देशभरात पुन्हा एकदा कोरोना परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या यामुळे आता लॉकडाऊन होणार अशी परिस्थिती दिसत असताना गुढीपाडव्याच्या रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंधाची घोषणा केली. लॉकडाऊन होईल अशी चर्चा रंगलेली असताना काही लोकांनी लॉकडाऊनला विरोधही दर्शवला होता. गेल्यावर्षी झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे कंबरड मोडून गेले. आर्थिक स्थिती ढासळली त्यामुळे व्यापारांपासून ते अगदी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांनी लॉकडाऊनला विरोध केला होता. निर्माते, दिग्दर्शक आणि ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांनी देखील ट्विट करत ‘लॉकडाऊन उत्तर नाही’ असे ट्विट केले. त्यांनी केलेले ट्विट फार कोणाला रुचलेले दिसत नाही कारण त्यांच्यावर टीकेची झोड उठताना दिसत आहे.
जेव्हा ‘जलेभी’ फेम दिगांगना सूर्यवंशीवर मोराने अचानक केला हल्ला
नेमकं प्रकरण काय?
महेश कोठारे यांनी लॉकडाऊन हवा की नको या बाबत आपले मत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले आहे. त्यांनी एक ट्विट केले ज्यामध्ये ‘लॉकडाऊन हे उत्तर नाही’ असे ट्विट केले. हे ट्विट केल्यानंतर अगदी काही मिनिटात त्यावर रिट्विटच पाऊस पडू लागला. कोरोनासारखी भयानक स्थिती देशात असताना कोठारे यांनी असापद्धतीने ट्विट करणे काहींना बहुधा रुचलेले दिसत नाही. कारण काही युजर्सनी कोठारे यांची चांगलीच कानउघडणी केलेली दिसते . त्यापैकी काही निवडक ट्विट्स जर पाहिले तर युजर्स लिहितात की, इतका मोठा माणूस, झपाटलेला आहे का? तुमच्याकडून अपेक्षा नव्हती, तुम्ही तर भाजपाचे दलाल निघालात, मागच्या लॉकडाऊनला ताट वाजवत होता.
तर दुसऱ्या युजरने लिहिले की, Ac मध्ये बसून बोलण सोपं असत सर..जेव्हा रेमडीसिविर साठी ,बेड साठी वणवण करावी लागेल तेव्हा लॉक down हवं की नको तुम्हाला कळेल परिस्थितीशी सामना सगळेच करतायत पण आता लॉक down शिवाय पर्यायच उरला नाहीय ,तरी दुसरा पर्याय असेल तर सुचवा..”टाळ्या थाळ्या सोडून बर का” कळावे लोभ असावा. अशापद्धतीने युजर्सनी महेश कोठारे यांनी टार्गेट केले आहे.
कोठारेंनी दिले उत्तर
ट्विटवर कमेंट करणाऱ्या सगळ्यांना महेश कोठारे यांनी देखील उत्तर दिले आहे. त्यांनी एका खासगी वाहिनीची लिंक शेअर करत लोकांना या बद्दल सजग केले आहे. एका चॅनलवर झालेल्या एका वादविवाद स्पर्धेची ही लिंक शेअर केली आहे. त्यामुळे अनेकांना त्यांनी अशापद्धतीचे ट्विट का केले असावे याचा अंदाज नक्की आला असेल. त्यामुळे नक्कीच थोड्याफार प्रमाणात त्यांच्यावर होणारी ही टीका थोडी कमी झाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३० व्या जयंतीनिमित्त कलाकारांची मानवंदना
कडक निर्बंध पण…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या रात्री 15 दिवसांच्या कडक निर्बंधाची घोषणा केली आहे. या अंतर्गत आता सगळ्या अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. या शिवाय कामांव्यतिरिक्त प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सगळ्या अत्यावश्यक सेवा या सुरु राहणार असून बेकरी, दूध, किराणा मालाची दुकानं ही सुरु राहणार आहेत. याशिवाय अनेकांना दिलासा मिळेल असे निर्णय यामध्ये घेण्यात आलेले आहेत.
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade