूखच्या चाहत्यांना उत्सुकता आहे ती त्याच्या आगामी चित्रपटाची.

https://marathi.popxo.com/article/shahrukh-khan-daughter-suhanas-first-short-film-teaser-released-in-marathi-852272

बिग बी अमिताभही चार्टमध्ये अग्रेसर

बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन आपल्या लोकप्रिय गेम शो ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) च्या लोकप्रियतेमूळे तिस-या क्रमांकावर आहेत. सुपरस्टार सलमान खान मात्र आश्चर्यकारकपणे सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्या आगामी ‘दबंग 3’ आणि ‘राधे’ या सिनेमांच्या घोषणेनंतर सलमान खान चौथ्या स्थानावर आहे.

https://marathi.popxo.com/article/this-diwali-is-lucky-for-shahrukh-khan-and-his-fans-in-marathi-857565

भूमिची भरारी

भूमि पेडणेकर बॉलीवूडमध्ये आल्यापासून तिने नेहमी तिच्या भूमिकांमध्ये वैविध्यता दाखवली आहे. नुकत्याच आलेल्या तिच्या‘सांड की आंख’ चित्रपटातल्या परफॉर्मन्समुळे भूमिला बॉलीवूड अभिनेत्रींच्या यादीत लोकप्रियतेत सर्वोच्च रेटींग मिळालं आहे. 53 गुणांसह नंबर वन स्थानावर असलेल्या भूमीची सहकलाकार आणि या चित्रपटातली दूसरी ‘शूटर दादी’ म्हणजेच अभिनेत्री तापसी पन्नू 47 गुणांसह दुस-या स्थानावर आहे.

अनुष्का आणि प्रियांकाचीही वर्णी

लोकप्रिय अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये अनुष्का शर्मा तिस-या स्थानावर तर प्रियांका चोप्रा चौथ्या स्थानावर आहे. अनुष्का तिचा पती क्रिकेटर विराट कोहलीसोबत सध्या भूतान दौऱ्यावर आहे. त्यांच्या व्हायरल सोशल मीडिया फोटोजमुळे तर प्रियांका तिचा पती निक जोनाससोबतच्या व्हायरल फोटोजमुळे सध्या सोशल मिडीया आणि व्हायरल न्यूजमध्ये खूप गाजत आहे. त्यामुळे या दोघीही तिस-या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.

स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “हाऊसफुल-4 चा अक्षयचा लुक, ‘बाला’ गाणे आणि सिनेमाची प्रसिध्दी यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वायरल पब्लिकेशन्समध्ये अक्षय कुमारच्या लोकप्रियतेत वाढ झाली. तर भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नूची फिल्म ‘सांड की आंख’मधल्या त्यांच्या परफॉर्मन्ससाठी दोघींचेही खूप कौतुक झाले आणि म्हणूनच दोन्ही प्रतिभावान अभिनेत्रींच्या लोकप्रियतेत वाढ झालेली दिसून येतेय.“

कसं काढलं जात हे रँकिंग

अश्वनी कौल पुढे सांगतात की, “आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजीटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक अल्गोरिदममुळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंगपर्यंत ठरवू शकतो.”

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From बॉलीवूड