माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून घराघरात पोहचलेल्या नेहा म्हणजेच प्रार्थना बेहरेचे अनेक चाहते आहेत. तिचं सौंदर्य आणि अभिनय नेहमीच चाहत्यांना भुरळ घालत असतो. प्रार्थना सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. सहाजिकच तिचा सोशल मीडियावरही एक खास चाहतावर्ग आहे. प्रार्थनाने अनेक मराठी चित्रपटात काम केलं आहे. सध्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून टीव्हीवरही ती झळकत आहे. शिवाय ती नेहमीच तिचे फोटो आणि वैयक्तिक जीवनातील अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतंच तिने शेअर केलेलं एक फोटोशूट सध्या चाहत्यांना घायाळ करत आहे. या फोटोशूटसोबत प्रार्थनाने एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. ज्यावर चाहत्यांनी लाईक्स आणि कंमेट्चा पाऊस पाडला आहे. काही जणांना तिचा लुक खूप आवडला आहे, तर काहींनी तिने नेसलेल्या साडीचं कौतुक केलं आहे. पैठणी साडी ही प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय असतो, त्यामध्ये अशा सुंदर साडीचा लुक नक्कीच अनेकांना प्रभावित करणारा ठरू शकतो. यासाठी जाणून घ्या पैठणी साडी डिझाईन | Marathi Paithani Saree Designs आणि अस्सल मराठमोळे साडी कोट्स (Saree Quotes In Marathi)
राजसा जवळी जरा बसा…
सध्या सर्वांवर चंद्रमुखी चित्रपटाचा फिव्हर चढलेला आहे. अशात प्रार्थनानेही एका सुंदर लावणीच्या बोलावरील व्हिडिओ शेअर करत आणखी भरच टाकली आहे. या व्हिडिओमध्ये प्रार्थनाने हिरवी कंट पैठणी साडी नेसली आहे. यासाडीवर सुंदर आर्ट ज्वैलरी परिधान करत तिने तिचा क्लासिक लुक केलेला आहे. हिरव्या रंगाची टिकली आणि मोकळे केस तिच्या मनमोहक सौंदर्यामध्ये अधिकच भर टाकत आहे. हा लुक पाहून चाहत्यांची नजर प्रार्थनावरून हलणारच नाही. शिवाय “राजसा जवळी जरा बसा” या लावणीच्या बोलावर तिच्या दिलखेचक अदा खूप आकर्षक वाटत आहेत. मुळात म्हणजे नो मेकअप अथवा नॅचरल लुक केल्यामुळे तिचे मूळ सौंदर्य यात शोभून दिसत आहे.
सौंदर्य आणि अभिनयाचा उत्तम संगम
प्रार्थना बेहरेने हिंदी मालिका पवित्र रिश्तामधून टेलीव्हिजनवर पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने अनेक मराठी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. मितवा, बायरर्स अड्डा, व्हॉट्सअप लग्न, कॉफी आणि बरंच काही अशा अनेक चित्रपटातील भूमिकांमधून प्रार्थना लोकप्रिय झाली. मात्र माझी तुझी रेशीमगाठ या मराठी मालिकेमुळे नेहाच्या रूपात ती घराघरात पोहचली. ती साकारत असलेली नेहा सध्या प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाला आपल्या घरातील वाटत आहे. प्रार्थना लवकरच छुमंतर या बिगबजेट चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबच रिंकू राजगुरू, ऋषी सक्सेना आणि सुव्रत जोशी असणार आहेत.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade