वजन कमी करण्यासाठी आणि सुडौल बांध्यासाठी हल्ली फिटनेस राखणे सगळ्यांनाच आवडू लागले आहे. एरव्ही कधीही व्यायाम न करणारे हल्ली व्यायाम करताना दिसतात. व्यायाम करायची ज्यांना सवय नसेल पण काही दिवसापासून व्यायाम सुरु केला असेल तर अशांना अगदी काहीच मिनिटं व्यायाम करुनही थकवा जाणवायला सुरुवात होते. व्यायामानंतर तुमचंही अंग खूप दुखत असेल व्यायाम करण्याची अजिबात इच्छा होत नसेल तर तुम्हाला त्या मागील काही कारणे आणि सोेपे उपाय माहीत असायला हवे. तुम्हीही व्यायाम करायला सुरुवात केली असेल तर तुम्हाला ही माहिती वाचायलाच हवी
व्यायाम केल्यानंतर अंग का दुखतं?
ज्यांना व्यायामाची किंवा शारीरिक हालचालीची सवय नसते अशांचे अंग व्यायामानंतर दुखणे अगदी स्वाभाविक आहे. कारण शरीराला अजिबात हाचचाल नसताना जर अवयवांचा जास्त वापर केला गेला तर त्यामुळे अंगदुखी होऊ लागते. ही अंगदुखी अगदी सर्वसामान्य आणि कसलेही टेन्शन घेणारी नाही. पण तरीही तुम्हाला खूप त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांना त्वरीत दाखवायला हवे.
नव्याने व्यायाम करणाऱ्यांच्या बाबतीत सांगायचे झाले तर खूप वेळा चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्यामुळे अंगदुखी होऊ शकतो. कारण चुकीचे काहीतरी करताना नस चढणे किंवा मसल दुखावला जाणे असे होते. या कारणामुळेही अंग दुखू लागते.
या कारणामुळेही दुखू शकते अंग
काही जण तर रोज व्यायाम करतात. पण तरीदेखील काही जणांना अंग दुखू लागते. जर तुमच्या रोजच्या व्यायामामध्ये काही बदल करण्यात आला असेल. काही नवा प्लॅन तुम्ही घेतला असेल तर असा नवा वर्कआऊट करताना शरीराला जी रोज सवय झालेली असते. ती सवय सुटल्यामुळे मसल पेन होण्याची शक्यता असते. रोज व्यायाम करणाऱ्या व्यक्तिला त्रास झाला की खूप जणांना आश्चर्य वाटते. पण कितीही वर्ष व्यायाम केलेला असला तरी देखील कधी कधी चुकीचा किंवा जास्त व्यायाम झाला तरी देखील अंग दुखीचे कारण बनू शकते. कधी कधी अंगदुखी ही खूप जास्त असेल तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करु नका. त्वरीत डॉक्टरकडे जा. वातरोगाची माहिती घेणे ही फार महत्वाचे असते.
अंगदुखीवर असा मिळवा आराम
अंगदुखीची काही कारणं जाणून घेतल्यानंतर आता तुम्हाला त्यापासून आराम मिळवायचा असेल तर तुम्ही काही सोपे उपाय करा.
- व्यामानंतर तुम्ही थोडे चालणे ठेवले तर मसल रिलॅक्स व्हायला मदत मिळते. जर तुम्ही व्यायामानंतर अगदी हालचाल थांबवत असाल तर ती हळूहळु थांबवा. म्हणजे तुमचे शरीर थंड होण्यास मदत मिळेल.
- व्यायामानंतर आंघोळ ही महत्वाची असते. जर तुम्ही गरम गरम पाण्याची आंघोळ केली तर तुमच्या शरीरातील नसा विस्तारतात. रक्तपुरवठा सुरळीत होतो. आलेला शीण निघून जातो.
- जर तुम्हाला खूप जास्त मसल पेन होत असेल तर तुम्ही रेली स्प्रे वापरला तरी चालेल
आता व्यायामानंतर अंगदुखी होत असेल तर तुम्ही या काही गोष्टींची नक्की काळजी घ्या