मनोरंजन

प्रियांकाने केले भारतात दीर – जाऊचे स्वागत

Dipali Naphade  |  Nov 28, 2018
प्रियांकाने केले भारतात दीर – जाऊचे स्वागत

प्रियांका आणि निकच्या लग्नाची तयारी अगदी जोरात सुरु आहे. प्रियांका आणि निकचे सगळे नातेवाईक यायला सुरुवात झाली आहे.  निक काही दिवसांपूर्वीच भारतात आलाय आणि आता नुकताच त्याचा भाऊ जो जोनास आणि त्याची बायको अर्थातच प्रियांकाची जाऊ सोफी टर्नरदेखील भारतात आले आहेत. सोफी टर्नरला ‘गेम ऑफ थ्रोन्स’साठीदेखील ओळखलं जातं. सोफी आणि जो च्या स्वागतासाठी प्रियांका स्वतः विमानतळावर हजर होती. त्यामुळे प्रियांकाचं त्यांच्याशी असलेलं सख्य सर्वांनाच दिसून येत आहे. निकचं कुटुंबीय आल्यानंतर प्रियांकाने दिल्लीमध्ये थँक्सगिव्हिंग पार्टी दिली होती आता तिने खास आपल्या दीर आणि जाऊसाठी जुहूमध्ये पार्टी दिली. खास त्यांच्या स्वागतासाठी प्रियांका आणि निकने या पार्टीचं आयोजन केलं होतं ज्यामध्ये प्रियांकाची खास मैत्रीण आलिया आणि बहीण परिणिती चोप्रादेखील उपस्थित होत्या. या पार्टीचे फोटो नुकतेच व्हायरल झाले आहेत.


कोण उपस्थित होतं पार्टीमध्ये?

या पार्टीमध्ये प्रियांकाचे दीर आणि जाऊ अर्थातच जो जोनास आणि सोफी टर्नरबरोबरच प्रियांकाची बहीण परिणिती चोप्रा, अभिनेत्री आलिया भट, तसंच सोनाली बेंद्रेची नणंद जी प्रियांकाची खूप जवळची मैत्रीण आहे सृष्टी बहल, प्रियांकाचा मित्र मुश्ताक शेख आणि प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा हे सर्व आले होते. प्रियांका आणि निक अतिशय आनंदी दिसून येत होते. याशिवाय सोफी आणि जो बरोबर प्रियांकाचं बाँडिंग या सर्वच फोटोंमध्ये दिसून येत आहे. निक आणि प्रियांका एकमेकांना जराही दूर होऊ देत नाहीत. त्याशिवाय हॉटेलमधून बाहेर पडताना निकने प्रियांकाला गर्दीपासून वाचवत वाट करून देतानाचेही फोटो व्हायरल झाले आहेत. निक प्रियांकाची अतिशय काळजी घेत असून वेळोवेळी त्याचं प्रेम फोटोंमधूनही दिसून येत आहे.


ऑफिसच्या बाहेर पोझ न देता गेली प्रियांका

दरम्यान सोमवारी संध्याकाळी प्रियांका तिच्या ऑफिसच्या बाहेरही दिसली होती. पण त्यावेळी अतिशय घाईत असलेल्या प्रियांकाने कोणत्याही फोटोग्राफर्सना पोझ न देता कारमध्ये बसून निघून जाणंच पसंत केलं. सध्या लग्नाच्या घाईत आणि लग्नाच्या निमित्ताने होणाऱ्या पार्टीजमध्ये तसंच सासरच्या मंडळींना वेळ देताना प्रियांका दिसून येत आहे. प्रियांका आणि प्रियांकाच्या घरच्यांनी तिच्या सासरच्या मंडळींना काही कमी पडू नये यासाठी व्यवस्थित काळजी घेतली असून सध्या सर्वच त्यांचा पाहुणचार करण्यामध्ये व्यग्र आहेत.

 

 इमेज सोर्स – इन्स्टाग्राम, viral bhayani instagram 

Read More From मनोरंजन